Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

२० लाख सामने खेळून ८५ व्या वर्षी निवृत्ती..!

तब्बल ६० वर्षे कोणी क्रिकेटच्या मैदानात अधिराज्य गाजवू शकत, चाळीशीच्या आसपास असणारे खेळाडू आपली निवृत्ती जाहीर करतात पण वेस्ट इंडिज संघाचा असा एक अवलिया आहे ज्याने तब्बल ६० वर्षाच्या कारकिर्दीत २० लाख सामने आणि ७००० विकेट्स घेतल्या आहेत. क्रिकेट जगतात सेसील राईट हे नाव तुम्ही जास्त ऐकलं नसलं पण हे नाव आता चर्चेत आलय आणि त्याला कारणही तसंच आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी सेसील राईटने निवृत्ती जाहीर केली आहे.

cecil wright, cricket

या विषयी विचारले असता सेसील ने सांगितले कि, वयाचं मी कधीच भांडवल केलं नाही, मी खाण्या बाबतीत पथ्य पाळत नसून काहीही खातो, मद्याचं अतिसेवन करत नाही त्यामुळे मी तंदरुस्त आहे. मी इतकी वर्षे कसा खेळलो याचे उत्तर माझ्याकडेही नाही.

सेन्सील ७ सप्टेंबर ला शेवटचा सामना खेळणार आहे. जमैका संघाकडून सेन्सील प्रथम श्रेणीत १९५८ साली खेळला होता. १९५९ सालापासून तो इंग्लडमध्ये स्थायिक झाला. तिथेच त्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरवात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.