Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

शाळेचं नाव ‘इंदिरा गांधी’ आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शाळेत जायला नकार दिलेला

केवळ एका ६ वर्षाच्या पोराच्या तोंडून ‘ते’ वाक्य ऐकून सारेच चाट पडले….. काय होतं शाळेत न जाण्याचं कारण ?

२०१४ हे वर्ष बऱ्याच राजकीय उलथापाथींचे ठरले. माध्यमांपासून ते जनतेपर्यंत आलेल्या मोदी लाटेने बड्या बड्या राजकीय धेंडांना पराभवाची धूळ चारली. ही लाट एवढी शक्तिशाली होती की निवडणुकीनंतरही कित्येक महिने तिचा प्रभाव होता, ज्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला अनेक राज्यांत झाला. या अनेक राज्यांपैकी एक राज्य महाराष्ट्र देखील होते. १९९९ सालापासून महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती.

devendra fadnavis age, devendra fadnavis family, devendra fadnavis photo, devendra fadnavis biography in marathi, gangadharrao fadnavis, devendra fadanavis in marathi, devendra fadnavis story in marathi, devendra fadnavis information in marathi, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, देवेंद्र फडणवीस मराठी माहिती, मुख्यमंत्री फडणवीस, फडणवीस बायोग्राफी, devendra fadanvis father, devendra fadnavis and indira gandhi school, devendra fadnavis mahiti, इंदिरा कॉन्व्हेन्ट स्कूल
2014 Election Result

लोकसभेत मिळालेल्या दणदणीत यशामुळे भाजपच्याही आकांक्षा वाढल्या होत्या. अधिक जागा मिळाव्या या हट्टापायी भाजप सेनेची २५ वर्षांची युती तुटली आणि महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे चारही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढले. निवडणुकीचा निकाल आला तेव्हा भाजप सत्ता स्थापनेपासून अवघ्या काही जागा दूर होता. शेवटी भाजप शिवसेना पुन्हा एकत्र आले आणि १९९५ नंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले.

भाजपला शंभराहून अधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होणार, हे तर साहजिकच होते. पण तो कोण असणार यावरुन अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. महाराष्ट्रातील भाजपचे अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने त्यांच्यापैकीच कोणीतरी मुख्यमंत्री होणार असेच सर्वांना वाटत होते. पण जेव्हा मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर झाले, तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. कारण ते नाव होते देवेंद्र फडणवीस यांचे.

सतत टिव्हीवरील चर्चांमध्ये दिसणाऱ्या, पक्षाची प्रभावीपणे बाजू मांडणाऱ्या, अभ्यासू आणि आक्रमक Devendra Fadanvis ना महाराष्ट्र तसा ओळखत होता. पण मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल असे कोणालाच वाटले नव्हते, खुद्द फडणवीसांनाही नाही.

devendra fadnavis age, devendra fadnavis family, devendra fadnavis photo, devendra fadnavis biography in marathi, gangadharrao fadnavis, devendra fadanavis in marathi, devendra fadnavis story in marathi, devendra fadnavis information in marathi, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, देवेंद्र फडणवीस मराठी माहिती, मुख्यमंत्री फडणवीस, फडणवीस बायोग्राफी, devendra fadanvis father, devendra fadnavis and indira gandhi school, devendra fadnavis mahiti, इंदिरा कॉन्व्हेन्ट स्कूल
Devendra Fadnavis story in Marathi

राजकीय प्रवासाला सूरवात आणि एकाहून एक विक्रमांची नोंद

फडणवीसांच्या राजकीय प्रवासाला सूरवात नगरसेवकाच्या रूपाने झाली. पण सर्वात खास बात म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी नागपूर महापालिकेत ‘सर्वात कमी वयाचा नगरसेवक’ म्हणून निवडून येण्याचा रेकॉर्ड तर त्यांनी केलाच. सोबतच २६ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर पद भूषवून ‘देशातील सर्वात कमी वयाचा दुसरा महापौर’ बनण्याचा विक्रम देखील प्रस्थापित केला.

राजकारणात प्रवेश करताच एकामागून एक विक्रम करणारे फडणवीस (Devendra Fadanvis) भविष्यात ‘महाराष्ट्राचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री ते सर्वात कमी काळ मुख्यमंत्री’ असाही एक विक्रम करतील, असेही कोणाला वाटले नसेल किंबहुना त्यांना स्वतःलाही नाही.

