Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अंतराळात तयार होत असलेल्या आलिशान हॉटेलचे आश्चर्यचकित करणारे हे फोटोज तुम्ही पहिले आहेत का

तुम्ही कधीच कल्पनाही केली नसेल असे आहे हे अंतराळातील हॉटेल

भारतात व जगातही असे अनेक हॉटेल्स आहेत जिथे जाण्याचे, त्या हॉटेलमध्ये राहण्याचे स्वप्न तुम्ही बघत असाल. पण तुम्ही कधी अंतराळात जाण्याचा आणि तिथल्या हॉटेल्समध्ये राहण्याचा विचार केलाय का ? तुम्ही अंतराळातील हॉटेल मध्ये जाण्याचा विचार अद्याप केला नसेल मात्र आता तसा विचार करायला काहीच हरकत नाही. कारण आता अंतराळातही एक हॉटेल सुरु होणार आहे. ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. एवढंच नाही तर ह्या हॉटेलचे काही फोटोज इंटरनेटवर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

von braun space station gateway foundation hotel, worlds first hotel in space von braun space station, von braun station gateway foundation
von braun space station

गेटवे फाऊंडेशनने ह्या अंतराळातील हॉटेलचे डिजाईन तयार केले आहे. हे हॉटेल पृथीवरील एखाद्या आलिशान हॉटेल सारखेच असेल ज्यात बार, रेस्टारंट अश्या सोयी- सुविधा असतील. सन २०२५ पर्यंत हे हॉटेल पूर्णपणे तयार झालेले असेल असे गेटवे फाऊंडेशनने म्हटले आहे. ह्या हॉटेलचं नाव आहे von braun space station.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ज्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो तेच तंत्रज्ञान ह्या हॉटेलमध्ये वापरण्यात आले आहे. ह्या हॉटेलमध्ये एकाच वेळी ४०० लोक राहू शकतील.

von braun space station gateway foundation hotel, worlds first hotel in space von braun space station, von braun station gateway foundation
(Image Source- Daily Express)

१९० डायमीटरच्या चाकासारखा ह्या हॉटेलचा आकार असेल. आणि ते सतत गोलाकार फिरत राहील. येत्या काळात ह्याहीपेक्षा मोठे हॉटेल अंतराळात बनवण्याचा विचार असल्याचे गेटवे फाऊंडेशनने सांगितले. हि बातमी वाचून तुम्ही त्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी नक्कीच उत्सुक असाल.

Leave A Reply

Your email address will not be published.