Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

चांद्रयान-२ बनला आहे ट्विटरवर सर्वात जास्त ट्रेंडिंग हॅशटॅग, सध्या चर्चा आहे फक्त इसरोचीच

६७ हजार ५५४ हॅशटॅग वोल्युमसह चांद्रयान-२ बनले आहे सर्वाधिक ट्रेंडिंग हॅशटॅग. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत हे हॅशटॅग्स

सध्या देशात व विदेशातही एकच चर्चा आहे ती चांद्रयान-२ ची. इसरो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशनची चांद्रयान-२ हि मोहीम विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा सर्वाधिक चर्चिली जाणारी बातमी बनली आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार चांद्रयान -२ हा मोस्ट ट्रेंडिंग म्हणजेच सर्वात जास्त ट्रेंड करणारा हॅशटॅग बनला आहे.

chandrayan 2, mission chandrayaan 2, trending hashtags on twitter chandrayan-2, chandrayaan 2 news update in marathi, vikram lander and pragyan rover, isro chandrayaan 2
(Image Source – Lunar and Planetary institute)

१ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत चांद्रयान-२ संबंधी ६७ हजार ५४४ ट्विट्स केले गेले आहेत. semrush या ऑनलाईन व्हिजिबिलिटी मॅनेजमेंट कंपनीद्वारा केल्या गेलेल्या शोधादरम्यान हि माहिती समोर आली आहे. semrush नुसार सध्या ट्विटरवर चांद्रयान-२ व विक्रमसंबंधी ट्विट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

semrush चे कम्युनिकेशन हेड फर्नांडो अंगुलो ह्यांनी सांगितले कि इसरोच्या कामासंबंधी लोक खूपच उत्सुकता दाखवत आहेत. विशेष बाब म्हणजे चांद्रयान-२ ला अपेक्षित यश मिळण्यात इतके अडथळे येत असून सुद्धा ट्विटरवर भारतीयांच्या प्रतिक्रिया सकारात्मक आहेत. ६७ हजार ५५४ हॅशटॅगसह चांद्रयान-२ प्रथम स्थानावर तर हॅशटॅग विक्रम लॅण्डर व हॅशटॅग इसरो अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.