Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भारतातून इंग्रजांनी किती पैसे चोरले ?

अर्थतज्ज्ञ उषा पटनाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या शोध निबंध मधील इंग्रजांनी चोरलेल्या पैशाचा आकडा पाहून तुम्हाला चक्कर येईल.

काही दिवसापूर्वीच भारताच्या अर्थतज्ज्ञ उषा पटनाईक यांनी एक शोध निबंध प्रसिद्ध केला आहे. या शोधनिबंधात इंग्रजानी भारताकडून वसूल केलेल्या आर्थिक बाबींवर निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यापैकी २०० वर्षाच्या कालावधीत इंग्रजांनी भारतातून किती आणि कसे पैसे वसूल केले हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अर्थतज्ज्ञ उषा पटनाईक, भारत आणि इंग्रज, अर्थतज्ज्ञ, ब्रिटिश, इंग्रजांनी भारतातून किती पैसे वसूल केले, Britain, India

ब्रिटिशांची राजवट लागू होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात व्यापार चालू असे. भारताकडून इंग्लंड विविध प्रकारचा कच्चा माल खरेदी करत असे यात प्रामुख्याने कपडे आणि तांदूळ यांचा समावेश होता. भारतीय व्यापाऱ्यांना चांदीच्या रूपात वस्तूंचा योग्य मोबदला मिळत असे. सन १७६५ साली ईस्ट इंडिया कंपनीची भारतात सुरवात झाली अन भारतीय व्यापारावर इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरु झाला. अन इथूनच खरी वसुलीची सुरवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय व्यापाऱ्यांवर आणि नागरिकांवर विविध कर आकारायला सुरवात केली. याचा फायदा ईस्ट इंडियाची आर्थिक स्थिती सुधारण्यास झाला.

भारतीयांकडून जो कर वसूल केला जायचा त्यापैकी १/३ हिस्सा वापरून इंग्रज भारतीय व्यापाऱ्यांकडून सामान खरेदी करायचे. यातून व्हायचं असं कि, भारतीय पैशातूनच भारतीय माल खरेदी केला जायचा यामुळे इंग्रजांना कसलाही खर्च न करता माल मोफत मिळायचा. हि गोष्ट एकाही भारतीयांच्या लक्षात न येण्याचे कारण म्हणजे जो इंग्रज अधिकारी व्यापाराकडून कर गोळा करायला येत असे तो कधीच सामान खरेदी करत नसे, आणि जो इंग्रज अधिकारी सामान खरेदी कारण्यासाठी येत असे तो कधी कर गोळा करत नसे. भारतीय व्यापाऱ्याकडून स्वस्तात घेतलेले सामान ब्रिटिश इतर देशांत नेऊन जास्त दराने विकायचे त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होत गेली.

अर्थतज्ज्ञ उषा पटनाईक, भारत आणि इंग्रज, अर्थतज्ज्ञ,  ब्रिटिश, इंग्रजांनी भारतातून किती पैसे वसूल केले, Britain, India
Source – Google

१८५७ पर्यंत अशाप्रकारे पद्धत चालू होती. त्यांनतर भारतीय व्यापारी आणी ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात एक करार झाला त्या करारानुसार भारतीय व्यापारी ब्रिटन सोडून इतर देशांतही त्यांचा माल विक्री करू शकतील पण यावेळी एक अट घालण्यात आली कि, जो व्यापारी इतर देशात व्यापार करू इच्छित आहे त्यांना एक कौंसिल बिलाचे कागदी चलन दिले जायचे त्यानुसार भारतीय व्यापाऱ्यांना कर भरावा लागत असे. त्यामुळे भारतीय सोने, चांदी इ. द्रव्ये स्वरूपातील मालमत्ता भारतीय व्यापारी देत असत. त्यामुळे मौल्यवान वस्तूंचा भारतीय खजिना इंग्लंड कडे जमा होत गेला. अन भारत आर्थिक बाजूने कंगाल होत गेला. उषा पटनाईक यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात याची किंमत तब्बल ४४.६ ट्रिलियन डॉलर एवढी आहे. जे कि ब्रिटिशांनी १९० वर्षात भारतातून लुटून नेले आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.