Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ की ‘स्वातंत्र्यवीर’ ?

शंभूराजेंच्या पराक्रमाच्या लढाया सांगण्याऐवजी फक्त शेवटचा प्रसंग सारखा सांगून त्यांची प्रतिमा ‘धर्मवीर’ म्हणून रुजविण्याचे खास प्रयत्न दिसून येतात.

छत्रपती शिवराय आणि महाराणी सईबाईसाहेब यांचे पुत्र आणि स्वराज्याचे युवराज संभाजीराजे. लहानपणीच सईबाईसाहेबांचा स्वर्गवास झाला आणि मग पुढची सगळी जडणघडण ही राजमाता जिजाबाई यांच्या कडूनच झाली. इतिहासातील अनेक प्रसंगात युवराज संभाजी शिवछत्रपती सोबत होते, राज्यकारभार करण्यासाठी लागणारे जवळपास सगळे डावपेच ते शिवछत्रपतींकडूनच शिकले. मराठ्यांच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास शिवछत्रपतींना वगळता संभाजीराजेसारखा साहसी, पराक्रमी, स्वातंत्र्यप्रेमी आणि सुसंस्कृत असा दुसरा छत्रपती झाला नाही. शिवछत्रपतींच्या नंतर चारी बाजूने स्वराज्यावर येणाऱ्या शत्रूला चित करुन त्यांनी आपला पराक्रम दाखवून दिलाच आहे यासोबतच मराठ्यांचा हा छत्रपती राजनीतिशास्त्र, अध्यामशास्त्र, शृंगारशास्त्र अश्या अनेक विषयात ते तज्ज्ञ होते. शंभुराजेंनी लिहिलेल्या ‘बुधभूषणम्’ ग्रंथामुळे तर त्यांच्या अथांग सांस्कृतिक उंचीची प्रचिती मिळते.

जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठी लढणाऱ्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीची मात्र कादंबरीकरांनी, नाटककारांनी आणि सिनेमावाल्यानीही विटंबना केली. तब्बल इतकी वर्षी शंभूराजेबद्दल अनेक प्रसंग लढवून त्यांना कलंक ठरवण्यात आले.

जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठी लढणाऱ्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीची मात्र कादंबरीकरांनी, नाटककारांनी आणि सिनेमावाल्यानीही विटंबना केली. तब्बल इतकी वर्षी शंभूराजेबद्दल अनेक प्रसंग लढवून त्यांना कलंक ठरवण्यात आले. सुदैवाने गेल्या काही वर्षात वा सी बेंद्रे, डॉ कमल गोखले, सदाशिव शिवदे, शिवाजीराव सावंत आणि जयसिंगराव पवार या इतिहासकार आणि साहित्यिकांनी संभाजी महाराजांची योग्य बाजू लोकांसमोर मांडण्याचं काम केले. सोबतच अमोल कोल्हे यांच्या मार्फत निर्माण झालेल्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेद्वारे शंभुराजेंचा पराक्रमी इतिहास घरोघरी पोचला आहे. यामुळे संभाजी महाराजांची योग्य प्रतिमा जनसामान्यांनमध्ये रुजण्यास हातभार लागत आहे.

सध्या आपण पाहिल्यास समाजमाध्यमांवर मराठयांच्या दुसऱ्या छत्रपतींच्या पराक्रमाच्या आणि सहसाच्या अनेक लढाया संगण्याऐवजी फक्त शेवटचा प्रसंग सारखा सारखा सांगून त्यांची प्रतिमा ‘धर्मवीर’ म्हणून लोकांच्यात रुजविण्याचे खास प्रयत्न दिसून येतात. या मागे अनेक सामाजिक आणि राजकीय कारणे असू शकतात पण ही गोष्ट नक्कीच चिंताजनक आहे. संभाजी महाराजांना धर्मवीर ठरवण्याचे प्रयत्न ऐतिहासिक पुराव्यांना धरून आहेत का हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊया.

