Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जर जगातील लोकांनी मांसाहार करणे सोडले तर काय होईल ?

तुम्ही नेहमीच शाकाहारी व मांसाहारी लोकांतील संवाद ऐकला असेल, मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना घास-फुस खाणारे अशा नावाने संबोधतात तर शाकाहारी लोक मांसाहारी लोकांना मुक्या जनावरांवर अत्याचार करणारे लोक असे संबोधतात.

तसेच सांगायचे झाल्यास लोकांना त्यांच्या मर्जीचे भोजन करण्याची अनुमती आहे आणि यांच्यात नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. “फ्रेन्ड्स ऑफ अर्थ” नामक संस्थेच्या अहवालानुसार जगातील फक्त 50 करोड लोक असे आहेत जे की पूर्णपणे शाकाहारी आहेत म्हणजेच 740 करोड जनसंख्या असलेल्या जगात तुम्ही शाकाहारी लोकांना अल्पसंख्याक सुद्धा म्हणू शकता. “फ्रेन्ड्स ऑफ अर्थ” संस्थेने 2014 साली एका अहवाल सादर केला होता आणि त्यानुसार सगळ्यात जास्त शाकाहारी लोक भारतात राहतात.

भारताची 31 टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे, भारतातही प्रत्येक व्यक्तीला आपले भोजन निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आपण या बाबींचे समर्थनही करतो. अमेरिकेच्या “नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स”च्या मतानुसार जर संपूर्ण जगात शाकाहार आहाराला प्राधान्य दिले तर धरतीला जास्त स्वस्थ, तसेच जास्त थंड व जास्त दौलतमंद बनविले जाऊ शकते.

तसे तर जगात तिन प्रकारचे भोजन करणारे लोक पाहण्यास मिळतात एक शाकाहार, दुसरे मांसाहार व तिसरे लोक असे आहेत जे की जनावरांपासून मिळणारे प्रॉडक्ट म्हणजेच दुधाचे सेवन सुद्धा करीत नाहीत अशा लोकांना “विगन (Vegan)” या नावाने संबोधले जाते.

लोकांनी मांसाहार सोडला तर, मांसाहार चांगला कि वाईट, If Everyone Stopped Eating Meat in marathi, What happens if humans don't eat meat, mahitipurn marathi lekh
Source – Healthline

अमेरिकेच्या ‘नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस‘च्या अभ्यासानुसार शाकाहार जेवणाचा जर आपण उपयोग केला तर दरवर्षी साधारणपणे 50 लाख लोकांचे मृत्यू टळू शकतात तसेच लोकांनी दुध व दुधापासून बनविणारे पदार्थ खाण्याचे बंद केले तर वर्षाकाठी 80 लाख लोकांना वाचविले जाऊ शकते पण असे होणे जवळपास शक्य नाही.

जेवणात मांसाहार जर कमी केला तर वर्षाकाठी 66 लाख 73 हजार करोड रुपये वाचू शकतात. या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार याचा सर्वाधिक फायदा विकसनशील देशाला होईल. तसेच कमी कॅलरी असलेले भोजन केल्याने मोटापा म्हणजेच वजन कमी करण्याची समस्या सुद्धा कमी होईल व लॅटिन अमेरिका सहित पश्चिमी देशात पब्लिक हेल्थ वर होणाऱ्या खर्चामध्ये सुद्धा कमी होऊ शकते. त्याचबरोबर सर्व भाजीपाल्याच्या उत्पादनाने भारतासहित पूर्ण आशिया खंडातील देशांना फायदा होऊ शकतो.

