Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जवस खाण्याचे भन्नाट फायदे.

रोजच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्याने अनेक आजारांवर मात करता येते. हळद, ग्रीन टी, फळे यांच्यासोबतच महत्वाचा घटक Flax Seed म्हणजेच जवस. जवस हा बहुगुणकारी आणि महत्वाचा घटक आहे. जवसामध्ये लिगनेंस अँटीऑक्सीडेंट्स असतात ज्यामुळे कँसर आणि हृदयरोगाची रिस्क कमी करण्यास मदत करतात. सोबतच जवस प्रोटीन, ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन बी सारख्या घटकांचा मोठा स्रोत आहे. इन्फोबझ्झच्या आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया जवस खाण्याचे फायदे, जवस खाण्याचे प्रकार आणि प्रमाण.

Nutrients मोठा स्रोत –
मानवी जीवनास सुरवात झाली तेव्हापासून जवस हा आहारातील भाग आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्राऊन आणि गोल्ड या दोन प्रकारचे जवस उपलब्ध आहेत. दोन्ही प्रकार Nutrients मोठा स्रोत आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रोटीन, फायबर आणि सगळ्यात महत्वाचे ओमेगा फॅटी ऍसिड 3 असतात.

साधारणपणे एक चमचा (7g) जवस खाल्याने शरीराला खालील Nutrients मिळतात.

  • कॅलरीज: 37
  • प्रोटीन: 1.3 grams
  • Carbs: 2 grams
  • फायबर: 1.9 grams
  • मेद: 3 grams
  • संतृप्त चरबी: 0.3 grams
  • मोनोअनसॅच्युरेटेड फॅट: 0.5 grams
  • पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट: 2.0 grams
  • ओमेगा फॅटी ऍसिड 3: 1,597 mg
  • व्हिटॅमिन B1: 8% of the RDI
  • व्हिटॅमिन B6: 2% of the RDI
  • फोलेट: 2% of the RDI
  • कॅल्शियम: 2% of the RDI
  • लोह: 2% of the RDI
  • मंग्नेशियाम: 7% of the RDI
  • फॉस्फरस: 4% of the RDI
  • पोटॅशियम: 2% of the RDI

विशेष म्हणजे, जवस खाण्याचे आरोग्य लाभ मुख्यत्वे ओमेगा -3 फॅटी ऍसिड, लिग्नान्स आणि फायबर मुळे मिळतात.

हृदयरोग –
वजन वाढणे हे धोक्याचे आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. शरीराचे वजन अतिप्रमाणात वाढल्याने मेद साठा सुद्धा वाढतो. याचाच दुसरा भाग म्हणजे यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्यास उत्तेजन मिळते. अति कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयरोग होण्याच्या शक्यता वाढतात. दररोज एक चमचा जवस खाल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते आणि आपले हृदय आरोग्यादायी राहते.

जवस खाण्याचे भन्नाट फायदे, जवस, Flax seed benefits in marathi, Flax seed marathi, 3 फॅटी ऍसिड, लिग्नान्स आणि फायबर, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, ज्यादा जवस खाणे फायदेशीर?,  कशी खायची जवस?, त्वचेला आना ग्लो, जवस खाण्याची योग्य वेळ, घरगुती उपाय
Source – Medical News Today

कॅन्सर –
अगदी शांतपणे होणारा आणि सर्वात घातकी रोग म्हणजे कॅन्सर. जवस म्हणजेच Flax Seed हा Lignans चा मोठा स्रोत आहे. Lignans मध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडेंट मुळे कॅन्सर होणाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. विशेष म्हणजे इतर स्रोत पेक्षा जवस मध्ये Lignans चे प्रमाण तब्बल 800 टक्क्यांपेक्षा जास्त असते.

जगभरातील अनेक संशोधनामधून ही बाब सिद्ध झाली आहे की जवस खाल्याने कँसर होण्याचा धोका कमी झाला आहे. यापैकीच कॅनडाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले की, सहभागी झालेल्या अनेक महिलांना जवस खाण्याचा फायदा झाला आणि त्यांना breast cancer होण्याची शक्यता फारच कमी झाली. याचा अर्थ असा नाही की पुरुषांना फायदा नाही, पण विशेषतः महिलांना याबाबतीत अधिक फायदा आहे.

उच्च रक्तदाब
पृथ्वीवरील जवळपास सगळ्यात देशातील लोकांना सतावणारा सगळ्यात मोठा अदृश्य विकार म्हणजे रक्तदाब. याध्ये कमी रक्तदाब आणि अति रक्तदाब या दोन्हीचा समावेश आहे. नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्याची ताकद जवस बियांमध्ये असते.

दररोज सहा महिन्यापर्यंत जवस बियांचे सेवन केल्याने अनेक लोकांचा उच्च रक्तदाब कमी होत असल्याचे अनेक संशोधनामधून समोर आले आहे. तर जे लोक आधीपासून गोळ्या घेत आहेत त्यांना जवस खाल्याने अधिकच फायदा झाल्याचे दिसून आले आहे. जवस खाल्याने उच्चरक्तदाब पूर्णपणे कमी होतो अस नाही पण नैसर्गिकरित्या कमी करून झटका येण्याच्या शक्यता कमी होतात.

शुगर –
अदृश्य असणाऱ्या रोगांपैकी अजून एक महत्वाचा रोग म्हणजे शुगर असणे. मराठी भाषेत आपण त्याला साखर आहे अस सुद्धा म्हणतो. याला टाईप 2 डायबेटीस म्हणून जगभरात ओळखतात. यामध्ये रक्तात साखरेचे प्रमाण वाढून नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होण्यास मज्जाव होतो आणि शरीरावर घातक परिणाम होतात. जवस बियांमध्ये असलेल्या फायबर मुळे रक्ततील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि नियमित सेवन केल्याने साखरेला अटकाव घालण्यास मदत होते.

