Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड मधील फेमस डायरेक्टर एका सिनेमासाठी किती पैसे घेतात ?

तुम्हाला माहिती आहे का एका चित्रपट निर्मितीमागे फेमस डायरेक्टर काय काम असते ? चित्रपट निर्मितीमागे दिग्दर्शकाचे काय महत्व असते हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात.

चित्रपट जर एखादे जहाज असेल तर दिग्दर्शक हा त्या जहाजाचा चालक असतो. कागदावर लिहिलेली कथा-पटकथा, संवाद हे सर्व दिग्दर्शकाच्या कॅमेऱ्यातून पाहिले जाते. म्हणजे आपण जो चित्रपट पहात असतो तो सर्व दिग्दर्शकाने त्याच्या मनामध्ये साकारलेला असतो.

यालाच तर म्हणतात खरी इमॅजिनेशन पावर. तर मग विचार करा बाहुबली सारखा जबरदस्त चित्रपट साकारणाऱ्या दिग्दर्शकामध्ये किती इमॅजिनेशन पावर असेल.

चित्रपट सेट वरील सर्व गोष्टींचे निर्णय घेण्याचे काम हे दिग्दर्शक करत असतो. दिग्दर्शकाचे काम हे वाटते तितके सोपे नसते. दिग्दर्शकाच्या विचारानुसार चित्रपट तयार होण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते.

एखादा सिनेमा तयार करण्यासाठी दिग्दर्शकांना दिले जाणारे पैसे म्हणजेच दिग्दर्शकाची फीज वरून जाते जेवढे तो दिग्दर्शक इंडस्ट्रीमध्ये किती यशस्वी आहे.

इथे आम्ही काही चित्रपटसृष्टीतील फेमस डायरेक्टर यादी केली आहे आणि हे दिग्दर्शक निर्मात्यांकडून त्यांच्या प्रकारच्या चित्रपट निर्मितीसाठी किती शुल्क (director fees) आकारतात हे या लेखातून सांगितले आहे.

फरहान अख्तर (Farhan Akhtar)

bollywood, director fees, highest paid director in bollywood, richest director in bollywood, rohit shetty fees, ss rajamouli fees, movie directors remuneration, salary of filmmaker, डायरेक्टर फीज, दिग्दर्शकाची फीज, दिग्दर्शक किती पैसे घेतो, चित्रपट निर्मिती माहिती

फरहान अख्तर बॉलीवूड मधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. फरहानने “दिल चाहता है” या चित्रपटापासून आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात केली. फरहान बॉलिवुडमध्ये नवनवीन कथा आणण्यासाठी लोकप्रिय आहे.

त्याने बॉलीवूडला ‘लक्ष’, ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ सारखे जबरदस्त चित्रपट दिले. असे सांगितले जाते की फरहान एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी जवळपास ४ कोटी रुपये एवढे मानधन स्वीकारतो.

कबीर खान (Kabir Khan)

कबीर खान पूर्वी फक्त बायोपिकच बनवत होते. पण काही काळानंतर कबीर खान यांनी जॉन अब्राहमचा ‘न्युयॉर्क’ हा चित्रपट दिग्दर्शित केला, ज्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रमाणात प्रेम दिले.

कबीर खान यांनी त्यानंतर सलमानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि हा देखील लोकप्रिय ठरला. त्यानंतर त्यांनी सलमानचे बरेचसे बिग बजेट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

कबीर खान आता कपिल देव यांची बायोपिक ’83’ घेऊन येत आहे. कबीर खान एक सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी ८ कोटी रुपये मानधन घेतात.

अनुराग कश्यप (Anurag Kashyap)

bollywood, director fees, highest paid director in bollywood, richest director in bollywood, rohit shetty fees, ss rajamouli fees, movie directors remuneration, salary of filmmaker, डायरेक्टर फीज, दिग्दर्शकाची फीज, दिग्दर्शक किती पैसे घेतो, चित्रपट निर्मिती माहिती

अनुराग कश्यपने आपल्या सिनेमांसाठी एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. निर्मातेही अनुराग कश्यपकडे भरपूर प्रमाणात जातात. कारण चित्रपट निर्मितीचे अनुराग कडे चांगले ज्ञान आहे.

