Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा धीरूभाई अंबानी यांनी बॉम्बे डाईंग आणि इंडियन एक्सप्रेसला घाम फोडलेला.

नुस्ली वाडिया आणि रामनाथ गोएंका ह्या दोन दिग्गजांना धीरूभाई अंबानी एकटेच भिडलेले. भारताच्या इतिहासातील हे सर्वात मोठ्या Corporate War पैकी एक मानले जाते.

२००६ साली कॉर्पोरेट नावाचा एक चित्रपट आला होता. बाजारपेठेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन उद्योगपतींमध्ये कसा संघर्ष रंगतो, अधिकाधिक नफा कमावण्यासाठी राजकीय आणि आर्थिक डावपेच कसे वापरले जातात यावर हा चित्रपट आधारीत होता. या चित्रपटाची कथा जरी काल्पनिक असली तरी बऱ्याचश्या काल्पनिक गोष्टी या वास्तवात घडत असतात आणि म्हणूनच त्या कल्पनेच्या माध्यमातून समोर येतात.

व्यवसाय म्हटला की स्पर्धा ही आलीच आणि स्पर्धा आली की वैर, कटुता याही गोष्टी यायला वेळ लागत नाही. धीरुभाई अंबानी आणि नुस्ली वाडिया ही उद्योग जगतातील दोन नावाजलेली व्यक्तिमत्त्व. एक रिलायन्सचे शिल्पकार तर दुसरे बॉम्बे डाईंगचे मालक. एकेकाळी या दोन दिग्गजांमध्ये असा काही संघर्ष रंगला होता, ज्यात मध्यस्थी करुन शांतता निर्माण करण्यासाठी आलेले इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे निर्माते रामनाथ गोयंकाही ओढले गेले.

धीरुभाई अंबानी आणि नुस्ली वाडिया यांच्यामधील संघर्षाचे कारण

गुजरातच्या चोरवाडचे असलेले धीरुभाई ७० चे दशक येता येता पॉलिस्टर किंग बनले होते. तर दुसरीकडे नुस्ली वाडिया यांचे कुटुंब जवळपास १५० वर्षांपासून शिपिंगच्या व्यवसायात होते. नुस्ली (Nusli Wadia) यांचा आणखी एक परिचय द्यायचा झाल्यास ते मोहम्मद अली जिन्हा याचे नातू होते. यासोबतच ते टाटा घराण्याशी देखील संबंधित होते.

ramnath goenka, bombay dyeing, Dhirubhai Ambani vs Nusli Wadia in marathi, polyster war, corporate war in india, reliance and bombay dyeing polyster war, indian express and Dhirubhai ambani, war between ambani and wadia, ramnath goenka and Dhirubhai ambani, रिलायंस विरुद्ध बॉम्बे डाईंग, धीरूभाई अंबानी, नुस्ली वाडिया, रामनाथ गोएंका, इंडियन एक्सप्रेस, पॉलिस्टर वॉर
Dhirubhai Ambani vs Nusli Wadia in Marathi

या दोन दिग्गजांमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याचे कारण होते दोन केमिकल कंपाऊंडसच्या उत्पादनावरील वर्चस्व. डाई मिथाइल टेरेफ्थेलेट (डीएमटी) आणि प्योरिफाइड टेरेफ्थैलिक एसिड (पीटीए) ही रसायनं पॉलीस्टर बनवण्याच्या कामी येतात. नुस्ली वाडिया यांची पसंती DMT ला होती तर धीरुभाई PTA मार्फत पॉलिस्टर बनवू इच्छित होते.

वर्चस्वाच्या लढाईवरून दोन दिग्गज आमने-सामने

१९७७ पर्यंत रिलायंस एक लिमिटेड कंपनी बनली होती. त्याच वर्षी बॉम्बे डाईंगने डीएमटीच्या उत्पादनासाठी सरकारकडे लायसन्सची मागणी केली. मात्र त्याची मंजुरी मिळता मिळता ४ वर्षे लोटली आणि १९८१ चे साल उजाडले. तोपर्यंत Dhirubhai Ambani नी समीकरण बदलून टाकले होते. जाणकार सांगतात की अंबानी समूहाने त्यावेळी वृत्तपत्रांमार्फत अशी बातमी चालवली होती की बॉम्बे डाईंगने डीएमटी बनवण्यासाठी परदेशातून जी मशीन आयात केली आहे, ती दुय्यम दर्जाची असून त्यातून तयार होणारे डीएमटी देखील कमी प्रतीचा असेल.

