Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे फायदे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे पाहणे आणि योग्य काळजी घेणे विसरलो आहे. एखादी शारीरिक तक्रार जाणवू लागल्यावर जवळच्या डॉक्टरकडेही न जाता सरळ सरळ मेडिकल मधून त्यावर औषध घेऊन आपण त्याला दूर करतो आणि पुढे सरकतो. पण खरंच हा योग्य मार्ग आहे का ? दूरगामी विचार करता आपण स्वतःला मोठ्या संकटात टाकण्याचा प्रयत्न करत असतो.

या दोन्ही गोष्टींना आळा घालून आरोग्यदायी राहण्याचा उपाय म्हणजे योग्य जीवनशैली. रोजच्या जीवनात अगदी छोटे छोटे घरगुती उपाय किंवा घरगुती गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्ही रोगराई पासून दूर राहता आणि फिट राहता. जस की दररोज हळद दूध पिणे, आले टाकलेला चहा पिणे यापैकीच एक महत्वाचा भाग म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे. तुम्हाला वाटेल एवढं काय त्यात पण आजच्या या लेखात सकाळी एक ग्लास गरम पाणी पिण्याचे फायदे वाचून उद्यापासून याचा अवलंब करायला लागाल.

त्वचा रोगांपासून मुक्तता

तुम्ही तुमची त्वचा उजळावी म्हणून तसेच चेहऱ्यावरील विविध त्रासासाठी आतापर्यंत 100 प्रकारच्या क्रीम खरेदी करून वापरल्या असतील पण फार काही प्रभाव जाणवला नसेल. दररोज सकाळी कोमट पाणी प्या आणि ज्यामुळे तुम्ही त्वचेवरील सगळ्या रोगांपासून दूर राहाल आणि तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल.

मजबूत पाचक प्रणाली

अनेकांना पाचक समस्यांचा खूप त्रास होतो. अगदी सार्वजनिक ठिकाणी चार चौघात याचा त्रास जाणवू लागल्यावर आपल्याला सहन न होता मग वेगवेगळे चूर्ण खाऊ लागतो पण यापासून नैसर्गिकरित्या मुक्तता मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर ग्लास भरून गरम पाणी प्या आणि पाचक त्रासाला बाय बाय करा.

राहा निरोगी

आपण दिवसभरात अनेक पदार्थ खात असतो तर त्यावर प्रक्रिया होऊन अनेक विषारी द्रव्ये सुद्धा तयार होत असतात. दररोज सकाळी गरम पाणी पिल्याने अन्ननलीकेतील विषारी द्रव्ये घामाच्या रुपात बाहेर पडतात आणि तुम्ही निरोगी राहता.

कमी करा वजन

जगातील निम्या लोकांना ग्रासलेला आजार म्हणजे अति वजन. लोक वजन कमी करण्यासाठी काय काय करत नाहीत? पण दररोज सकाळी एक ग्लास गरम पाणी पिल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्याची याची फारच मंद गती असल्याने तुम्हाला गुण दिसायला वेळ लागू शकतो.

याच गरम पाण्यात एक लिंबू पिळून जर पाणी पीत असाल तर अजून उत्तम. यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळून प्रतिकारशक्ती दररोज वाढवली जाते.

नेहमीच तरुण

म्हातारपण नकोय तर मग तुम्हाला दररोज सकाळी एक ग्लास गरम पाणी प्यावे लागेल. या आधीच आपण गरम पाणी त्वचेच्या विकारांना दूर ठेवतो हे वाचल आहे पण त्या सोबतच वय वाढताना त्वचेत होणारे बदल या पाणी पिण्याचे सवयीमुळे कमी प्रमाणात होतात आणि तुमची त्वचा तरुण राहते.

वाढवा केसांची चमक

दररोज सकाळी गरम पाणी पिल्याने तुमच्या केसांच्या वरही परीणाम होतो. शरीरातील विषारी घटक लवकर बाहेर पडत असल्याने तुम्ही तंदुरुस्त राहता आणि तुमच्या केसांची चमक वाढण्यास मदत होते.

पिरियड्स मध्ये मदत

महिलांसाठी ही सवय वरदानच ठरेल. पिरियड्स दरम्यान स्नायू मध्ये विशिष्ठ ताण असतो, आणि सकाळी गरम पाणी पिल्याने हा ताण कमी होण्यास मदत होते.

इन्फोबझ्झ ने दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. इतर कोणत्याही विषयावरील तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंट करून कळवा त्याची पूर्तता लवकरच करण्यात येईल.


2 Comments
  1. Pratiksha galande says

    Kami age madhe kes white hone ya sub chi information havi ahe.

  2. yogesh premraj sonawane says

    Dudhache ky fayde aahet

Leave A Reply

Your email address will not be published.