Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

इम्रान खान अमेरिकेवर इतके का संतापले

इम्रान खानचं हे वक्तव्य पाडणार पाकिस्तान व अमेरिकेदरम्यान वादाची ठिणगी ?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ह्यांनी असं वक्तव्य केलंय ज्यामुळे पाकिस्तान व अमेरिकेच्या दरम्यान तणाव उत्पन्न होऊ शकतो. रशिया टुडेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान इम्रान असं म्हणाले कि पाकिस्तानला अफगाणिस्तान मधील दहशतवादाविरुद्ध अमेरिकेला साथ देण्याची मोठी किंमत चुकवावी लागली असून ह्या लढ्यामध्ये अमेरिकेला आलेल्या अपयशाला पाकिस्तानच जबाबदार असल्याची अमेरिकेची टीका अयोग्य आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत येत असलेल्या अपयशाला आम्हीच जबाबदार आहोत असे अमेरिका म्हणत आहे जे अत्यंत अयोग्य आहे अश्या शब्दात इम्रान खान ह्यांनी अमेरिकेला सुनावले.

pakistan pm imran khan, pakistan pm angry on america, russia today interview with imran khan
(Image Source – BBC)

ह्यावेळी इम्रान खान ह्यांनी एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला. त्यांनी हे कबूल केले कि शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये सोव्हिएत संघाविरुद्ध लढण्यासाठी जिहाद्यांना पाकिस्ताननेच प्रशिक्षण दिले होते व ह्यासाठी लागणारा पैसा अमेरिकेनेच पुरविला होता. पण १० वर्षानंतर अमेरिकेने त्याच जिहाद्यांना आतंकवादी घोषित करून टाकले.

अमेरिकेत ९/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने तालिबान विरुद्ध युद्ध पुकारले व त्यात पाकिस्तानने अमेरिकेची मदत केली ज्याची पाकिस्तानला भारी किंमत चुकवावी लागत आहे. जर आम्ही ह्या युद्धात अमेरिकेला मदत केली नसती तर आमचा देश कधीच इतका धोकादायक बनला नसता असे इम्रान ह्यावेळी म्हणाले. ह्या युद्धात अमेरिकेला साथ दिल्यामुळे आमचे ७०,००० हुन अधिक लोक मारले गेले व आम्हाला १०० अब्ज डॉलरचा फटका बसला असे त्यांनी रशिया टुडेला ह्यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.