मात्र तोपर्यंत पॉलिस्टर बनवण्यासाठी धीरुभाई देखील डीएमटीचाच वापर करत होते. तो डीएमटी ते विदेशी कंपन्या आणि आईपीसीएल या सरकारी कंपनी कडून खरेदी करायचे. सांगितलं जातं की भूतकाळातील काही गोष्टींवरुन संबंध ताणले गेल्याने धीरुभाई बॉम्बे डाईंगकडून डीएमटी खरेदी करु इच्छित नव्हते. एवढंच नाही तर भविष्यात डीएमटीकडून पीटीएकडे शिफ्ट होण्याची धिरुभाईंची योजना होती.

१९८४ साली इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधी सरकार अस्तित्वात आले आणि व्ही.पी.सिंह अर्थमंत्री झाले.

सरकारने पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये रिलायंसला पीटीए प्लांट लावायची मंजुरी देऊन टाकली.

या गोष्टीने बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या. कारण बॉम्बे डाईंगला ४ वर्षांच्या सरकारी लेटलतिफी नंतर डीएमटी प्लांट उभारायची परवानगी मिळाली होती.

सरकारी नियमांमुळे आलेली अडचण आणि धीरुभाईंनी खेळलेली चाल

मात्र भविष्यात वेगळ्याच घडामोडी घडल्या. व्ही.पी.सिंहांनी डीएमटी आणि पीटीएला आयात प्रतिबंधीत यादीत टाकले. याचा अर्थ साफ होता की कंपनीला आयात करण्याआधी सरकारची परवानगी घ्यावी लागणार. परवानगीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने रिलायंसला नुकसान होण्याची दाट शक्यता होती. तर दुसरीकडे नवीन प्लांटमधून तयार पीटीए मिळण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार होता.

याचा अंतिम परिणाम हा होता की आता रिलायंसला Bombay Dyeing कडून डीएमटी घ्यावे लागणार, सरळ सरळ ६० कोटींचा अतिरिक्त खर्च. कारण त्यावेळी डीएमटी आयात केलेल्या पीटीएपेक्षा प्रतिटन ४००० रुपये महाग होते आणि त्यातच धीरुभाई नुस्ली वाडियांसोबत व्यापारही करु इच्छित नव्हते.

ramnath goenka, bombay dyeing, Dhirubhai Ambani vs Nusli Wadia in marathi, polyster war, corporate war in india, reliance and bombay dyeing polyster war, indian express and Dhirubhai ambani, war between ambani and wadia, ramnath goenka and Dhirubhai ambani, रिलायंस विरुद्ध बॉम्बे डाईंग, धीरूभाई अंबानी, नुस्ली वाडिया, रामनाथ गोएंका, इंडियन एक्सप्रेस, पॉलिस्टर वॉर
Nusli Wadia – Owner of Bombay Dyeing

धीरुभाईंची नेत्यांपासून ते सरकारी बाबूंसोबतची जवळीक साऱ्यांना माहित होती. सरकार असा निर्णय घेणार याची माहिती त्यांना त्यांच्या या खास लोकांकडून आधीच मिळाली आणि त्यांनी २ दिवसांत कसेबसे ६० हजार टन पीटीए आयात करण्यासाठी ११० कोटी रुपयांचे लेटर ऑफ क्रेडिट जारी करुन टाकले. परिणामी त्यांची वर्षभर लागणाऱ्या पीटीएची गरज भागली.

