Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

एकदा झाल्यावर पुन्हा कोरोना संसर्ग होतो का ?

कोरोनाची बाधा होऊन बरे झाल्यावर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता किती ?

जग 2020 चे आगमन मोठ्या दिमाखात करण्यात मग्न होते तेव्हा चीनमध्ये सुरू झालेला हा फ्लू सगळ्या जगभरात धुमाकूळ घालेल असं कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून तो थांबण्याची अजूनही काही चिन्हे नाहीत. कोरोना व्हायरस पूर्णपणे समजला नसल्याने अजूनही त्यावर मात करण्यासाठी अडचणी त्यात आहेत. अनेक प्रश्नानपैकी एक म्हणजे कोरोनाची बाधा होऊन बरे झाल्यावर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता किती ?

पुन्हा कोरोना संसर्ग, कोरोना, कोरोना संसर्ग, प्रतिकारशक्ती, Covid, Cocid infection
bbc.com/marathi

जगाला स्तब्ध करणारा हा रोग एकदा झाल्यावर पुन्हा होऊ शकतो असे मत संसर्गजन्य रोगाच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर काही तज्ज्ञांनी कोरोना एकदा झाल्यावर परत होणार नाही अस म्हंटल आहे. तज्ज्ञांच्या या परस्परविरोधी मतांमुळे सामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर तो पुन्हा पुन्हा होत असेल तर आयुष्य भेसूर होऊन जाईल अशी भीती जगभरातील लोकांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाची बाधा झाली आणि त्यातून तुम्ही पूर्णपणे बरे झालात तर पुन्हा त्या विषाणूची बाधा होण्याची शक्यता खूपच कमी आहे अस अमेरिकेतील तज्ज्ञांनी म्हंटल आहे.”

तसेच कोरोनामधून बरे झालेल्या व्यक्तींना पुन्हा कोरोना झाल्याच्या घटना ऐकायला मिळत आहेत पण यावर ठोस पुरावा नाही, असाही त्यांनी मत व्यक्त केले आहे. याला सुसंगत असे मत हार्वर्ड विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ मार्क लिपसीच यांनीही केले आहे.

प्रतिकारशक्ती वाढवा

कोरोना विषाणूचा परिणाम लोकांवर कमी अधिक प्रमाणात होत आहे. म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीनुसार हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो किंवा करत नाही. म्हणजेच सध्या हा आजार पुन्हा होतो की नाही पेक्षा आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे गरजेचे आहे. यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजे. कोरोना सारख्या भयानक आजाराचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोप्पे आणि घरगुती उपाय

Leave A Reply

Your email address will not be published.