मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराला मुकेश अंबानी फक्त हे २ प्रश्न विचारतात

0
30
mukesh ambani, dhirubhai ambani, ambani family, mukesh ambani interview, reliance jio, जिओ, मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानी

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचे म्हटले जाते. त्यांच्याबद्दल नेहमीच काही ना काही चर्चा सुरू असतात. परंतु असे बरेच किस्से आहेत जे अजूनही लोकांना माहिती नाहीत. असाच एक किस्सा किंवा अशीच एक बाब जी फार कमी जणांना माहिती असेल ती म्हणजे मुकेश अंबानी आपल्या कंपनीसाठी निवडण्यात येणाऱ्या लोकांची मुलाखत कशी घेतात. आज आपण ह्याचविषयी जाणून घेणार आहोत.

जिओने आपल्या देशात डिजिटल क्रांती आणली आहे. अंबानी यांनी फक्त 6 महिन्यांत 12% टेलिकॉम व्यवसाय ताब्यात घेतला. डिजिटल क्षेत्रात अशी क्रांती केली की ज्याचा कोणी विचारही कधी केला नसेल. मुकेश अंबानीकडे जगातील सर्वाधिक क्षमता असलेली पेट्रोलियम रिफायनरी आहे. पॉलिस्टर फायबरच्या उत्पादनातही त्यांची कंपनी जगातील एक आघाडीची कंपनी आहे.

mukesh ambani, dhirubhai ambani, ambani family, mukesh ambani interview, reliance jio, जिओ, मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानी
(Source – India Times)

धीरूभाई अंबानी यांचे सुपुत्र मुकेश अंबानी हे त्यांच्या भावंडांपैकी सर्वात मोठे. ते स्वतः म्हणतात की त्यांचा जन्म अशा वेळी झाला होता जेव्हा लोकांना घरात ज्येष्ठ असण्याचा विशिष्ट फायदा मिळत असे. त्यांच्या म्हणण्यानुसार, १९६० च्या दशकात त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर व त्यांच्या बहीण भावांवर म्हणजेच बहीण दीप्ती, नीना आणि भाऊ अनिल यांच्यावर विशेष असे कोणते बंधन कधीच लादले नाही, पण आता वातावरण बदलले आहे.

कुटुंब आणि काम यांच्यात नेहमीच संतुलन राखणारे मुकेश लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. ते नेहमी अभ्यासासाठी वेळ काढत असत. ते म्हणतात की आपले लक्ष्य कधीही जास्तीत जास्त पैसे कमावणे नसून नवनवीन आव्हान स्वीकारण्याचे आहे.

मुकेश अंबानी ह्यांना वाचनाची इतकी आवड आहे की कधीकधी ते रात्री 2 वाजेपर्यंत एखादे पुस्तक वाचत बसतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानातही त्यांना खूप रस आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार त्यांनी 3०3 कोटींची देणगी दिली आहे. मुकेश आपले वडील धीरूभाई अंबानी यांना आपला आदर्श मानतात. ज्याप्रमाणे धीरूभाई आपल्या कुटुंबासाठी व्यस्त जीवनातून वेळ काढत असत त्याचप्रमाणे ते नेहमी आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करतात.

मुकेश अंबानी यांचा जन्म येमेनमधील अडेन येथे झाला होता. गुजराती मुकेश अंबानी यांना दक्षिण भारतीय जेवणाची आवड आहे. मुंबईतील माटुंगा येथील म्हैसूर कॅफेचा इडली-सांबार हा त्यांचा आवडता पदार्थ आहे. आजही त्यांना तिथे जाऊन खायला आवडते. मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’ दक्षिण मुंबईच्या ‘पेडर रोड’ जवळ आहे.

यूकेचा अधिकृत राजवाडा ‘बकिंघम पॅलेस’ नंतर हे जगातील दुसरे सर्वात महागडे घर आहे. या गगनचुंबी इमारतीत राहण्यासाठी 4 लाख चौरस फूट जागा असून ती 27 मजल्यांची आहे.

येथे रात्रंदिवस 600 लोकांचा कर्मचारी वर्ग कार्यरत असतो. या घराच्या 6 व्या मजल्यापर्यंत रिक्त पार्किंग आणि गॅरेज आहेत. अँटिलीयामध्ये 9 लिफ्ट, 1 स्पा, 1 मंदिर, एक बॉल रूम आहे. याशिवाय येथे एक खाजगी सिनेमा, योग स्टुडिओ, एक आईस्क्रीम रूम, दोन किंवा तीनपेक्षा अधिक जलतरण तलाव आहेत.

उमेदवाराला मुकेश अंबानी नेमकं काय विचारतात ?

असे म्हटले जाते कि जेंव्हा मुकेश अंबानी एखाद्या उमेदवाराची मुलाखत घेतात तेंव्हा त्याला फक्त दोनच प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला एखादा प्लॅन आखण्यासाठी किती बजेट लागेल ? आणि दुसरा म्हणजे त्यातून आपल्याला किती फायदा होईल ? हे दोनच प्रश्न मुकेश अंबानी उमेदवाराला विचारतात. या प्रश्नांची त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली कि त्या उमेदवाराला त्या प्लॅन विषयी सगळी माहिती देऊन त्याच्याकडे तो प्लॅन सोपवतात.

अशा प्रकारे मुकेश अंबानी येणाऱ्या उमेदवाराची परीक्षा घेऊन त्याची निवड करतात.

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here