Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

लोक म्हणतात पुण्यातली हि १० ठिकाणं भुतानं झपाटलेली आहेत

पुणे शहर… ज्या शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते असे हे पुणे शहर. पुणे शहरामध्ये जशी पुण्याची मिसळ, चांदणी चौकातील चायनीज, पर्वती, तळजाई पठार, पर्यटन स्थळे आणि इतिहासाची सांगड असलेली भूमी आहे तसेच, पुण्यामध्ये अशा काही जागा आहे जिथे अमानवीय शक्तींचा वावर आहे असे म्हटले जाते. या जागा तुम्हाला नक्कीच परिचित असतील, तिथून तुमचे येणे जाणे असेल, पण तुम्हाला माहिती आहे का कि त्या जागेमागचे रहस्य नक्की काय आहे ते ?

या ठिकाणांवरून अनेक लोकांना अमानवीय शक्तींचा अनुभव आला आहे. पुण्याच्या अनेक नागरिकांनी याची साक्ष दिली आहेत. आता हि गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी आहे हे माहिती नाही. चला तर पाहूया कि पुण्यात नक्की अशा कोणत्या जागा आहेत जिथे अमानवीय शक्तींचा वास आहे.

१. शनिवार वाडा

पुण्याच्या इतिहासातील एक अमूर्त ठिकाण म्हणजे शनिरवाडा… श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी या वाड्याची १० जानेवारी १७१३ रोजी निर्मिती केली. या वाड्याची मुहूर्तमेढ शनिवारी केल्याने त्याला शनिवारवाडा असे म्हणतात. हा वाडा शौर्याच्या गाथेने भरलेला आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या वाड्याने अनेक हत्या पाहिल्या आहेत. राजकारणातून घडलेले वाद आणि त्यामुळे झालेल्या हत्यांमुळे शनिवाडा मराठयांच्या शौर्याच्या जागेसकट एक भुताटकीची जागादेखील बनला आहे असे म्हणतात.

haunted places in pune, horror places pune, shaniwarwada, holkar bridge pune, horror house in pune, victory theatre pune, pune chandan nagar, residency club pune haunted house, shaniwarwada fort pune, ghost story, choice hostel karvenagar, khadki war cementry, पुण्यातली भुतानं झपाटलेली ठिकाणं
(Source – Quora)

या जागेने इतिहासातील अनेक गूढ कथा आणि त्यांचे रहस्य पोटात बाळगून ठेवले आहे. असे म्हणतात कि, शनिवारवाड्यामध्ये पौर्णिमेच्या रात्रीच्या वेळी एका मुलाचा आवाज घुमत असतो. तो मुलगा, “काका मला वाचावा” या नावाने सारखा ओरडत असतो. यामागची भयानक गोष्ट म्हणजे याच पौर्णिमेच्या रात्री नारायणराव पेशवे यांचा खून झाला होता आणि त्यांचाच तो आवाज आहे असे लोकांचे मत आहे. हा आवाज शनिवारवाड्याच्या आजूबाजूच्या रहिवाश्यांनी खूपवेळा ऐकला आहे. तसेच, त्या ठिकाणी अनेकांनी त्या मुलाला वाड्यात फिरत असताना पाहिले आहे. त्या मुलाच्या आवाजासोबत अमानवीय किंचाळ्यांचा आवाजदेखील अनुभवला आहे.

या वाड्यात अनेक लोकांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. त्याकाळी शनिवारवाडा आतील लोकांसह जाळला गेला होता. त्यामुळे त्या ठिकाणी अशा काही अमानवी शक्तींचा वावर होतो. सरकारने खबरदारीसाठी शनिवाडा पर्यटनासाठी संध्याकाळी ६:३० नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल आणि त्यामुळे ६:३० नंतर आत कोणालाच प्रवेश करण्यास मनाई आहे.