धीरुभाईंची चाल आणि व्ही.पी. सिंहांचा पलटवार

Dhirubhai Ambani यांच्या या चालीने सारेच चाट पडले. मात्र वार झाला की पलटवार हा होतोच. व्ही.पी.सिंहांनी पीटीएवरील आयात शुल्क १४० वरुन १९० टक्के केले. त्यांच्या या निर्णयामुळे रिलायंसला होणारा फायदा जवळपास संपुष्टात आला. दुसऱ्या बाजूला बॉम्बे डाईंगाच्या अपेक्षांवर देखील पाणी फेरले गेले. त्यांना डीएमटीच्या काही खास ऑर्डर मिळाल्या नाही. परिणामी १९८६ साली नुस्ली वाडियांना प्लांट बंद करावा लागला.

याच वर्षी वित्तमंत्री व्ही.पी.सिंह यांनी लायसन्स राजमधून बरीचशी सूट देऊन व्यापाऱ्यांना दिलासा दिला. पीटीए आणि डीएमटीवर आकारले जाणारे आयात शुल्क हटवण्यात आले. त्याचसोबत २१ कंपन्यांची एक यादी जारी करण्यात आली ज्यांनी सरकारचे उत्पादन शुल्क मोठ्या प्रमाणात थकवले होते. रिलायंस त्यापैकी एक होती.

Reliance च्या स्कीमला दणका

स्वतःचे कर्ज कमी करण्यासाठी रिलायंसाने सुरु केलेल्या नॉन कन्व्हरटेबल डिबेंचर्सला शेयर्स मध्ये बदलण्याच्या कृतीवर सरकारने पाबंदी आणत रिलायंसला दुसरा दणका दिला. इंडियन एक्स्प्रेसचेच सहायक वृत्तपत्र असणाऱ्या Financial Express मध्ये याबद्दल अनेक लेख छापून आले होते,

कशाप्रकारे रिलायंस वित्तीय नियमांमध्ये असणाऱ्या झोलचा फायदा उठवत स्वतःचे कर्ज कमी करुन घेते, याबद्दल हा लेख होता. वृत्तपत्राने याला ‘रिलायंस लोन मेला’ असे नाव दिले होते.

काही खोट्या कंपन्या बँकांकडून १८ टक्क्याने कर्ज घेऊन १३ ते १५ टक्के नफा देणाऱ्या रिलायंसचे डिबेंचर्स खरेदी करत. तसं पाहता हा सरासर घाट्याचा सौदा होता. पण इथेच खरी मेख होती. खरेदी केलेले डीबेंचर्स नंतर शेयर्समध्ये बदलले जायचे आणि कंपनीला मोठा फायदा व्हायचा. रिलायंसचे शेयर्सचे तोपर्यंत मौल्यवान मानले जाऊ लागले. वृत्तपत्राने हा आरोप केला की या साऱ्या कंपन्या धीरुभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आहेत. बँकांची भूमिका आल्याने आरबीआयने ही स्कीम बंद करण्याचे आदेश दिले आणि इथूनच गोयंकांनी नुस्ली वाडियांचा हात धरला.

इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या Ramnath Goenka यांची एंट्री

जाणकारांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या मुरली देवरा यांनी धीरुभाईंची रामनाथ गोयंका यांच्याशी भेट घालून दिली होती. गोयंका नुस्ली वाडियांना पहिल्यापासून ओळखायचे. नुस्लींचा तत्वनिष्ठ स्वभाव व प्रामाणिकता त्यांना ठाऊक होती. गोयंका यांनी आधी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि तो काही प्रमाणात सफल देखील झाला. याच दरम्यान नुस्ली वाडिया धीरुभाईंच्या मुलीच्या लग्नात देखील सहभागी झाले. पण दोघांमधील शांतता फार काळ टिकली नाही.

प्रसिद्ध पत्रकार वीर संघवी यांच्या म्हणण्यानुसार गोयंका यांचे असे मानणे होते की धीरुभाईंनी त्यांना धोका दिला. धीरुभाईंनी त्यांना भरोसा दिला होता की ते नुस्लींसोबत दोन हात करणार नाहीत. पण नंतर ते आपल्या शब्दावरुन मुकरले.

