Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

वयाच्या ४४व्या वर्षी पहिला सिनेमा साइन करणारा ऍक्टर

सर्व्हिस वेटर ते बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता…Boman Irani चा थक्क करणारा प्रवास वाचण्याजोगा आहे

सिनेसृष्टीत प्रत्येकालाच कष्ट करणे अनिवार्य आहे आणि असेच कष्ट करून अनेक अभिनेते- अभिनेत्री आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. अशाच यशस्वी आणि कष्ट करून मोठा झालेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत ‘बोमन इराणी…’ Boman Irani यांना अभिनेता म्हणून वयाच्या ४४ वर्षी यश मिळाले. तोपर्यंत त्यांचे आयुष्य कष्ट करण्यामध्येच गेले. त्यांनी मुन्ना भाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स, डॉन, हॅपी न्यू इयर, पीके आणि दिलवाले यासारख्या एक से बढकर एक सिनेमांमध्ये काम केले आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेला लोकांनी दाद दिली.

boman irani age, zenobia irani, boman irani tv shows, boman irani first movie name, boman irani biography, boman irani in marathi, boman irani story, boman irani waiter, बोमन इराणी, बोमन इराणी मराठी
(Source – News Bugs)

बोमन इरानी (Boman Irani) यांचा जन्म २ डिसेंबर १९५९ रोजी मुंबई इथे झाला. बोमन यांनी त्यांचे शिक्षण सेंट मॅरी हायस्कूल पुणे येथून पूर्ण केले. तेव्हा त्यांना Dyslexic या नावाचा आजार होता. या आजारामुळे त्यांना काही शब्दांचा उच्चार करणे आणि शब्दांची ओळख करणे अवघड जात होते. काही काळानंतर वैद्यकीय उपचारानंतर त्यांचा हा आजार कमी झाला आणि नंतर पूर्णपणे नाहीसा झाला.

हॉटेलमध्ये वेटरची नोकरी

बोमन इराणी यांनी मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून वेटर बनण्याचा अभ्यास केला आणि तो पूर्ण करून त्यांनी ‘ताज महाल पॅलेस अँड टॉवर’ या हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस म्हणून काम केले. तसेच, त्यांनी फ्रान्सच्या एका हॉटेलमध्ये देखील काम केले आहे. साधारण २ वर्ष त्या हॉटेलमध्ये काम केल्यानंतर ते पुन्हा भारतात त्यांच्या घरी परतले आणि परत आल्यावर त्यांनी त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेली बेकरी सांभाळायला सुरुवात केली. हि बेकरी बोमन इराणी यांच्या अगोदर त्यांची आई सांभाळत होती. त्यांनी त्यांच्या वयाच्या ३२ वर्षापर्यंत बेकरी चालवली. बोमन इराणी यांची बेकरी मुंबईच्या ग्रांट रोडवर होती.

बोमन इराणी यांना आधीपासूनच सिनेमाची आवड होती पण त्या सोबतच ते फोटोग्राफी देखील करायचे. बोमन इराणी यांनी १९९१ मध्ये मंबईत होणाऱ्या बॉक्सिंग वर्ल्ड कप चॅम्पियनशिपचे अनेक फोटोज काढेल. तसेच त्यांनी शाळेतील कार्यक्रमांचे, शाळेतील स्पोर्ट्सचे आणि इतर इव्हेंट्सची देखील फोटोग्राफी करायचे.

अभिनयाचे वेड

इतर कामं करत असताना त्यांच्या डोक्यातील अभिनयाचे वेड मात्र जात नव्हते. त्यांनी अभिनेता बनण्यासाठी १९८१ ते १९८३ पर्यंत अभिनयाचे गुरु हंसराज सिद्दीकी यांच्याकडे अभिनयाचे शिक्षण घेतले. बोमन इराणी यांनी आपल्या अभिनयाची आवड पूर्ण करण्यासाठी अनेक थियेटर शोमध्ये काम करणे सुरु केले आणि या शोमधील सर्वात जास्त लोकप्रिय झालेला शो ‘आय एम नॉट अ बाजीराव’ हा होता. पुढे जाऊन बोमन इराणी यांची फंटा, क्रॅकजॅक बिस्कीट आणि सिएट टायर्स या ब्रॅण्ड सोबतच इतर जाहिरातींमध्ये काम केले.

boman irani age, zenobia irani, boman irani tv shows, boman irani first movie name, boman irani biography, boman irani in marathi, boman irani story, boman irani waiter, बोमन इराणी, बोमन इराणी मराठी
(Source – IndianExpress)

असेच काम करत असताना ‘विनोद चोप्रा’ यांना बोमन मधील कलाकार दिसला आणि त्यांनी बोमन यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या हातात २ लाखाचा चेक देऊन त्यांच्या पुढच्या चित्रपटामध्ये घेतेले.

बोमन इराणी यांचा पहिला चित्रपट ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा होता जो राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला होता आणि या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्व प्रेक्षकांना खूप आवडली आणि या चित्रपटनानंतर बोमन इराणी यांनी यशाची एक एक पायरी चढायला सुरुवात केली.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.