२. होळकर पूल

पुण्यातील होळकर पूल हे ठिकाणदेखील भुताटकीच्या जागांमध्ये मोडले जाते. अठराव्या शतकात माधवराव पेशवे यांनी होळकर पुलाचे बांधकाम केले होते. हा पूल यशवंतराव होळकर यांच्या स्मरणार्थ बनवल्यामुळे या पुलाला होळकर पूल असे नाव दिले गेले. या पुलाला एका चांगल्या इतिहासाची जोड असली तरी हा पूल सध्या काही अमानवी घटनांसाठी जाणला जातो.

haunted places in pune, horror places pune, shaniwarwada, holkar bridge pune, horror house in pune, victory theatre pune, pune chandan nagar, residency club pune haunted house, shaniwarwada fort pune, ghost story, choice hostel karvenagar, khadki war cementry, पुण्यातली भुतानं झपाटलेली ठिकाणं
(Source – India.com)

होळकर पुल अनेक दुर्दैवी घटनांचा साक्षीदार आहे. या ठिकाणी मध्यरात्रीचा प्रवास करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी एकप्रकारे खेळणे आहे. या पुलावर काहीतरी असामान्य शक्ती आहे असे लोकांचे मत आहे. असे म्हणतात कि, या पुलाच्या कठड्यावर भुतं बसतात आणि या गोष्टीचे अनेक लोक साक्षीदार आहे.

अनेक लोक या पुलावरून रात्रीचा प्रवास करण्यास टाळतात. या पुलाच्या काही अंतरावर एक स्मशानभूमी आहे आणि त्या सोबतच त्या ठिकाणी सतराव्या शतकातील जुनी घरे आहेत. या सर्व गोष्टींमुळे तेथील वातावरण इतके भयानक वाटते कि, त्यामुळे रात्रीचा प्रवास करण्यास किंवा रात्रीचे त्या पुलावर जाण्यास कोणाचीच हिम्मत होत नाही.

३. व्हिक्टरी थिएटर

व्हिक्टरी थिएटर हे पुण्यामधील खूप जुने चित्रपटगृह आहे. या ठिकाणी अनेक लोक चित्रपट बघण्यासाठी येत असतात. अनेकांना चित्रपट बघत असताना काही विचित्र अनुभव आला आहे. काही लोक या ठिकाणच्या भुतांच्या गोष्टींमुळे फक्त त्या गोष्टी अनुभवायला जात असतात. या ठिकाणी दिवसा भरपूर वर्दळ असते पण रात्रीच्या वेळी या ठिकाणी भयानक शांतात असते.

तुम्ही जर या व्हिक्टरी थिएटरमध्ये दिवसा एखादा चित्रपट बघायला गेला तर सहसा तुम्हाला काही अनुभव येणार नाही. परंतु, जर तुम्ही रात्रीच्या वेळी व्हिक्टरी थिएटरमध्ये चित्रपट बघायला गेलात तर नक्कीच तुम्हाला भयानक अनुभव येऊ शकतो. अनेक लोकांचा हा अनुभव आहे कि, ते जेव्हा त्या ठिकाणी चित्रपट बघायला गेले तेव्हा अचानक खुर्च्या आपोआप हलायला लागतात, काही वेळा लोकांच्या कानात कोणीतरी काहीतरी कुजबुजून जाते, अचानक चित्रपटाच्यामध्ये कर्कश किंचाळी ऐकू येते.

पण तुम्हाला हे माहिती आहे का ? हे अनुभव फक्त एखाद्या भुताच्या चित्रपटाच्या वेळी नाही तर रोमँटिक किंवा कॉमेडी चित्रपटाच्या वेळीसुद्धा अशा घटना घडत असतात.

