बाजीराव मस्तानीचा पराक्रमी पुत्र समशेर बहाद्दर

आई वडिलांच्या पश्चात समशेर बहाद्दर ला कुणी सांभाळले ? पेशव्यांनी त्याला बाजीरावांचा मुलगा म्हणून राज्यात स्थान दिले कि नाही ?
पेशवा बाजीराव यांच्याबद्दल माहित नसेल असा माणूस सहसा सापडणार नाही. कदाचित बाजीरावांनी काय पराक्रम केला या पेक्षा माणसांच्या तोंडावर बाजीराव मस्तानी हेच नाव जास्त फिरत असावे. याचबद्दल आपण काही जाणून घेऊया. मस्तानी हि बाजीरावांची दुसरी पत्नी, पहिली पत्नी काशीबाई यांच्यापासून बाजीरावांना बाळाजी बाजीराव, रघुनाथराव व जनार्दनराव अशी अपत्ये झाली. मस्तानी आणि बाजीराव यांना मात्र एकच अपत्य होते. त्याचे नाव होते समशेरबहाद्दर, त्यांना कृष्ण राव असे सुद्धा म्हंटले जाते. त्यांनीही मराठ्यांच्या इतिहासात आपले अमूल्य योगदान दिले आहे. आज आपण समशेरबहाद्दर यांच्याबद्दल जाणून घेऊया.
ओळख
राजपूत राजा छत्रसाल आणि त्याची बायको रुहानी बाई बेगम यांची मुलगी होती मस्तानी, बाजीरावांनी छत्रसालला शत्रूपासून सुरक्षित ठेवल्यामुळे खुश होऊन छत्रसालने मस्तानीचा विवाह बाजीरावांशी केला. बाजीराव, मस्तानी सोबत पुण्यात आले मात्र मस्तानी मुस्लिम म्हणून त्या दोघांच्या नात्याला स्वीकारले गेले नाही. मस्तानीसाठी वेगळा महाल बांधून तिच्या राहण्याची व्यवस्था बाजीरावांनी केली.
मस्तानी व बाजीराव यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव ठेवले कृष्णराव. बाळाचा जन्म झाला खरा परंतु बाजीरावांची पत्नी व बाळाची आई हि मुस्लिम असल्याने या बाळावर कोणत्याही प्रकारचे हिंदू संस्कार करण्यास समाजाने व पंडितांनी नकार दिला. याच कारणामुळे बाळावर मुस्लिम संस्कार करण्यात आले आणि बाळाचे नाव ठेवले…समशेरबहाद्दर !
१७४० मध्ये बाजीराव व मस्तानी दोघांच्या मृत्यूनंतर, ६ वर्षाच्या छोट्याश्या समशेरला बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई यांनी आपल्या छायेत आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढविले. समाजाने व पेशवा घराण्याने मस्तानीचा स्वीकार केला नसला तरी समशेरचा मात्र फार लवकर त्यांनी स्वीकार केला, आपल्या इतर भावांसोबत (सावत्र) समशेर शिक्षण घेत होता, शास्त्र व शस्त्र यांचे ज्ञान सुद्धा त्याने घेतले. बाजीरावांच्या म्हणजेच त्याच्या वडिलांच्या राजवटीतील बांदा आणि काल्पी हा प्रदेश समशेरच्या वाट्याला देण्यात आला.
कारकीर्द
आपल्या वाट्याला आलेला प्रदेश घेऊन समशेर समाधानी होता. त्याने आपल्या प्रदेशावर उत्तम सत्ता स्थापन केली. त्याने वेळोवेळी मराठ्यांना सहकार्य केले. मराठ्यांचे जे उत्तरेत राजकारण सुरु होते त्याच राजकारणामध्ये समशेर सुद्धा महत्त्वाचे सहकार्य करत होता. १७५८ तो पंजाबच्या दुराणी घराण्याशी रघुनाथ राव, दत्ताजी सिंधिया, मल्हारराव होळकर यांच्या बाजूने लढत होता. अखेर त्याने अटक, पेशावर आणि मुलतान जिंकून घेतले.
समशेर नंतर गादीवर आला कृष्णसिंग म्हणजेच अली बहादूर. अलीने आपले वर्चस्व अजून पक्के केले. त्याने बुंदेलखंड मधील बराच प्रदेश ताब्यात घेतला आणि तो बांदाचा नवाब म्हणून ओळखला जाऊ लागला. समशेरबहादूरच्या पुढील सर्वच वंशजांनी मराठ्यांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवले. याच घराण्यातील दुसरा अली बहादूर हा राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने १८५७ च्या युद्धात लढत होता.
पानिपतच्या युद्धातील पराक्रम
समशेरबहादूरने मराठ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मदत केली ती म्हणजे पानिपतच्या युद्धात. मराठ्यांना खूप मोठ्या शत्रूशी लढाई करायची होती. हे आव्हान फार कठीण होते, शक्य तेवढी मदत मराठे गोळा करीत होते. याच वेळी समशेरबहाद्दरने आपले सर्व सैन्य घेऊन मराठ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि पूर्ण सुद्धा केले. समशेरबहाद्दर पानिपतच्या युद्धात प्राणपणाने लढला. या युद्धात तो बराच जखमी झाला. अखेर १८ जानेवारी १७६१ मध्ये केवळ वयाच्या २६ ते २७ व्या वर्षी समशेरचा भरतपूर येथे मृत्यू झाला.
