अबब…. ! इतक्या कंपन्यांचा मालक आहे विराट कोहली

Virat Kohli ची Brand Value 2100 करोड पेक्षा जास्त आहे. मग विचार करा विराट किती आणि कोणत्या कंपन्यांचा मालक असेल….
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या सर्वांनाच परिचित आहे. विराट जेवढा यशस्वी क्रिकेटर आहे तेवढाचं यशस्वी उद्योजक सुद्धा आहे. त्याने अनेक उद्योगांमध्ये पैसा गुंतवला आहे आणि त्यातून प्रचंड पैसा कमावला देखील आहे. आज आपण बिझनेसमन विराट कोहली बद्दल जाणून घेऊया….
मित्रांनो विराट कोहलीचे स्वतःचे ब्रँड आहेतच पण त्याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही इतरही काही गोष्टी जाणून घेणे गरजेचं आहे. सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाचा Virat Kohli एकमेव असा खेळाडू आहे ज्याचे इंस्टाग्रामवर 55 मिलीयन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी विराटला १ करोड 35 लाख रुपये मिळतात. अशाच काही गोष्टींमुळे विराट सर्वात जास्त कमावणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत येतो. एवढं आश्चर्य वाटू देऊ नका कारण अशा अनेक गोष्टी या लेखामध्ये तुम्ही वाचणार आहात, त्यामुळे तुम्हाला याहून जास्त आश्चर्याचे धक्के मिळतील.
विराट जाहिरात करत असलेल्या कंपन्या (Brands Virat Kohli Endorses)
विराट अनेक ब्रँडची जाहिरात देखील करतो उदाहरणार्थ TISSOT घड्याळ, मान्यवर, बूस्ट एनर्जी ड्रिंक, ऑडी कार्स, ई. आणि लक्षात घ्या या जाहिरातींच्या एका दिवसाच्या शूटिंगसाठी Virat Kohli जवळपास ५ ते ६ करोड रुपये घेतो. विराटच्या बॅटवर तुम्ही MRF या कंपनीचं स्टिकर नक्कीच बघितलं असेल हे स्टिकर लावण्यासाठी विराटला MRF कडून वर्षाला १२ करोड रुपये मिळतात.
विराटने PUMA या ब्रॅंड सोबत आठ वर्षांसाठी, तब्बल ११० करोडची डिल देखील केलेली आहे, जी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी डिल आहे.या काही अशा कंपन्या होत्या ज्यांच्यासाठी विराट जाहिराती करतो परंतु काही कंपन्या अशा देखील आहेत ज्या विराटच्या स्वतः च्या मालकीच्या आहेत.
विराट कोहलीची मालकी असलेल्या कंपन्या (Businesses owned by Virat Kohli)
WROGN कंपनीचे शेअर्स विराटने 2012 मध्ये विकत घेतले होते, आता सचिन तेंडुलकर सोबत विराट देखील या कंपनीचा मालक आहे. यासोबतच विराटने लंडनमधील एका कंपनीसोबत Convo Sports म्हणून एक स्पोर्ट्स ॲप लॉन्च केलेलं आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून Virat Kohli सर्व प्रकारच्या खेळाच्या चाहत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.
मित्रांनो तुम्ही विराट कोहलीच्या फिटनेसचे फॅन असाल, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विराट एवढा फिटनेस कोणाचाच पाहण्यात आलेला नाही आणि विराटच्या याच फिटनेस वेडामुळे त्याने मध्यंतरी Chisel Gym साठी जवळपास 90 करोड रुपये खर्च केले आहेत. त्याने या पैशातून जिमला एक्सपांड करण्यासाठी मदत केलेली आहे.
विराटला क्रिकेट सोबतच फुटबॉल हा खेळ देखील प्रचंड आवडतो त्यामुळेच त्याने काही दिवसांपूर्वी Indian Super League मधील FC Goa संघाचे स्टॉक देखील विकत घेतलेले आहेत, या सोबतच त्याने दुबईमधील एक टेनिस टीम देखील खरेदी केली होती. या टेनिस टीम मध्ये याआधी रॉजर फेडरर सारखे दिग्गज खेळाडू देखील होते. यासोबतच विराट Pro Wrestling League मधील Bengaluru Yoddha या टीमचा सहमालक आहे.
विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू (Virat Kohli Brand Value) 237.5 Million एवढी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 2100 करोड रुपये एवढी. या सगळ्या ब्रँड व्यतिरिक्त विराटच्या मालकीचा अजून एक ब्रँड आहे आणि तो म्हणजे One 8. असं म्हटलं जातं की 2021 पर्यंत या कंपनीचे मोबाईल देखील भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध असतील. या कंपनीचे अनेक उत्पादनं आधीच भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. या कंपनीने वर्षभरातच 100 कोटींचा आकडा पार केलेला आहे. One 8 ने PUMA सारख्या मोठ्या ब्रँड सोबत टाय अप केलेलं आहे. तुम्ही विराटला सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेलच कि Virat Kohli चं दिल्लीमध्ये स्वतःच Restaurant देखील आहे, ह्या रेस्टोरंटचं नाव Nueva असं आहे.
तर मित्रांनो क्रिकेटर विराट कोहली बद्दल तुम्हाला आधीच माहिती होती पण आज तुम्ही बिझनेसमन विराट कोहली बद्दल सुद्धा जाणून घेतलं. तुमचे मित्र विराटाचे फॅन असतील तर त्यांना यातलं किती माहिती आहे एकदा विचारून बघा, नाहीतर आपला हा लेख त्यांना वाचायला द्या.