४. चंदन नगर

जर एखादी लहान गोंडस मुलगी एक छान लहानसा फ्रॉक घालून, हातात एक लहान बाहुली घेऊन किंचाळत तुमच्याकडे पाहत धावत येते आणि त्यावेळी तुम्ही मध्यरात्री रस्त्यावर एकटे असाल, त्यावेळी तुम्हाला नक्की काय वाटेल ? जर तुम्ही पुण्यातील चंदननगर मध्ये असाल तर हा असा अनुभव येणे शक्य आहे. या मागची अशी गोष्ट आहे कि, हि लहान मुलगी एका बांधकाम मजुराची मुलगी होती, ती तिच्या बाहुलीसोबत नेहमी खेळत असायची. काही वर्षापुर्वी ती लहान मुलगी बाहुलीसोबत खेळत असताना उंच इमारतीवरून खाली पडली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या लहान मुलीचा आत्मा या परिसरात भटकत असतो असे म्हटले जाते.

(Source – Google)

लोकांचे असेही म्हणणे आहे कि, रात्रीच्या बरोबर १२ वाजता हि लहान मुलगी रस्त्यावर दिसते. हि मुलगी कोणालाच काहीही करत नाही पण ती ज्या प्रकारे रक्ताने भरलेला फ्रॉक घालून, हातात भालू घेऊन किंचाळत तुमच्याकडे येते, ते पाहूनच तुम्हाला जागेवर अटॅक येऊ शकतो.

५. चॉईस हॉस्टेल, कर्वे रोड

पुण्याच्या कर्वे रोडवर एक हॉस्टेल आहे ज्याचे नाव “चॉईस हॉस्टेल” आहे. हे हॉस्टेल मुलांचे आहे. या ठिकाणी सर्व कॉलेजच्या मुलांची वर्दळ असते. या हॉस्टेलमध्ये देखील सर्वांची मज्जा मस्ती चाललेली असते. पण एका दिवशी या मुलांची मस्ती एकदम बंद असते आणि तो दिवस म्हणजे शनिवार… या हॉस्टेलमधील मुलांचा अनुभव आहे की दर शनिवारी एक लाल साडी घातलेली बाई त्यांच्या हॉस्टेलमध्ये फिरत असते. ती बाई सारखी त्यांच्या होस्टेलच्या कॉरिडॉर मध्ये फिरत असते.

haunted places in pune, horror places pune, shaniwarwada, holkar bridge pune, horror house in pune, victory theatre pune, pune chandan nagar, residency club pune haunted house, shaniwarwada fort pune, ghost story, choice hostel karvenagar, khadki war cementry, पुण्यातली भुतानं झपाटलेली ठिकाणं
(Source – travel triangle)

काही मुलांना असाही अनुभव आला आहे कि, ती बाई त्यांच्या बेडजवळ येऊन उभी असते. ती काहीवेळ दिसते आणि लगेच गायब होते, कधी ती बाथरूममध्ये देखील असल्याचा भास मुलांना झाला आहे. या मुलांचे असे मत आहे की, हि बाई कोणाला काही हानी पोहचवत नाही परंतु, तिचा चेहरा फार उदास असतो आणि ती सारखी कशाच्या तरी शोधात भटकत असते.

६. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग

पुण्यात इंजिनियरिंगसाठी सर्वात प्रसिद्ध असलेले “सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग”… हे कॉलेज जसे इंजिनीयरिंग साठी प्रसिद्ध आहे तसेच एका मुलाच्या भुतासाठी देखील प्रसिद्ध आहे. या कॉलेजमध्ये त्या मुलाच्या भुताटकीचे अनेक किस्से येथील विद्यार्थी सांगत असतात. असे म्हणतात कि, सिंहगड कॉलेजमध्ये ज्या मुलाचे भूत आहे तो मुलगा याच कॉलेजचा एक विद्यार्थी होता. परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळे आणि अभ्यासाचा ताण घेतल्यामुळे त्याने याच कॉलेजमध्ये आत्महत्या केली आणि त्याचे भूत या कॉलेजमध्ये फिरत असते. अनेक विद्यार्थ्यांनी त्याला पाहिले आहे असेही सांगितले जाते.