उदाहरण
बाजीराव…हिंदू ब्राह्मण आणि मस्तानी मुस्लिम. याच कारणामुळे ना समाजाने आणि ना ब्राह्मणांनी त्यांना स्वीकारले. त्यांच्या मुलाला मात्र तशी वागणूक मिळालेली फारशी सापडत नाही. वर म्हटल्याप्रमाणे काशीबाईंनी आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे समशेरला जपले, वाढविले आणि शस्त-शास्त्र शिक्षण सुद्धा देऊ केले. कळत्या वयापासून ते मरेपर्यंत समशेर हा मराठ्यांशी एकनिष्ठ राहिला. त्याच्या आईला आणि सुरुवातीला त्याला बरीच वाईट वागणूक मिळाली परंतु ते मनात न ठेवता समशेर ने मराठ्यांसाठी पानिपतच्या लढाईत आपले प्राण सुद्धा दिले.
एक वेळ होती कि समशेरला ब्राह्मण म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्याचे वडील प्रयत्न करत होते परंतु, समाजाने समशेरला स्वीकारण्यास नकार दिला. परंतु हाच समशेर ज्याच्यावर मुस्लिम संस्कार झाले, तो याच मराठ्यांशी मात्र शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिला. इतिहासाने या उदाहरणातून हे पुन्हा दाखवून दिले कि जात, धर्म आपली निष्ठा ठरवत नाही, तुमचा पराक्रम तुमच्या जातीवर अवलंबून नसतो. समाजाने नेहमीच जात-धर्माच्या आधारे इतरांना पाहिले. परंतु अशा काही उदाहरणांनी आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडले. जात-धर्म यांच्याही वर असते माणसाचे कर्तृत्व, त्याची निष्ठा आणि या परीक्षेत समशेरबहाद्दूर खऱ्या अर्थाने बाजीरावांचा पुत्र शोभला.
Superb kauuuu….
याच समशेर बहादुर ने अकोले तालुक्यात स्वतः ची ओळख .. ठेवली आहे …
त्यानेच समाशेरपुर हे गाव वसवले … तिथे फक्त ब्राह्मण आणि मुसलमानच होते …
त्याला मिळालेले गोधन कर्नाटक मधून 5000 आणि त्यासोबत कानडी गुराखी सैन्य पण होते … ते आज ही याच परिसरात आहेत … त्यांना “कानडी” म्हणून आजही सबोधले जातेच पण त्यांचा समावेष अजून ही ओबीसी .. जनरल … कुणबी … मराठा … किंवा अन्य जमातीत होत नाही … ते “कानडी” च आहेत …
Hi tukaram,
Tumcha kade ajun kahi information ahe Ka varcha topic vr please share kara
Chhan mahiti. Mala ha itihas mahiti navhata. Thanks.
Sir I’m from Samsherpur
धन्यवाद ही माहित दिल्या बद्दल
तलवार कानडी असे म्हणतात या समाजाला
Akole means Ahmednagar district madala ka?
Mast
Nice
Maratha samjane tyala kadhich nakarle nahi… Nakarle te fkt Brahaminani.
Veri Veri naice
वाह , छान माहिती ..
Good info.
Good information todays people should know the values of brotherhood and humanity
आपल्या पोस्ट मध्ये पेशवा बाजीराव म्हणून जो फोटो मस्तानीजी सोबत दाखवला आहे तो टीपु सुलतान चा आहे तरी बाजीरावांचा फोटो म्हणून जोडलेला टीपुचा फोटो तात्काळ डीलीट करावा
बाकी माहिती उत्तम आहे
Kalana jhalay vatta konte photo takave
Khup chan mahiti ????????????
खुप छान माहिती . . पानिपत चित्रपट बघुन इतिहास जिवंत वाटला.
धन्यवाद छान माहिती दिलीत अशी अजून कितीतरी इतिहासातील माहिती आपल्याला माहीत नाही
छान माहिती दिलीत.
Nice
आज माहिती मिळाली
ब्राह्मणवाद्यांनी धर्म फार सिमीत केल्याने हिंदू धर्म लोप पावत आहे.जगात सर्वात छोटा धर्म राहिला,उचनिचता ह्या धर्माला सर्वात मोठा कलंक आहे.इतर धर्मीयांना का हे स्विकारायला तयार नाहीत?
Nice information
मी सम शिरपूर व समशेर बहाद्दर यांच्याविषयी संभ्रमात होतो मात्र मला आता खात्री पटली शिवाय कानडी , तलवार कानडी यांचीही माहिती मिळाली मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे धन्यवाद
Khup changali mahiti.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.
GOOD INFORMATION NICE
Itihas sarv jante pudhe aannya chi garaz aahe.
Nahi tr kahi lok aaplya swartha sathi chukicha itihas sangun gair samaz psrvat aahet .
Aaple khup khup aabhar mahiti dilya baddal
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.
Brahmananni nakarla asa sangnya aadhi neet vichar kara. Bajirao brahman hote mhanun kahihi bolu naka. Aapan swata vichar kara ki tumhi pardharmachya vyaktishi naata jodal ka. Nakarla asta tar tyacha sambhaal koni kela, peshwe bainnich na.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.
छान माहिती मिळाली धन्यवाद..!!????????
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.
खुप छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली आहे मराठ्यांचा खरा इतिहास social app च्या माध्यमातून लोकांपर्यन्त पोहोचत आहे
Sadhya kalachi garaj ahain sarva bhartiyana ekatra rahnyachi.
दादा सुरवातीला च चुकले तुम्ही थोरले बाजीराव हे मराठा साम्राज्याचे 6 वे नाही द्वितीय पेशवा (पंतप्रधान)होते