Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

यावर्षी बनवा Eco-friendly राखी, ती पण घरात आधीच असलेल्या वस्तूंचा वापर करून.

लॉकडाउनमुळे राखी खरेदीची चिंता करताय ? यावर्षी सोपी आणि सुंदर राखी घरीच बनवा.

२०२० च्या मार्च पासून भारतात आणि त्या आधीही पासून जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या वातावरणात साजरा होणारा पहिला मोठा सण रक्षाबंधन. भारतभर असलेल्या लॉकडाऊन मुळे प्रत्येक हालचालींवर कमी अधिक प्रमाणात निर्बध आहेत. यामुळे राख्या तयार करणे आणि लोक त्या खरेदी करण्यासाठी बाहेर पडणे काहीस शक्य वाटत नाही. यातच विस्कळीत आणि महाग झालेली कुरिअर सेवा अधिकच भर.

या परिस्थितीत आपण जितके शक्य असेल तितके प्रयत्न करून सध्या पद्धतीने सण साजरा करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, माझ्या काकूंनी मला तिच्या वतीने माझ्या वडिलांच्या मनगटावर धागा बांधण्यास सांगितले. दरम्यान, मी माझ्या चुलतभावाला विचारपूर्वक जपून ठेवलेल्या मागील वर्षाची राखी पुन्हा वापरण्यास सांगितले.

Eco-friendly rakhi, Eco-friendly राखी, सुंदर राखी, वाचना वाघले, हॉबी क्विल्स, HobbyQuills, Marathi Viral
Source-Google

तरीही, तुम्ही घरीच राखी बनवूंन तुमच्या भावावरचे प्रेम अधिक ठळक करू शकता. पुण्यातील पर्यावरण-जाणीव कलाकार वाचना वाघले यांनी यावर भन्नाट उपाय त्यांच्या फेसबुक पेज वर शेअर केला आहे. अगदी बेटर इंडियाने सुद्धा त्यांच्या संपर्क करून बोलणे केले आणि यावर आर्टिकल सुद्धा पोस्ट केले आहे. वाचना वाघलेचे हॉबी क्विल्स हे फेसबुक पेज तिच्या पर्यावरणावरील प्रेमाची साक्ष आहे. यावर त्या जुन्या किंवा खराब झालेल्या कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू कशा बनवायची हे दाखवतात.

“माझा नेहमीच वस्तूवर प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यावर भर असतो. माझ्या मित्राने दिलेल्या प्रोत्साहने २०१५ मध्ये मी फेसबुक पेज काढले आणि त्यावर कानातले, घर सजावटीच्या आणि इतर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या वस्तू पोस्ट करण्यास सुरवात केली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी भरभरून कौतुक केल्यानंतर मी या वस्तू आता विकायला सुद्धा सुरवात केली आहे.”

गोष्टी कल असतो. २०१ in मध्ये माझ्या मित्राच्या प्रोत्साहनावर, मी फेसबुकवर माझे क्विल, कानातले, घर सजावटीच्या वस्तू इत्यादी वस्तू दाखविण्यासाठी आलो. “खूप कौतुकाचा वर्षाव झाला आणि मी हळूहळू त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली,”

– वाचना वाघले

वाचना वाघले यांनी घरातील विविध टाकाऊ वस्तूपासून राखी बनवण्यास सुरवात केली पण लवकरच त्यांच्या लक्षात आले कि सगळीकडे कुरिअर सेवा विस्कळीत झाली आहे. पण यावर लगेच थंड बसणाऱ्यातल्या त्या नाहीत. त्यांनी घरात आधीच असलेल्या वस्तूंचा वापर करून Eco-friendly राखी कशी बनवायची याबद्दल विडिओ शेअर करण्यास सुरवात केली. याला लोकांनाही चांगला प्रतिसाद दिला आहे.

वाचना वाघले यांच्या राखी बनवण्याच्या पायऱ्या अगदी सोप्या आहेत. घरात आधीच असलेल्या वस्तूंचा वापर करून Eco-friendly राखी बनवण्यासाठी खालील पायऱ्या पहा. यासोबत विविध फोटो पण शेअर केले आहेत त्याची घ्या.

काय वस्तू लागतील ?

 • कात्री
 • सुई
 • कपड्याचा एक जुना तुकडा
 • बॉक्सचा पुठ्ठा
 • अन्नधान्य
 • मार्कर
 • रंग

यासाठी किती वेळ लागेल – २० ते २५ मिनिट

Eco-friendly rakhi, Eco-friendly राखी, सुंदर राखी, वाचना वाघले, हॉबी क्विल्स, HobbyQuills, Marathi Viral
Source – HobbyQuills

राखीचा मुख्य भाग

 • पहिल्यांदा तुम्हाला हव्या त्या साईझ मध्ये कपड्याचा तुकडा कापून घ्या. सर्वसाधारपणे तुकडा चौकोनी असावा म्हणजे चांगला शेप येईल.
 • कडा एक साध्या टाकाने सुरक्षित करा किंवा एक लहान पट बनवा आणि चिकटवा.
 • त्यावर रेखाटण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी अ‍ॅक्रेलिक पेंट्स किंवा मार्कर वापरा. स्केच पेन किंवा नेहमीचे पाण्याचे रंग सुद्धा चालतील.
 • लहान मुलांसाठी यावर broach किंवा विविध स्टिकर्सचा वापर करू शकता.
 • राखीला अधिक उठावदार करण्यासाठी विविध धान्य किंवा चमक सुद्धा वापरू शकता.
Eco-friendly rakhi, Eco-friendly राखी, सुंदर राखी, वाचना वाघले, हॉबी क्विल्स, HobbyQuills, Marathi Viral
Source – HobbyQuills

राखीचा दोरा

 • यासाठी कोणताही कापड बारीबारीक कापून शकता किंवा लोकरीचा वापर करा किंवा एखाद्या धार्मिक दोऱ्याचाही वापर चालेल.
 • राखीच्या दोऱ्याला विविध लूक देऊ शकता. सरळ खुले ठेवू शकता किंवा गाठी बांधू शकता. यासाठी फोटो पहा.
 • दोरीचा शेवट गोंदीने चिटकवणे अधिक योग्य म्हणजे धागे निघणार नाहीत.
Eco-friendly rakhi, Eco-friendly राखी, सुंदर राखी, वाचना वाघले, हॉबी क्विल्स, HobbyQuills, Marathi Viral
Source – HobbyQuills

शेवटचा हात

 • चिटकवण्यासाठी काही ना काही वापरल्याने ते वळण्यासाठी वेळ द्या.
 • शेवटी मुख्य राखीचा भाग दोरीला जोडा.

वाचना वाघले यांनी सांगितलेल्या या भन्नाट रीतीने अगदी घरातील टाकाऊ वस्तूपासून Eco-friendly राखी बनवा आणि तुमच्या भावंडांच्या चेहऱ्यवरचा आनंद द्विगुणित करा.

राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा !

Featured Image Source: HobbyQuills

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More