कोणताही इतिहास मांडायचा म्हंटल्यास त्यास आधार हवा आणि तो मिळतो विविध इतिहासाच्या साधनांमधून जस की तत्कालीन पत्रव्यवहार, बखरी, प्रवास वृतांत, ताम्रपट, भित्तीचित्रे आणि भारताच्या बाबतीत आधुनिक इतिहासासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या डायरी. पण इतिहासाची मांडणी करताना सगळ्यात जास्त महत्व येते ते तत्कालीन पत्रव्यवहार आणि वृतांत या दोन साधंनाना कारण त्यांचा प्रथम दर्जा आणि विश्वासार्हता. याबाबत आपण इथे माहिती घेत आहोत कारण प्रथम दर्जा आणि अधिक विश्वासार्हता असणाऱ्या कोणत्याही साधनांमध्ये शंभूराजेंनी धर्मसाठी मृत्यू स्वीकारला असल्याचं बोललं गेलेलं नाही.

हा मुद्दा नीट समजून घेण्यासाठी काही उदाहरणे आपण पाहूया..

उदाहरण पाहिले
साकी मुस्तदखान हा औरंगजेबाचा चित्रकार. छत्रपती संभाजी महाराजांना छावणीत आणले तेव्हा हा तिथे उपस्थित होता. इतिहासाच्या नोंदीनुसार हा महाराजांच्या शेवटच्या क्षणांनाचा साक्षीदार आहे. औरंग्याने खरंच असा कोणताही प्रस्ताव महाराजांना दिला असता तर त्याची नोंद या चित्रकाराच्या ग्रंथात असती पण त्याच्या ग्रंथात महाराजांना मुस्लिम होण्याचा कोणताही प्रस्ताव दिल्याची नोंद नाही.

उदाहरण दुसरे
ईश्वरदास नागर हा औरंग्याच्या दुसरा चित्रकार. ईश्वरदासच्या नुसार महाराजांना औरंग्यासमोर हाजीर केल्यानंतर त्याने राजेंना दोनच प्रश्न विचारले 1) ‘तुझे खजिने आणि इतर संपत्ती कुठे आहे ? 2) मुघल सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करत होते? ईश्वरदासच्या नोंदी मध्ये सुद्धा महाराजांना मुस्लिम होण्याचा कोणताही प्रस्ताव दिल्याची माहिती नाही.

मग धर्मांतर आणि औरंग्याच्या मुलगी या गोष्टी आल्या कुठून

धर्मांतर आणि औरंग्याच्या मुलगी बाबत रंगवल्या जाणाऱ्या अनेक तथाकथित भाकडकथा, तत्कालीन प्रसंगानंतर तब्बल 150 वर्षांनी लिहिलेल्या मल्हार रामराव यांच्या बखरीमध्ये आढळून येतात, आणि ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यास काडीचा आधार नाही. यासारखाच चोपड्यांची बखर प्रसिद्ध आहे. या चोपडेच्या मते ‘शंभूराजे औरंग्याला भेटायला दिल्लीला गेले. तेव्हा खुशामत चालू असताना औरंग्याने त्यांना मुसलमान होण्याचा प्रस्ताव दिला आणि राजेंनी त्यास मुलगी देत असाल तर मंजूर असे उत्तर दिले. यानंतर चिडलेल्या औरंग्याने महाराजांचे डोळे काढले.’ मुळात ज्या चोपडेंना संभाजी महाराजांना कुठे मारले हेच माहीत नाही त्याच्या माहितीची काय विश्वासार्हता ?

आपण पाहिल्याप्रमाणे इतिहासातील महत्वाच्या कोणत्याही साधनांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिम होण्याचा अथवा त्यांनी धर्मसाठी आपला जीव दिल्याच्या नोंदी नाहीत. पण त्यानंतर कोणत्याही पुरव्याशिवाय लिहिलेल्या मल्हार रामराव आणि चोपडे बखर ज्याला महाराजांचा मृत्यू कुठे झाला माहीत नाही या आधारावर आपण महाराजांची प्रतिमा धर्मवीर म्हणून रुजवणे कितपत योग्य ?

मग मराठ्यांच्या या दुसऱ्या छत्रपतींची खरी प्रतिमा काय ?

