घरबसल्या डेटा-एन्ट्रीचे काम करून लाखो कमवा वाले मेसेज तुम्हाला पण येतात का ?

0
2360

डेटा एन्ट्री करून लाखो रुपये कमावण्याची स्वप्ने पाहण्याआधी हा लेख जरूर वाचा.

दिवसभरात जाहिरात करणारे अक्षरशः आपल्याला शेकडो मेसेज विविध माध्यमातून येतात, पण यात सगळयात खास मेसेज आहे तो घरबसल्या डेटा एन्ट्री करा आणि लाखो रुपये कमवा हा वाला आहे. जॉब व्यतिरिक्त काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी करून आपणही ज्यादाचा पैसा कमवू अशी प्रत्येकाची ईच्छा असते. 8 तास कंपनी मध्ये राबून महिन्याभराची कमाई साधारणपणे 20 ते 30 हजार मिळते, ही घरबसल्या दिवसा लाखो कमवा वाल्या जाहिरातीचे अनेकांचे डोळे चमकतात आणि पाय दिशेने पडू लागतात. याबाबत नेमकं खरं काय ?? खरंच तुम्ही घरबसल्या डेटा एन्ट्रीचे काम करून पैसे कमवू शकता का ?

इन्फोबझ्झ ची एक तरुणी वाचक जी सध्या इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर तिने आपल्याला तिची कथा सगळ्यांना सांगण्याची परवानगी दिली आहे. सकाळी कॉलेज केल्यानंतर दिवसभर तसा बराच वेळ उपलब्ध असल्याने काहीतरी करून ज्यादाचे पैसे मिळवण्याचे तिच्या मनात चालले होते त्यावेळी तिने ही घरबसल्या डेटा एन्ट्री वाली जाहिरात पहिली. याबाबत तिला अनेकदा मोबाईलवर मेसेज सुद्धा मिळाले. यानंतर या तरुणीने बराच विचार करून हे काम करण्याचा निश्चय केला.

data entry job, work from home, work from home online jobs frauds, fake data entry job, डेटा एन्ट्री जॉब
Homebased data entry job ad

दिलेल्या मोबाईलवर कॉल करून तिने याबाबत माहिती घेतली. यानंतर समोरच्या व्यक्तीने Whatsapp वर अनेक माहितीचे मेसेज, वेबसाईट लिंक तर एक विडिओ ही पाठवला. मेसेज मध्ये कंपनीचे नाव, जगभरातील वैगरे वैगरे होत, तर वेबसाईटवर काम केलेल्या लोकांचे प्रतिक्रिया दिल्या होत्या. विडिओ मध्ये नेमकं काम कास करायचं याची संपूर्ण प्रोसेस आणि पैसे कसे मिळतात याबाबत दाखवण्यात आले होते.

खरंच पैसे मिळतात अशी खात्री झालेल्या या तरुणीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर कंपनीने सांगितलेल्या नुसार तिने सगळी माहिती भरून आपले रजिस्ट्रेशन केले आणि तब्बल 500 रुपये सभासद फी सुद्धा भरली. यानंतर कंपनीने तिला एक मेल पाठवला ज्यामध्ये तुम्ही कंपनीच्या नियम आणि अटी मान्य करत असल्याचा मजकूर होता. तिथे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डिजिटल हस्ताक्षर करून त्या बॉण्ड ला मान्यता द्यायची होती. साधारणपणे कंपनी मोठी आहे हे भासवण्यासाठी योग्य ती काळजी पलीकडून घेण्यात आली होती.

सगळी प्रोसेस झाल्यानंतर 2 दिवसात दिला मेलच्या माध्यमातून पहिला टास्क मिळाला. या तरुणीने त्या फाईल्स ओपन केल्या तेव्हा त्यामध्ये अनेक JPG म्हणजे फोटो स्वरूपात गोष्टी होत्या. त्यातील निम्मे शब्द तर नीट दिसत सुद्धा नव्हते. हा मुद्दा तिने कंपनीला मांडण्याचा प्रयत्न केला पण काही रिप्लाय न आल्याने तिने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे सांगितल्या तारखेला त्या फाईल्स अपलोड केल्या. यानंतर दोन दिवसांनी तिला कंपनी कडून कॉल आला आणि सांगण्यात आले की तुमच्या फाईल्स पहिल्या आहेत पण अपूर्ण आणि चुकीच्या आहेत. यामुळे तुम्हाला या कामाचे कोणतेही पैसे मिळणार नाहीत.

data entry job, work from home, work from home online jobs frauds, fake data entry job, डेटा एन्ट्री जॉब

याच्यापुढेही जाऊन, झालेल्या चुकीबद्दल कंपनीला तोटा झाल्याने तिला तब्बल 7000 हजार रुपये पेनाल्टी भरण्यास सांगितले आणि त्यासाठी वेळेची मर्यादा पण दिली. वेळेत पैसे न भरल्यास कोर्टात केस दाखल करण्यात येईल असाही तिला सांगण्यात आले. यानंतर ते सतत मेसेज आणि कॉल करून संबंधित व्यक्ती तिला पैसे भरण्यासाठी त्रास द्यायची. शेवटच्या तारखेच्या आता पैसे न भरल्यास कोर्टाची धमकीही दिली जायची. केलेल्या कामाचे पैसे तर मिळालेच नाही पण झालेल्या प्रकाराने तरुणी प्रचंड मानसिक दबावाखाली आली. तिला काय करावे हेच सुचेना.

अखेर तिने ही गोष्ट आपल्या मित्राच्या कानावर घातली आणि झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला. विचार केल्यानंतर अखेर त्यांनी जवळच्या पोलिसांना संपर्क करण्याचं ठरवलं. पोलिसांनी यात बारकाईने लक्ष घालून त्या संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर कॉल केला आणि त्यानंतर तो मोबाईल क्रमांक सेवेत नसल्याचं ऐकू येऊ लागले. पुढे यावर सायबर क्राईम अंतर्गत तपास चालू आहे पण संबंधित व्यक्ती आणि कंपनी फसवी असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशभरात अश्या लाखो केसेस सायबर ला येत असतात पण आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेला या गुन्ह्यात पोलिसांनी अजूनही यश आलेले नाही.

मित्रहो, कोणतीही वस्तू घेण्याआधी आपण दहा दुकाने फिरतो आणि निदान चार लोकांना तिच्याबद्दल विचारतो. आणि अश्या गोष्टीत मात्र आंधळेपणाने कोणतीही चौकशी न करता सामील होतो. जेव्हा आपण अडकलो आहे अस समजत तेव्हा पण योग्य व्यक्तीला आपण माहिती न देत दुसराच गुन्हा करून बसतो. त्यामुळे सायबरच्या अनेक गोष्टीची खातरजमा करूनच पुढचे पाऊल टाका.


*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here