Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

या 14 वर्षाच्या ज्योतिषीने कोरोनाची भविष्यवाणी आधीच केली होती? खरं आहे का?

सध्या सोशल मीडियावर कोरोना व्हायरस बाबत अनेक गोष्टी फिरत आहेत. यामध्ये खास करून आपली WhatsApp युनिव्हर्सिटी सगळ्यात पुढे आहे यात वादच नाही. हे खाल्याने कोरोना होत नाही, ते केल्याने कोरोना होत नाही तर या गोष्टी केल्याने आपला लागण होण्यापासून बचाव होऊ शकतो असं सांगणारे लाखो मेसेज सोशल मिडीया वरून फिरत आहेत. यामध्ये विज्ञान आधारित गोष्टींचा तर धार्मिक बाबींचा सुद्धा तितकाच समावेश आहे. अशीच एक बातमी सध्या व्हायरल होत आहे ती म्हणजे एक 14 वर्षाच्या ज्योतिषीने कोरोना व्हायरस बाबत भविष्यवाणी आधीच केली होती पण त्यावेळी लोकांनी ती हसण्यावारी नेली आणि आता ते सगळं सत्य होत आहे.

14 वर्षाच्या या ज्योतिषानी केली भविष्यावणीची विडिओ खाली दिलेली आहेत. कर्नाटकच्या असणाऱ्या या 14 वर्षीय ज्योतिषाने पहिल्या विडिओ मध्ये कोरोनाची भविष्यवाणी केल्याचे सांगण्यात आले तर त्याच्याच दुसऱ्या विडिओ मध्ये भगवान श्री राम आणि श्री कृष्ण यांचा नामजप केल्याने कोरोना दूर होऊ शकतो. या दोन्ही विडिओ मध्ये दोन गोष्टींवर दावा केलेला आहे. पहिला म्हणजे 14 वर्षीय ज्योतिष्याने दीड वर्ष आधीच कोरोनाची भविष्यवाणी केली होती आणि दुसरा मंत्रोच्चार केल्याने कोरोना दूर होतो.

ही भविष्यवाणी केलेली विडिओची सत्यता The Lallantop ने तपासली आहे. त्यांनी सांगितले की पहिल्यांदा आम्ही याचा ओरिजनल विडिओ शोधून काढला. स्वतःला ज्योतिषी असण्याचं सांगणाऱ्या या युवकाने जगावर संकट येणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. हा विडिओ तब्बल 50 लाख लोकांनी युट्युब वर पहिला आहे तर सोशल मीडियावर किती फिरला आहे याची गिणती नाही.

https://www.facebook.com/photo.php?fbid=2583232251934059&set=a.1479101392347156&type=3

काय आहे विडिओ मध्ये ?

  1. शनी केतू शुक्र ग्रहांच्या मुळे बरंच काही होणार आहे. यात भविष्यवाणी केली आहे की एप्रिल 2020 मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध होण्याची 99 टक्के शक्यता आहे.
  2. यात पुढे सांगितले आहे की सोने चांदी आणि कच्या तेलाची किमती आभाळाला भिडतील.
  3. तिसरा मुद्दा मांडला आहे की मध्य आशिया मध्ये अमेरिका आणि इराण मध्ये युद्ध पाहायला मिळेल.
  4. भारताविषयी बोलताना भविष्यवाणी केली आहे की भारत ऊर्जेचा मोठा भांडार आहे आणि ऊर्जेचे भारतात हॉटस्पॉट आहेत.
  5. दुसऱ्या विडिओ मध्ये पहिला मुद्दा आहे की सगळ्या जगात नास्तिक पण पसरत आहे आणि सगळ्याच मूळ तेच आहे.
  6. सगळ्यात शेवटी ज्योतिषवाणी म्हणजे उपचारच हत्यार आहे आणि त्यातून जगातील कोणतीही गोष्ट नीट केली जाऊ शकते.

या ज्योतिषी महोदयांचा हा विडिओ इंग्रजी मध्ये आहे तर शेवटच्या 5 मिनिटात ह्याच गोष्टी हिंदी मध्ये सांगण्यात आल्या आहेत.