वडिलांकडून राजकारणाचे धडे आणि राजकीय जीवनात यशस्वी वाटचाल

देवेंद्र फडणवीसांचे राजकीय गुरु खुद्द त्यांचे वडील गंगाधरपंतच होते. गंगाधरपंतांच्या समाजकारणाची सूरवात संघाचे प्रचारक म्हणून झाली. पुढे जनसंघात प्रवेश करुन त्यांनी राजकारणाचाही श्रीगणेशा केला. त्यांचे पक्षासाठीचे निष्ठापूर्ण काम पाहून जनसंघ आणि जनता पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवले.

devendra fadnavis age, devendra fadnavis family, devendra fadnavis photo, devendra fadnavis biography in marathi, gangadharrao fadnavis, devendra fadanavis in marathi, devendra fadnavis story in marathi, devendra fadnavis information in marathi, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, देवेंद्र फडणवीस मराठी माहिती, मुख्यमंत्री फडणवीस, फडणवीस बायोग्राफी, devendra fadanvis father, devendra fadnavis and indira gandhi school, devendra fadnavis mahiti, इंदिरा कॉन्व्हेन्ट स्कूल
Gangadharrao Fadanvis – Father of Devendra Fadanvis

वडीलांचे समाजकारण आणि राजकारण देवेंद्र फडणवीस जवळून पाहत होते. फक्त पाहताच नव्हते तर एकलव्याप्रमाणे त्यातून धडेही घेत होते. त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरु झालेला राजकीय प्रवास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचला, याला कारण वडिलांकडून घेतलेले राजकीय धडे, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची हुशारी आणि प्रभावी भाषण कौशल्य हेच होते.

मुख्यमंत्री म्हणून पदभार आणि समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात

फडणवीस मुख्यमंत्री झाले खरे पण मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवणे, हे त्यापेक्षा अधिक कठीण काम असते. अशातच त्यांच्या कार्यकाळात मराठा क्रांती मोर्चा, भीमा कोरेगाव प्रकरण, धनगर आरक्षण, मंत्र्यांवर होणारे भ्र-ष्टा-चाराचे आरोप, मित्रपक्षांची नाराजी यांसारखे अनेक चढउतार आले.

काही वेळेला तर फडणवीसांचे मुख्यमंत्री पद जाते की काय अशीच स्थिती निर्माण झाली होती. पण देवेंद्र फडणवीसांनी समोर आलेल्या प्रत्येक अडचणीवर अत्यंत हुशारीने मात करुन, आपल्या राजकीय बुद्धीचार्तुयाची चुणूक सर्वांनाच दाखवून देत भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावली.

इंदिरा कॉन्व्हेन्ट स्कूल आणि जिद्दी देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis यांनी एखादा प्रण केला की ते मागे हटत नाहीत, हे तर आपण सर्वांनीच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पाहिले. भलेही त्यांनी अजित पवारांसोबत नव्याने स्थापन केलेले सरकार ८० तासात कोसळले. पण त्यांनी निवडणुकीवेळी दिलेली ‘मी पुन्हा येईन’ ची हाक खरी करुन दाखवली.

devendra fadnavis age, devendra fadnavis family, devendra fadnavis photo, devendra fadnavis biography in marathi, gangadharrao fadnavis, devendra fadanavis in marathi, devendra fadnavis story in marathi, devendra fadnavis information in marathi, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, देवेंद्र फडणवीस मराठी माहिती, मुख्यमंत्री फडणवीस, फडणवीस बायोग्राफी, devendra fadanvis father, devendra fadnavis and indira gandhi school, devendra fadnavis mahiti, इंदिरा कॉन्व्हेन्ट स्कूल

त्यांच्या या जिद्दीपणाचा असाच एक किस्सा ते लहान असताना घडला. फडणवीस ६ वर्षांचे असताना घरच्यांनी त्यांचे ऍडमिशन ‘इंदिरा कॉन्व्हेन्ट स्कूल’मध्ये केले. पण ते काही केल्या शाळेत जायलाच तयार होईनात. जेव्हा घरच्यांनी कारण विचारलं तेव्हा ‘ज्यांनी माझ्या वडलांना तु-रुंगात टाकलं त्यांच्या नावाच्या शाळेत मी अजिबात जाणार नाही’ असं त्यांनी ठामपणे सांगितलं. एका ६ वर्षाच्या पोराचं हे असं उत्तर ऐकून सारेच चाट पडले.

देवेंद्र फडणवीसांचे वडील जनसंघाचे नेते असल्याने इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आ-णीबाणीत त्यांना तु-रुं-गवास भोगावा लागला होता. त्यामुळे आपल्या वडिलांना इंदिरा गांधींमुळे जे-लमध्ये जावं लागलं, ही गोष्ट फडणवीसांच्या मनात घर करुन बसली.

घरच्यांनी खूप समजावूनही फडणवीसांनी कोणाचे एक एकले नाही. शेवटी त्यांच्या आईने त्यांना ‘सरस्वती विद्यामंदिर’ शाळेत टाकले, तेव्हा त्यांनी शाळेत जाण्यास सूरवात केली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत बिनसल्याने फडणवीसांना विरोधी बाकावर बसावे लागले. पण तिथेही आज ते प्रभावीपणे काम करतायत. त्यांचे राजकीय चातुर्य, बोलण्यातील हुशारी आणि सतत पुढे जाण्याची जिद्द हेच त्यांच्या यशामागील गमक असून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

Leave A Reply

Your email address will not be published.