लठ्ठपणा –
सगळ्यात कॉमन असलेला प्रॉब्लेम म्हणजे लठ्ठपणा. शहरी भागात असलेल्या खण्यापिण्याची पाश्चिमात्य सवयीमुळे लठ्ठपणा शहरात जास्त पाहायला मिळतो. लठ्ठपणा म्हणजे सरळ सरळ इतर रोगांना आमंत्रण देने. दोन जेवनांच्या मध्ये सारखं सारखं काही खाण्याची सवय तुम्हाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चमचाभर जवस खाल्याने भुकेवर योग्य नियंत्रण राहते आणि तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यास मदत होईल.

त्वचेला आना ग्लो –
जवस खाल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत करते ज्यामुळे तुमच्या त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा सुकत किंवा कोरडी पडत नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेचा ग्लो ठेवण्यास नैसर्गिक मदत होते.

दमा –
साधारण वय वाढलेल्या लोकांमध्ये दमा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. जवस खाल्याने मिळत असलेल्या ओमेगा 3 फॅटी ऍसिड मुळे दम्यापासून बचाव करण्यास आपल्याला नैसर्गिक मदत मिळते.

इतर –
अनेकांना शरीरातील जॉईंट मध्ये दुखण्याचा त्रास होतो. जवस जॉईंट पेन वर एक प्रभावी उपाय आहे. जवस मध्ये असलेल्या प्रोटिनमुळे हाडे मजबूत होतात आणि जॉईंटपेन पासून आराम मिळतो.

जवसमध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट शरीराला डिटॉक्स करतात ज्यामुळे लिवर प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होते.

पिरियाड्सच्या योजनांनावरही जवस गुणकारी आहे. त्यामध्ये असणाऱ्या फायटोइस्ट्रोजांस मुळे पिरियाड्सचा त्रास कमी होण्यास मदत होते.

जवस खाण्याचे भन्नाट फायदे, जवस, Flax seed benefits in marathi, Flax seed marathi, 3 फॅटी ऍसिड, लिग्नान्स आणि फायबर, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, ज्यादा जवस खाणे फायदेशीर?,  कशी खायची जवस?, त्वचेला आना ग्लो, जवस खाण्याची योग्य वेळ, घरगुती उपाय
Source – Verywell Fit

कशी खायची जवस ?

  • जवसची टेस्ट साधारणपणे वेगळी असल्याने अनेकांना ती खायला आवडत नाही. तर बिया फारच बारीक असल्याने त्या नीट चावून खाता येत नाहीत. खालील दिलेल्यापैकी तुम्हाला योग्य वाटेल त्या मार्गाने तुम्ही जवसचे सेवन कटू शकता.
  • सरळ सरळ जवस बिया खाण्यापेक्षा त्यांना थोडं मीठ घालून भाजून खाऊ शकता. भाजल्याने बियांची टेस्ट काही प्रमाणात बदलते.
  • ग्लास भरून पाण्यात जवस टाकून तुम्ही दररोज जवस सेवन करू शकता किंवा जवस बियांची भुकटी करून ती पाण्यातून पिऊ शकता.
  • तुमच्या दररोजच्या नाश्त्यामध्ये जवसचा समावेश करून तुम्ही सेवन करू शकता.
  • सलाड वरती जवस टाकून सुद्धा तुम्ही त्याचे सेवन करू शकता.
  • यापैकी काहीच जमत नसल्यास सरळ सरळ जवस तेल आणून तुमच्या आहारातून घेऊ शकता.

जवस खाण्याची योग्य वेळ

आता जवसचे एवढे सगळे गुण एकल्यानंतर अनेकांना ती कधी खायची प्रश्न पडतो. फक्त तुम्हीच नाही तर गूगल वर डेली हजारो लोक जवस खाण्यासाठी योग्य वेळेचा शोध घेत असतात. अनेक तज्ज्ञांच्या मते जवस खाण्यासाठी हीच वेळ असावी असा कोणताही नियम नाही. तुम्ही जवस सकाळच्या नाष्टा सोबत, किंवा आहारात मिक्स करून तडे सलाड मध्ये टाकून खाऊ शकता. वजन कमी करायचे असल्यास दोन जेवणाच्या मध्ये जवस खाल्याने थोडा फायदा होऊ शकतो.

काही लोकांच्या मते रात्रीच्या जेवणानंतर जवस खाल्याने अधिक फायदा होतो. जेवणानंतर मिलेल्या जादाच्या फायबर मुळे शरीराला अधिक फायदा होतो तर अन्नपचनास सुद्धा हातभार लागतो.

“थोडक्यात जवस खाण्यास कोणतेही विविष्ट वेळ नाही. तुम्ही दिवसभरात कधीही जवस चे सेवन करू शकता.”

ज्यादा जवस खाणे फायदेशीर ?

एखादा घटक शरीराला चांगला आहे म्हणून तो अतिप्रमाणात खायचा नाही. अति म्हणजे विष. त्याचप्रमाणे दिवसातून एक चमचा जवस खाणे योग्य आहे. यापेक्षा जास्त जवसचे सेवन तुम्हाला शरीरासाठी हानिकारक आहे. योग्य प्रमाणात बहुगुणी जवस खा आणि फिट राहा.


Leave A Reply

Your email address will not be published.