Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांनी सांगितला चीनच्या समुद्र किनाऱ्यावरील १९९३ सालचा किस्सा…

पवार म्हणाले मला २५-३० वर्षांआधीच कळालं होतं. संरक्षण मंत्री असतानाचा एका किस्सा पवारांनी मुलाखतीत सांगितला. ….

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच ‘सामना’साठी शरद पवार यांची मुलाखत घेतली. ‘एक शरद सगळे गारद’ अश्या नावाने हि मुलाखत बरीच प्रसिद्ध होताना दिलेत आहे. इतर गोष्टींवर चर्चा करताना संजय राऊत यांनी सध्याचा भारत चीन मुद्दा देखील उपस्थित केला.

Sharad pawar, china president li pang, defence minister sharad pawar, india china, ek sharad sagle garad, एक शरद सगळे गारद, शरद पवार, भारत चीन, चीन राष्ट्राध्यक्ष ली पेंग

राऊत पवारांना म्हणाले, ‘तुम्ही भारताचे संरक्षण मंत्री होते आणि त्यावेळी तुम्ही चीन दौरे सुद्धा केले. सध्याची परिस्थिती बघा चीन बद्दल तुमचं मत काय आहे ?’

ह्या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवारांनी २५-३० वर्षांपूर्वीचा चीन दौऱ्यादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला….

पवार म्हणाले, देशाचा संरक्षण मंत्री असताना १९९३ साली मी चीन दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी माझी भेट चीनचे संरक्षण मंत्री यांच्याशी झाली. आम्ही दोन्ही देशांच्या मैत्रीसंबंधी ७ दिवस चर्चा केली. त्यावेळी हिमालयाच्या बॉर्डरवर भारत आणि चीन दोघांचंही सैन्य तैनात असे.

अश्या ठिकाणी सैन्य तैनात करणे खर्चिक होतं, सोबतच इतक्या बर्फाळ प्रदेशात सैन्याला ठेवणं आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक होतं. ह्या मुद्यावर आम्हा दोघांचंही एकमत झाली आणि दोन्ही देशांनी आपापलं सैन्य मागे घेण्याचं ठरवलं.

ह्या कराराचा मसुदा चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दाखवायसाठी आम्ही चीनचे राष्ट्राध्यक्ष ली पेंग यांना भेटायला गेलो. ते एक समुद्र किनाऱ्यावर बसवलेला गावं होतं. तिथे लोक राहत नव्हते. विचारल्यावर कळालं कि कम्युनिस्ट पक्षातील सदस्यांसाठी विश्रांतीकरिता हा परिसर उभारण्यात आला आहे.

Sharad pawar, china president li pang, defence minister sharad pawar, india china, ek sharad sagle garad, एक शरद सगळे गारद, शरद पवार, भारत चीन, चीन राष्ट्राध्यक्ष ली पेंग

चीनचे राष्ट्राध्यक्ष ली पेंग यांनी मला (संरक्षण मंत्री शरद पवार) समुद्रावर फेफटका मारुयात असे म्हणाले. आम्ही दोघे जवळपास तासभर समुद्रावर फिरत होतो. ह्यादरम्यान आमच्यात बरीच चर्चा झाली, मी त्यांना अनेक प्रश्न विचारले.

ली पेंग म्हणाले, आमचं ध्येय चीनला आर्थिक महासत्ता बनवायचं आहे. त्यामुळे आमचं लक्ष्य अमेरिका आणि जपान आहे. आम्हाला जगाला हे दाखवून द्यायचं आहे कि चीन हे राष्ट्र अमेरिकेला तोडीस तोड देऊ शकतं. अमेरिकेला मागे टाकून आम्हाला चीन आर्थिक महासत्ता होऊ शकतो हे दाखवून द्यायचं आहे.

शरद पवारांना त्यांना अजून एक प्रश्न केला. पवार म्हणाले, ‘शेजारच्या देशांबद्दल तुमचं काय मत आहे ?’

ली पांग म्हणाले, आमचं लक्ष्य सध्या अमेरिका आहे. शेजारच्या देशांचा विचार आम्ही सध्या करत नाही. शेजारच्या देशांचा विचार आम्ही २०-२५ वर्षांननंतर करू. हे ऐकल्यानांतर शरद पवारांना तेव्हाच अंदाज आलेला कि सध्या आपल्याला चीनकडून धोका नसला तरीही भविष्यात नक्कीच असेल.

त्या दौऱ्याची आठवण काढत पवार म्हणाले, आज चीन आर्थिक दृष्ट्या आज सक्षम आहे आणि त्यांचा डोळा भारतावर आहे. आपल्याला आज पाकिस्तान पासून जास्त धोका नाही पण चीन पासून नक्कीच आहे.

Sharad pawar, china president li pang, defence minister sharad pawar, india china, ek sharad sagle garad, एक शरद सगळे गारद, शरद पवार, भारत चीन, चीन राष्ट्राध्यक्ष ली पेंग
Leave A Reply

Your email address will not be published.