दूधाचे विविध प्रकार आणि दूध पिण्याचे अद्भुत फायदे

types of milk, different types of milk and their benefits, badam milk, soya milk, organic milk, cow milk benefits, 10 benefits of milk, benefits of buffalo milk, goat milk benefits, milk benefits in marathi, दुधाचे महत्व, doodh in marathi, milk information in marathi, dudhache prakar

आपल्या सर्वांनाच दुधाचं महत्त्व चांगलंच ठाऊक आहे. आपण नेहमीच दुधाचा वापर आपल्या आहारामध्ये करतच असतो, कारण दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणावरती आढळतात. तुम्हाला माहिती आहे का दुधाचे देखील अनेक प्रकार आहेत आणि मानवी शरीरानुसार त्याचा फायदा आणि तोटा देखील आपल्या शरीराला होतच असतो. चला तर मग जाणून घेऊया दुधाच्या या प्रकारांबद्दल…..

आपण आपल्या आहारामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करत असतो आणि आपल्या संपूर्ण आहाराबद्दल आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण दुधाबद्दल विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत, दुधाचे देखील अनेक प्रकार आहेत जे आपल्या शरीराला फायदेशीर आहेत.

टोन्ड मिल्क, लॅक्टोज मिल्क, सेट फ्री मिल्क, ऑरगॅनिक मिल्क, क्रिम मिल्क असे दुधाचे अनेक प्रकार आज बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. यातील बरीचशी नावं आपण कदाचित पहिल्यांदा ऐकत असाल परंतु शरीराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे दूध बाजारात आज उपलब्ध आहे. आपण अशाच विविध प्रकारच्या दुधाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण विविध वनस्पती मार्फत उपलब्ध होणाऱ्या दुधाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

types of milk, different types of milk and their benefits, badam milk, soya milk, organic milk, cow milk benefits, 10 benefits of milk, benefits of buffalo milk, goat milk benefits, milk benefits in marathi, दुधाचे महत्व, doodh in marathi, milk information in marathi, dudhache prakar
Types of Milk

बदाम दूध

मित्रांनो बदामा पासून तयार होणारे दूध हे अत्यंत लोकप्रिय आहे आणि सामान्यपणे हे दूध मोठ्या प्रमाणावर आहारामध्ये देखील वापरले जाते कारण या दुधामध्ये कोलेस्ट्रॉल आणि लॅक्टोज हे घटक नसतात. हे दूध आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

सोया दूध

सोयाबीन पासून उत्पादित केलेल्या दुधाला सोया दूध असं म्हटलं जातं. शाकाहारी जीवनशैली जगणाऱ्या व्यक्तींसाठी सोया दूध अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तीला लॅक्टोजची एलर्जी आहे अशी व्यक्ती हमखास सोया दूध वापरते. या दुधामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असतात.

राईस किंवा ओट्स दूध

या पदार्थांपासून उत्पादित केलेले दूध अत्यंत गोड आणि चवदार असते. या दुधामध्ये प्रोटीन आणि विटामिनचे प्रमाण खूप कमी असते. पण ज्यांना दूध अजिबात चालत नाही अशा व्यक्तींसाठी मात्र हे दूध अमृत ठरू शकते.

नारळापासून तयार केलेले दूध

नारळापासून तयार केलेले दूध संपूर्ण आशिया खंडात प्रचंड लोकप्रिय आहे. या दुधामध्ये साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असते आणि या सोबतच या दुधामध्ये पोषक तत्व तसेच विटामिन आणि प्रोटीन हे अत्यंत मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे आशिया खंडात हे दूध मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने या दुधाला अजून जागतिक स्तरावर मान्यता दिलेली नाही कारण या दुधामध्ये फॅटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.

काजू दूध

जेव्हा काजूला थोड्याशा पाण्यासोबत आपण मिक्स करून त्याला ग्राईंड करतो तेव्हा एक मलाईदार पदार्थ तयार होतो, या पदार्थाला काजूचे दूध असे म्हटले जाते. या दुधात देखील साखरेचे प्रमाण कमी असते आणि या दुधाला तुम्ही घरी तयार करून घ्यावे म्हणजे यातील पोषक तत्वांचा प्रमाण कमी होणार नाही.

types of milk, different types of milk and their benefits, badam milk, soya milk, organic milk, cow milk benefits, 10 benefits of milk, benefits of buffalo milk, goat milk benefits, milk benefits in marathi, दुधाचे महत्व, doodh in marathi, milk information in marathi, dudhache prakar
Benefits of Milk

आता आपण प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधाबद्दल माहिती जाणून घेऊयात

गाईचं दूध

आपल्या संस्कृतीमध्ये गाईला माता म्हणून संबोधण्यात आलेलं आहे, कारण गाईपासून तयार होणाऱे दूध मानवी शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. या दुधामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शिअम असतात. या दुधापासून तयार होणारे इतर पदार्थ देखील मानवी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. या दुधाचे अनेक फायदे आहेत, या दुधाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होते. तुमच्या शरीरातील हाडांना मजबूत करण्याचे काम देखील हे दूध करते, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाईचं दूध अत्यंत महत्त्वाचं असतं, आपल्या दातांच्या मजबुतीसाठी देखील गाईचं दूध मोठ्या प्रमाणावर सेवन करण्यात येतं.

बकरीचे दूध

बकरीचे दूध देखील दिसायला गाईच्या दुधासारखेच असते. या दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते, हे दूध पचायला अत्यंत चांगलं असतं, त्यामुळे हे दूध देखील सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतं.

म्हशीचे दूध

या दुधामध्ये फॅटचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती असते. त्यामुळे लहान मुलांना पचण्यासाठी हे दूध अवघड जाते. या दुधामध्ये साखरेचे प्रमाण खूप अधिक प्रमाणात असते तरीही भारतात आणि महाराष्ट्रात दैनंदिन वापरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात म्हशीचे दूध वापरले जाते.

उंटाचे दूध

उंटाच्या दुधाचा स्वाद थोडा खारट असतो, हे दूध अफगानिस्तान आणि इतर आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या दुधामध्ये विटामिन सी देखील मोठ्या प्रमाणावर आढळतो.

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here