शिवरायांनी 6 जूनला स्वतःचा राज्याभिषेक करवून ‘छत्रपती’ पद धारण केले आणि स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची घोषणा केली. मुघलांच्या नाकावर टिच्चून उभे राहिलेलं स्वतंत्र राज्य पाहून औरंजेब खवळला होता आणि त्याची आग आता त्याच्या मस्तकात जात होती. दुर्दैवाने पुढच्या काहीच वर्षात शिवरायांचा स्वर्गवास झाला आणि आता मराठ्यांना सहज पाणी पाजू या विचाराने तो निर्धास्त झाला. 1682 मध्ये जून जुलै महिन्यात औरंग्याने मराठ्यांना हरवण्याचा उद्देशाने पूर्ण तयारी करून सर्व भागातून मुघल सैन्य स्वराज्यत घुसवले पण मराठ्यांच्या ह्या दुसऱ्या छत्रपतींने मुघलांची पळताभुई थोडी करून धमक दाखवून दिली. झालेल्या प्रकारामुळे मराठ्यांना हारावण्याची आग आता औरंग्याच्या मस्तकात गेली.

इंग्रज पत्रव्यवहारात या प्रसंगाबाबत म्हणतात,

“बादशाहाला आलेल्या अपयशाने तो इतका चिडून गेला की, त्याने आपल्या डोक्यावरची पगडी फेकून दिली आणि संभाजीचा नायनाट केल्याशिवाय ती पुन्हा डोक्यावर न घालण्याची शपथ घेतली!”

पुढच्याच वर्षीची अजून एक घटना. हळू हळू पोर्तुगीजानी गोवा भागात आपला वरचष्मा निर्माण केला आणि यानंतर त्यांना मराठ्यांना हरवण्याची स्वप्ने पडू लागली म्हणूनच की काय उतावीळ झालेल्या पोर्तुगीज व्हॉइसराय स्वराज्याचे दक्षिण टोक असलेल्या फोंडा किल्ल्यावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने आला, पण मराठयांच्या दुसऱ्या छत्रपतींच्या पराक्रमाच्या नुसत्या गोष्टी एकणाऱ्या पोर्तुगीज्यांना ती प्रत्यक्षात पाहायला सुद्धा मिळली. भंबेरी उडालेल्या व्हॉइसराय कसा बसा निसटून परत आपल्या राजधानीत पोचला पण संभाजी महाराज गोव्यावर चालून येत आहेत हे एकूण त्याचा थरकाप उडाला इतका की त्याने त्या झेवीयर्सची शवपेटी उघडून त्याच्या पायाशी आपला राजदंड ठेवला आणि रक्षणासाठी जोरजोरात याचना करू लागला.

मराठयांचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या पराक्रमाची आपल्या समोर दोनच उदाहरणे ठेवली आहेत. फक्त 9 वर्षाच्या कारकीर्दले अशे हजारो पराक्रम सांगता येतील. इथं आपल्याला विचार करावा लागेल की भाकडकथामध्ये सांगितलेले धर्मवीर संभाजीराजे खरे की औरंग्याला डोक्यावरची पगडी उतरवायला लावून, पोर्तुगीज यांच्यासोबत चारी बाजुंनी शत्रूची दाणादाण उडवणारे पराक्रमी संभाजीराजे खरे? नीट विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की छत्रपती संभाजीराजेंची स्वातंत्र्यवीर, रणवीर, पराक्रमी आणि बहादूर हीच प्रतिमा इतिहासाच्या पुराव्यांना धरून आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारी सुद्धा आहे.

यावर ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार म्हणतात

“धर्मवीर संभाजी’ ही संभाजी महाराजांची प्रतिमा काही समाजकारण्यांना व राजकारण्यांना साहाय्यक ठरत असली तरी इतिहासाला ती साहाय्यक ठरत नाही! आज समाजाला‚ देशाला; इतिहासात आपल्या कामगिरीने व आत्मबलिदानाने अमर झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर संभाजी’ची गरज आहे. इतिहासाचा हाच संदेश आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करू तर आम्हीच पुढे पस्तावू.”


1 Comment
  1. kaustubh shukla says

    Important topic and reliable writing…too good!

Your email address will not be published.