पण हे जे काही सांगत आहे हे करणे तेवढे सोपे नाही त्यासाठी फळे व भाजीपाल्यांच्या सेवनांमध्ये कमीतकमी 25% वाढ व्हावी लागेल, त्याचबरोबर रेड मीटच्या सेवनामध्ये 56% कमी करावी लागेल. म्हणजेच जगातील प्रत्येक व्यक्तीला 15% टक्के कमी कॅलरी घ्यावी लागेल, याचा अर्थ असा झाला जर तुम्ही दिवसात 2000 कॅलरीचे भोजन करीत असाल तर तुम्हाला 1700 कॅलरीच भोजन करावे लागेल.

मांसाहार तुमच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरू शकतो पण मांसाहार धरतीच्या स्वास्थ्यासाठी मुळीच फायदेशीर नाही.

मांसाहार तुमच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरू शकतो पण मांसाहार धरतीच्या स्वास्थ्यासाठी मुळीच फायदेशीर नाही. हे मी यासाठी सांगतोय की मीट प्रॉडक्टच्या उत्पादना दरम्यान जे उत्सर्जन होते ते जगातील होणाऱ्या एकूण हरित वायू उत्सर्जना पैकी 20% आहे. हे जगातील एकूण विमान, रेल्वे, वाहन तसेच अन्य परिवहनापासून होणाऱ्या उत्सर्जनाहुनही जास्त आहे.

एका अहवालानुसार जनावरांना पाळण्यासाठी त्यांना जे भोजन दिले जाते तेवढे भोजन जर माणसांना मिळाले तर दुप्पट लोकांचे पोट भरले जाऊ शकते. एक किलो पोर्कच्या उत्पादनासाठी जवळपास 8 किलो भोजन त्या जनावरांना दिले जाते. तसेच 1 किलो चिकन तयार करण्यासाठी कोंबडीला 3.5 किलो भोजन द्यावे लागते. तसेच हा पदार्थ लोकांच्या पोटात पडेपर्यंत फळ अथवा भाजीपाल्यांच्या बदल्यात शंभर पटीने अधिक पाणी लागते. अर्धा किलो आलू उगवण्यासाठी 127 लिटर पाणी लागते, त्यात अर्धा किलो मांस उत्पादन करण्यासाठी 9 हजार लिटर पाणी लागते, तर अर्धा किलो गव्हाचे पीठ तयार करण्यासाठी 681 लिटर पाणी लागते. एवढेच नव्हे तर एक किलो मांसाच्या उत्पादनासाठी जे उत्सर्जन होते ते 3 तास चाललेल्या कारच्या उत्सर्जना एवढे होते.

तसेच या संस्थेच्या मते मीट तयार करण्यासाठी प्रति वर्ष 6 लाख हेक्टर जंगलाची तोड करण्यात येते, कारण त्या जागेवर या जनावरांना पाळले जाते. ही जमीन युरोपातील बेल्जियम पेक्षा मोठी आहे. 400 ग्रॅम मास तयार करताना जवळपास ४० किलो पदार्थ असे निघतात जे जमिनीवरील पाण्याला विषारी बनवतात.

सरतेशेवटी असे म्हणणे वावगे ठरणार नाही की एका आठवड्यात एक दिवस जरी जगातील लोकांनी शाकाहारी जेवण केले तर धरतीला वाचवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकते, कारण मांसाहार कमी झाल्याने ग्लोबल वार्मिंगमध्ये कमी होईल व धर्तीवरील वातावरण थंड होण्यास मदत होईल.

हा लेख वाचल्यानंतर मी आशा करतो की तुमचे डोळे उघडले असतील, तुम्हाला हिरव्या पालेभाज्या आणखीनच हिरव्या दिसत असतील. पण मी येथे असे सुद्धा सांगू इच्छितो की तुम्हाला कोणते भोजन निवडायचे हा अधिकार फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे आणि मी या तुमच्या अधिकाराचा पूर्ण सन्मान करतो.


हे हि वाचा –

2 Comments
  1. Chaitanya Ashok Gaikwad. says

    It is very nice

    1. InfoBuzz says

      धन्यवाद Chaitanya Ashok Gaikwad जी.
      लेख आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

Your email address will not be published.