अनुराग कश्यप हे एक असे दिग्दर्शक आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गँग्स ऑफ वासेपूर, रमण-राघव अशा चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

एक सिनेमाचे दिग्दर्शन करण्यासाठी अनुराग ८ कोटी रुपयांचे शुल्क (director fees) आकारतात.

करण जोहर (Karan Johar)

करण जोहर एक फेमस डायरेक्टर म्हणून खूपच लोकप्रिय आहे. करण जोहरचे चित्रपटांमध्ये भरपूर ड्रामा असतो ज्यामध्ये रोमान्स देखील बघायला मिळतो. करण जोहरचे ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ हे गेलेले चित्रपट.

करण जोहर हे एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ९ कोटी रुपये इतके मानधन घेतो असं सांगितल्या जातं.

राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani)

bollywood, director fees, highest paid director in bollywood, richest director in bollywood, rohit shetty fees, ss rajamouli fees, movie directors remuneration, salary of filmmaker, डायरेक्टर फीज, दिग्दर्शकाची फीज, दिग्दर्शक किती पैसे घेतो, चित्रपट निर्मिती माहिती, फेमस डायरेक्टर

राजू हिराणी बॉलीवूड मधील सर्वात हुशार दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. राजू हिराणी यांनी मुन्नाभाई सिरीज, थ्री इडियट, पिके आणि संजू सारखे चित्रपट बनवले आहेत. त्यांनी बनवलेले सर्वच चित्रपट सुपर डुपर हिट ठरले.

राजू हिराणी एका चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे १० कोटी रुपये एवढे मानधन आकारतात.

एस शंकर (S Shankar)

एस शंकर हे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक मोठे दिग्दर्शक आहे. त्यांनी रोबोट आणि रोबोट 2.0 चित्रपट हे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात देखील ते खूप यशस्वी आहे.

बॉलीवूडमध्ये गाजलेला अनिल कपूरच्या ‘नायक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एस शंकर जवळपास १५ कोटी रुपये एवढं मानधन घेतात.

रोहित शेट्टी (Rohit Shetty)

bollywood, director fees, highest paid director in bollywood, richest director in bollywood, rohit shetty fees, ss rajamouli fees, movie directors remuneration, salary of filmmaker, डायरेक्टर फीज, दिग्दर्शकाची फीज, दिग्दर्शक किती पैसे घेतो, चित्रपट निर्मिती माहिती, फेमस डायरेक्टर

रोहित शेट्टी हा बॉलीवूड मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा फेमस डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध आहे. हिट मशीन रोहित शेट्टीने अनेक चित्रपट बनवले आहेत आणि खूपच लोकप्रिय देखील ठरले आहेत.

रोहित शेट्टी सहसा विनोदी आणि एक्शन सिनेमांचे दिग्दर्शन करत असतो. रोहितने गोलमाल सेरीज चे दिग्दर्शन केले आहे. तसेच सिंबा, सिंघम यांसारख्या ॲक्शन पटांचे सुद्धा त्याने दिग्दर्शन केले आहे.

हिट सिनेमे देण्यासाठी प्रसिद्ध असलेला रोहित शेट्टी तब्बल २५ कोटी रुपये मानधन घेतो.

एस एस राजमौली (SS Raamouli)

बाहुबली सारखा भव्य दिव्या चित्रपट बनवणारे दिग्दर्शक ‘एस राजमौली’ हे भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारे दिग्दर्शक आहेत. बाहुबली या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी एस एस राजमौलीने 100 कोटी रुपये एवढे मानधन स्वीकारले होते.

हा चित्रपट बघितल्यानंतर शंभर कोटी रुपये या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देणे योग्यच होते, एवढं मात्र नक्की.


Leave A Reply

Your email address will not be published.