आता या भविष्यवाणी मधून आपल्या मांडलेले मुद्दे कळले, चला पाहूया सत्य काय –

The Lallantop ने दिलेल्या माहितीनुसार

संपूर्ण विडिओ पाहिल्यानंतर सगळ्यात आधी लक्षात आले, या विडिओ मध्ये अनेक गोष्टींवर भविष्यवाणी करण्यात आली आहे पण कोरोना बाबतची भविष्यवाणी करणारा तेव्हढाच भाग विडिओ मधून कापून फक्त तिलाच व्हायरल केली आहे.

यानंतर यात भविष्यवाणी केली आहे की एप्रिल 2020 मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध होण्याची 99 टक्के शक्यता आहे. पण भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध झालेले नाही हे स्पष्टपणे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे हा दावा खोटा ठरतो.

दुसरा मुद्दा मांडला आहे की सोने चांदी आणि कच्या तेलाची किमती आभाळाला भिडतील. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की गेल्या अनेक महिन्यापासून कच्चा तेलाचे भाव जमिनीवर आलेत आणि सोन्या चांदी बाबत बोलायचं झाल्यास त्या कमी जास्त होत राहतातच. त्यामुळे हा दावा खोटा ठरतो.

तिसरा मुद्दा मांडला आहे की मध्य आशिया मध्ये अमेरिका आणि इराण मध्ये युद्ध पाहायला मिळेल. मुळात जेव्हा पासून ट्रम्प तात्या अमेरिकेत सत्तेवर आले आहेत तेव्हा पासून इराण अमेरिका मध्ये ठिणगी आहे. मागच्या काही महिन्यात इराणच्या एक अति महत्वाच्या व्यक्तीला मारून अमेरिकेनेने इराणला चुचकारले होते पण गर्मभरी घोषणा होण्याशिवाय काहीही घडलेले नाही आणि हे मागच्या 4 वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे हा दावाही खोटा ठरतो.

चोथ्या मुद्द्या मध्ये भारताविषयी बोलताना भविष्यवाणी केली आहे की भारत ऊर्जेचा मोठा भांडार आहे आणि ऊर्जेचे भारतात हॉटस्पॉट आहेत. पण अजूनपर्यंत तरी या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा समोर आलेला नाही.

दुसऱ्या व्हिडिओच्या पहिल्या मुद्यात नास्तिक वर भाष्य करण्यात आले आहे. तर याचाच उलट काही लोक म्हणतात की अस्तिकता जगातील समस्यांच मूळ आहे. जगभरात प्रत्येक देशात अनेक धार्मिक गोष्टी आहेत ज्या विवादास्पद आहेत. यामधून कोणताही धर्म वेगळा नाही. त्यामुळे अस्तिकता आणि नास्तिकता हा संपूर्णपणे वेगळा आणि मोठ्या चर्चेचा विषय आहे. यात दोन्ही बाजूनें प्रहार करणारी लोक जगभरात आहेत. पण या रोगाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास Scientific temprament महत्वाची आहे. विज्ञान कोणत्याही देवावर विश्वास ठेवत नाही तर पुराव्यांनावर विज्ञानाच काम चालत. सध्या तरी या व्हायरस वर कोणत्याही मंत्रोच्चाराचा नाही वैद्यकीय उपचारांची गरज आहे.

शेवटचा मुद्दा आहे ज्योतिषवाणी म्हणजे उपचारच हत्यार आहे आणि त्यातून जगातील कोणतीही गोष्ट नीट केली जाऊ शकते. जगभरातील अनेक लोक अश्या विविध भविष्यवाणी आपल्या सोईनुसार वापरात. हा मुद्दा पूर्णपणे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे.

संपूर्ण मुद्यांचा नीट विचार केल्यास हा दावा पूर्णपणे खोटा ठरतो. आपल्याला विनंती आहे हा विडिओ शेअर करू नका. तुम्हाला सोशल मीडियावर असे विडिओ किंवा पोस्ट दिसल्यास शेअर करण्याआधी तिची सत्यता तपासा आणि मगच शेअर करा. घरीच राहून प्रशासनाला मदत करा आणि सुरक्षित राहा.

संपूर्ण विडिओ

Source – The Lallantop

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More