KBC मध्ये १ करोड जिंकणारा रवी सैनी आठवतोय का ? बघा आज कुठे आहे

0
165

२००१ साली KBC Jr मध्ये १ करोड जिंकलेला रवी सैनी आठवतोय का ? १९ वर्षांनंतर आज कुठे पोहोचलाय बघा तो…

कौन बनेगा करोडपती ह्या कार्यक्रमाचे देशभरात असंख्य फॅन्स आहेत. गेल्या २० वर्षांपासून अमिताभ बच्चन ह्या कार्यक्रमाचे होस्ट आहेत. अगदी लहान मुलांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच हा शो आवडीने बघतात आणि त्यामागचं कारण म्हणजे मनोरंजनासोबत तुमच्या ज्ञानात पडणारी भर.

तुम्ही जर २००१ साली झालेला Kaun Banega Crorepati Junior बघितला असेल तर तुमच्यासाठी रवी सैनी हे नाव काही नवीन नाही. कारण रवी सैनी ह्या १४ वर्षाच्या मुलाने कौन बनेगा करोडपती जुनिअर कार्यक्रमात १ करोड जिंकलेले. आता आठवलं ना ?

ravi mohan saini, ravi saini kbc, kbc winner ravi saini, amitabh bachchan, ips ravi mohan saini, Kaun Banega Crorepati Junior, porbandar sp, dr ravi saini, आयपीएस रवी सैनी, रवी सैनी केबीसी, अमिताभ बच्चन
2001 KBC Jr Winner Ravi Mohan Saini

१९ वर्षांपूर्वी केवळ १०वी मध्ये असणाऱ्या रवीने सगळ्यांचीच मने जिंकलेली. आज रवी ३३ वर्षांचा झाला आहे आणि तुम्हाला सांगताना आनंद होतो कि तो पोलिस दलात IPS ऑफिसर आहे. पोरबंदर इथे Superintendent of Police पदावर रवी कार्यरत आहे. याआधी Ravi Mohan Saini राजकोटमध्ये डेप्युटी कमिश्नर होता आणि काही काळ आधीच त्याची बदली पोरबंदरला झाली आहे.

ravi mohan saini, ravi saini kbc, kbc winner ravi saini, amitabh bachchan, ips ravi mohan saini, Kaun Banega Crorepati Junior, porbandar sp, dr ravi saini, आयपीएस रवी सैनी, रवी सैनी केबीसी, अमिताभ बच्चन
IPS Ravi Saini

TOI ला दिलेल्या मुलाखतीत रवी म्हणाला कि त्याने जिंकलेली १ करोड रक्कम त्याला ४ वर्षांनंतर मिळाली. यामागचे कारण असे आहे कि KBC च्या नियमांनुसार रक्कम जिंकलेल्या व्यक्तीला ती रक्कम तेव्हाच दिली जाते जेव्हा तो १८ वर्षांचा होतो. म्हणून १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर रवीला त्याची जिंकलेली रक्कम मिळाली. टॅक्स काटून ७० लाख रुपये रवी सैनीच्या हातात आले.

ravi mohan saini, ravi saini kbc, kbc winner ravi saini, amitabh bachchan, ips ravi mohan saini, Kaun Banega Crorepati Junior, porbandar sp, dr ravi saini, आयपीएस रवी सैनी, रवी सैनी केबीसी, अमिताभ बच्चन
Ravi Saini is currently Superintendent of Police at Porbandar

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रवीने मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेण्याचे ठरवले. रवीने आपले शिक्षण पूर्ण करत MBBS ची डिग्री मिळवली. रवीचे वडील नौदलात अधिकारी आहेत आणि त्याला सुद्धा वडिलांप्रमाणे देशासाठी काहीतरी करायचे होते. डॉक्टर म्हणून इंटर्नशिप करत असतानाच रवीने UPSC ची परीक्षा उत्तरं केली.

शेवटी २०१४ साली गुजरात कॅड्रे मधून डॉ. रवी सैनी IPS झाला. रवी म्हणाला, वडिलांकडून प्रेरणा घेऊनच मी पोलीस दलात दाखल झालो आणि देशसेवा करण्याचं ठरवलं.

ravi mohan saini, ravi saini kbc, kbc winner ravi saini, amitabh bachchan, ips ravi mohan saini, Kaun Banega Crorepati Junior, porbandar sp, dr ravi saini, आयपीएस रवी सैनी, रवी सैनी केबीसी, अमिताभ बच्चन
33 yr old IPS Ravi Saini is a MBBS Degree holder
*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here