Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अबब ! बुर्जखलिफा एवढे 2 धूमकेतू आज पृथ्वीच्या जवळून जाणार

असा असणार आहे ह्या दोन धूमकेतूंचा प्रवास

आज रात्री अंतराळात एक अद्भुत घटना घडणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र नासाने हि माहिती दिली. नासाच्या माहितीनुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी दोन धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत.

2000 qw7 asteroid nasa, 2010 c01 asteroid, nasa asteroid warning, nasa news
(Image Source – The Quint)

नासाच्या अनुमानानुसार ह्या दोन धूमकेतूंचा आकार बुर्ज खलिफा एवढा आहे. बुर्ज खलिफा हि जगातली सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज खलिफा हि इमारत ८२८ मीटर इतकी उंच आहे ह्यावरून तुम्हाला धूमकेतूच्या आकाराचा अंदाज येऊ शकेल.

या धूमकेतूंची नावे २००० QW ७ आणि २०१० C०१ हि असून हे दोन धूमकेतू आज रात्री चंद्र व पृथ्वी ह्या दोघांच्या मधून जाणार आहेत. ह्या धूमकेतूंपासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे नासाने सांगितले आहे. ह्या दोन धूमकेतूंवर नासा सन २००० सालापासूनच नजर ठेवून आहे. नासाच्या अनुमानानुसार हे २ धूमकेतू पृथ्वीपासून ३.५ मिलियन अंतरावरून जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.