७. सिंहगड किल्ला

पुण्यातील शिवाजी महाराजांच्या सुवर्णजडित शूर इतिहासाचे एक पान म्हणजे “सिंहगड किल्ला”… या किल्ल्याने अनेक मावळ्यांची वीरमरण पाहिले आहे. परंतु, या सोबतच सिंहगड किल्ल्याने ६० लहान शाळकरी मुलांचा दुदैवी अपघातदेखील पाहिला आहे. काही वर्षांपूर्वी सिंहगड किल्ल्याच्या परिसरात ६० शाळकरी मुलांच्या बसचा अपघात झाला होता. तेव्हापासून सिंहगडच्या दऱ्यांमधून त्या लहान मुलांचा किंचाळण्याचा आवाज येतो, असे म्हटले जाते.

haunted places in pune, horror places pune, shaniwarwada, holkar bridge pune, horror house in pune, victory theatre pune, pune chandan nagar, residency club pune haunted house, shaniwarwada fort pune, ghost story, choice hostel karvenagar, khadki war cementry, पुण्यातली भुतानं झपाटलेली ठिकाणं
(Source – Google)

तसेच लोकांचा हा देखील अनुभव आहे कि, त्यांना एक शाळकरी बस न दिसणाऱ्या वळणावरून आलेली दिसते परंतु, जेव्हा ती लोक त्या ठिकाणी जाऊन पोहचतात त्या ठिकाणी काहीच नसते, ती बस नाही आणि त्या बसमधील शाळकरी मुलेही नाही.

८. अबोन्डेड हाऊस इन रेसिडेन्सी क्लब

पुण्यातील भुताटकीच्या जागेमध्ये ‘अबोन्डेड हाऊस’ या घरचाही समावेश होतो. हे घर एका वृद्ध बाईचे होते. त्या वृद्ध बाईचा तिच्याच घरामध्ये अत्यंत क्रूरपणे खून केला होता. असे म्हणतात, तेव्हापासून त्या वृद्ध बाईची आत्मा त्या घरामध्ये वावरत आहे. त्या घराजवळून जाणाऱ्या लोकांचा असा अनुभव आहे कि, त्यांना ती वृद्ध बाई त्या घरच्या खिडकीमध्ये दिसलेली आहे आणि ती बाई मदतीसाठी बोलावते, दयेसाठी भीक मागत असलेल्या स्वरात ओरडत असते. ज्यामुळे तुमचे लक्ष आपोआप त्या आवाजकडे जाते.

९. पुणे कॉन्टोमेंट

असे म्हटले जाते कि, पुणे कॉन्टोमेंट हि जागा सैनिकांच्या आत्म्यांने जखडलेली आहे. तुम्ही जेव्हा या परिसरात जाल तेव्हा तुम्हाला एक वेगळेच वातावरण जाणवेल. जरी हे अमानवी अस्तित्व अगदी हानीकारक नसले तरी ते अदृश्य असणारे अमानवीय अस्तित्वाच्या अनुभवाने तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

१०. खडकी वॉर सिमेंट्री

पुण्यातील खडकी वॉर सिमेंट्री या ठिकाणी भारतात मारले गेलेल्या सैनिकांचे देह पुरले गेले आहे. या स्मशानभूमीच्या परिसरातील भयानक शांतात अगदी अपेक्षित आहे. या परिसरातून जात असताना तुम्हाला असे वाटेल कि, कोणीतरी तुमच्या सोबत तुमच्या मागे चालत आहे. विशेष म्हणजे, जर तेव्हा तुम्ही एकटे असाल आणि तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर योग्य हे आहे कि तिथून तुम्ही लवकर निघून जा.

haunted places in pune, horror places pune, shaniwarwada, holkar bridge pune, horror house in pune, victory theatre pune, pune chandan nagar, residency club pune haunted house, shaniwarwada fort pune, ghost story, choice hostel karvenagar, khadki war cementry, पुण्यातली भुतानं झपाटलेली ठिकाणं
(Source – travel triangle)
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More