ramnath goenka, bombay dyeing, Dhirubhai Ambani vs Nusli Wadia in marathi, polyster war, corporate war in india, reliance and bombay dyeing polyster war, indian express and Dhirubhai ambani, war between ambani and wadia, ramnath goenka and Dhirubhai ambani, रिलायंस विरुद्ध बॉम्बे डाईंग, धीरूभाई अंबानी, नुस्ली वाडिया, रामनाथ गोएंका, इंडियन एक्सप्रेस, पॉलिस्टर वॉर
Ramnath Goenka – Founder of Indian Express

गोयंका आणि धीरुभाई यांच्यात संबंध बिघडण्याची कारणे

बोललं जातं की धीरुभाई आणि गोयंका यांचे संबंध ताणले जाण्यास आणखी एक घटना जबाबदार होती. ती म्हणजे इंडियन एक्स्प्रेसने त्यावेळी रिलायंसच्या विरोधात एक बातमी छापून आणली होती. ‘रिलायंस पिटीएच्या आयातीत आणि नंतर त्याच्या उत्पादनासाठी मशीन लावताना सरकारी नियम धाब्यावर बसवत आहे, या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे’ या आशयाची ती बातमी होती.

या बातमीनंतर धिरुभाईंनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या हवाल्याने Indian Express च्या बातमीला चुकीची ठरवण्याच्या उद्देशाने आपली बाजू मांडत अशी बातमी चालवली की रिलायंसची चौकशी करण्याची मागणी दोषपूर्ण आणि पूर्वग्रहदूषित आहे. रामनाथ गोयंका त्यावेळी पीटीआयचे अध्यक्ष होते. या बातमीने ते चांगलेच संतापले.

अजून एक किस्सा म्हणजे एकदा धीरुभाई आणि गोयंका योगायोगाने एकाच फ्लाईटमधून प्रवास करत होते.

तेव्हा मस्करित धीरुभाई म्हणाले, इंडियन एक्स्प्रेसच्या प्रत्येक पत्रकाराची एक किंमत आहे, रामनाथ गोयंका यांची सुद्धा एक किंमत आहे.

तटस्थ आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोयंकाना ही गोष्ट अजिबात सहन होणारी नव्हती, त्यांनी धीरुभाईंना धडा शिकवण्याचे ठरवले.

यासाठी त्यांनी अतिशय हुशार अशा गुरुमुर्ती स्वामिनाथन या चार्टर्ड अकाऊंटंटला रिलायंस विरोधातील मोहिमेत सहभागी करुन घेतले आणि ते रिलायंसच्या मागे हात धुवून लागले. रोज नवनवीन खुलासे होऊ लागले आणि रिलायंसला एकामागोमाग एक धक्के बसायला सुरवात झाली.

संघर्षाचे स्वरुप धीरुभाई विरूद्ध वाडिया न राहता धीरुभाई विरूद्ध गोयंका झाले

१९८६ साल हे या संघर्षाचे निर्णायक वर्ष होते. धीरुभाई यावर्षी आजारी पडले आणि रामनाथ गोयंका यांच्यासारख्या दिग्गजासमोर त्यावेळी मुकेश अंबानी अगदी नवखे होते. त्यांनी ताबडतोब मुकेश अंबानींनवर टीका करायला सुरवात केली. त्यांच्या आक्रमक पवित्र्याने मुकेश अंबानी पुरते लडखडून गेले. मुकेश पहिल्या धक्यातून सावरत नाही तोच त्यांच्यावर दुसरा आघात केला जायचा.

धीरुभाई अमेरिकेहून उपचार घेऊन आले आणि परतल्या परतल्या सर्वात पहिली भेट रामनाथ गोयंका यांची घेतली. भेट सफल झाली, दोघांमध्ये समझोता झाला. मात्र हा समझोता ३ आठवड्यांपेक्षा फार काळ टिकू शकला नाही. तिकडे ऑनलुकर या मॅगझिनद्वारे रिलायंसने नुस्ली वाडियांवर अटॅक करायला सुरवात केली.

रिलायंसच्या या वागण्याने गोयंका पुन्हा संतापले. त्यांनी आपल्या लेखात असा आरोप केला की रिलायंसने सरकारच्या निश्चित मानकांपेक्षा जास्त मशीनरीची आयात करुन आपली उत्पादन क्षमता बेकायदेशीररित्या वाढवली आहे. त्यावेळी लायसन्स राज असल्याने उत्पादनावरती सुद्धा सरकारचे नियंत्रण होते.

याचा परिणाम असा झाला की रिलायंसला साडेसात हजार कोटींचा दंड ठोठावला गेला. हा रिलायंसवर आत्तापर्यंतचा सर्वात तगडा घाला होता. दुसरीकडे रिलायंसही गोयंका आणि नुस्ली वाडियांवरती अटॅक करतच होती.

संघर्षाचा परिणाम

डिसेंबर १९८४ मध्ये रिलायंसच्या पूर्णतः परिवर्तनीय डिबेंचर्स स्किमला स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त यश मिळाले. या यशाकडे रिलायंसने नुस्ली वाडियांवरती केलेली मात म्हणून पाहिले जाऊ लागले. सरकारने लायसन्सच्या नियमांमध्ये आणखी सूट दिली.

ramnath goenka, bombay dyeing, Dhirubhai Ambani vs Nusli Wadia in marathi, polyster war, corporate war in india, reliance and bombay dyeing polyster war, indian express and Dhirubhai ambani, war between ambani and wadia, ramnath goenka and Dhirubhai ambani, रिलायंस विरुद्ध बॉम्बे डाईंग, धीरूभाई अंबानी, नुस्ली वाडिया, रामनाथ गोएंका, इंडियन एक्सप्रेस, पॉलिस्टर वॉर
Ramnath goenka and Dhirubhai Ambani clash

एप्रिल १९८७ साली इंडियन एक्सप्रेसच्या देशभरातील कार्यालयांवरती टाकण्यात आलेले छापे, एक्सप्रेसच्या दिल्लीतील कार्यालयातील कामबंद आंदोलन, तसेच दरम्यानच्या काळात गोयंका यांच्या मोठ्या मुलीचे झालेले निधन. या एका मागोमाग एक घडणाऱ्या घटनांमुळे Ramnath Goenka यांची लेखणी जवळपास थांबूनच गेली.

१९८९ साली राजीव गांधी सरकारमधून व्ही.पी.सिंह यांना काढण्यात आले. रिलायंसाच्या पीटीए प्लांटमध्ये उत्पादन सुरु झाले. त्यावर्षी कंपनीने जवळपास १७०० कोटींचा नफा कमावला. नुस्ली वाडिया पासपोर्ट संबंधित एका चर्चित प्रकरणात ओढले गेले. याच वर्षी Reliance ने लार्सन अँड टुब्रो या कंपनीचे अधिग्रहण केले. धीरुभाई जिंकताना दिसत होते.

Dhirubhai Ambani जिंकतायत असे दिसत असतानाच मिळालेली कलाटणी

मात्र बाजू कोणत्या क्षणी पलटेल याचा कधीच भरवसा नसतो, इथेही तेच झालं. लार्सन अँड टुब्रोच्या अधिग्रहणात काही उणीवा असल्याने गोयंका पुन्हा रिलायंसच्या मागे लागले. बोफोर्स प्रकरणावरती स्वार होत व्ही.पी.सिंह पंतप्रधान झाले. रिलायंसला लार्सन अँड टुब्रोचे अधिग्रहण सोडावे लागले. एवढंच नाही तर नुस्ली वाडियांना कायमस्वरूपी संपवण्याचा आरोप देखील रिलायंसवर झाला.

१९९० चे वर्ष रिलायंससाठी जबरदस्त ठरले. बॉम्बे डाईंग खूप मागे पडली आणि पॉलिस्टरच्या व्यवसायात रिलायंसचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले. सुरवातीला या संघर्षाचे स्वरुप Reliance vs Bombay Dyeing असे होते. मात्र मध्यस्थी करुन शांतता निर्माण करण्यासाठी आलेले रामनाथ गोयंका यात ओढले गेले आणि संघर्षाचे स्वरुप Reliance vs Indian Express असे झाले.

म्हणूनच कॉर्पोरेट चित्रपटाचे सार येथे लक्षात घेतले पाहिजे. ‘कंपनीशी भावनात्मकरित्या जोडले जाणे हानिकारक ठरु शकते’


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.