Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

BBC पत्रकार मार्क टली यांनी सांगितलेले भारतीय नेत्यांचे हादरवून टाकणारे किस्से

मार्क टली अर्थात “सर विल्यम मार्क टली” हे नाव तुम्ही या आधी ऐकले असेल अथवा नसेल. ते बीबीसीचे नवी दिल्लीतील ब्युरो चीफ होते. बीबीसी म्हणजेच “ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन” हे एक प्रसारण माध्यम आहे, हे प्रसारण माध्यम जगभरात बातम्या म्हणजेच समाचार देत असते. हे प्रसारमाध्यम भारतासह अन्य देशात सेवा देत आहे.

मार्क टॅली हे बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयात एक वरिष्ठ पत्रकार तसेच लेखक होते. त्यांनी स्वतःच्या वयाची 30 वर्षे बीबीसीच्या सेवेत घालवली. ते 1964 रोजी बीबीसी मध्ये रुजू झाले होते व तेथून पुढे 30 वर्षे म्हणजेच 1994 पर्यंत ते या प्रसारमाध्यमाच्या सेवेत होते व त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एक वरिष्ठ पत्रकार तसेच एक उत्तम लेखक असल्याने त्यांचे तत्कालीन अनेक मोठ्या नेत्यांशी तसेच मंत्र्यांशी उठणे-बसणे असायचे. त्यांनी एक पुस्तक लिहिले त्याचे नाव होते “Upcountry Tales” या पुस्तकाद्वारे त्यांनी अनेक राजनैतिक किस्से सांगितले आहेत ते आपण पाहणार आहोत.

(1) इंदिरा गांधींचा किस्सा

मार्क टली हे इंदिरा गांधी यांची भेट घेण्यासाठी बीबीसीचे डायरेक्टर जनरल यांना घेऊन गेले होते, पण त्या डायरेक्टर जनरलच्या संवादादरम्यान इंदिरा गांधी येवढा कंटाळल्या होत्या की संपूर्ण संवादादरम्यान त्या आपला पेन टेबलवर वाजवत होत्या. मार्क टली यांना समजले की इंदिरा गांधी खूप कंटाळून गेल्या आहेत. त्यानंतर लगेच मार्क यांनी दुसऱ्या डायरेक्टर जनरल यांना भेटण्यासाठी इंदिरा गांधींकडे नेले.

mark tally bbc reporter, मार्क टली, सर विल्यम मार्क टली, बीबीसी, इंदिरा गांधीं, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह,  राजीव गांधी, जनरल झिया उल हक, BBC पत्रकार मार्क टली, भारतीय नेत्यांचे किस्से, indian politicians Anecdote
Source – Economictimes.

या डायरेक्टर जनरलचा बोलण्याचा अंदाज इंदिरा गांधी यांना खूप आवडला, दोघांनी खूप वेळ टेलिव्हिजन जगत तसेच इतर बाबींवर व राजकारणाविषयी चर्चा केली. त्या काळी बीबीसीने राजकारणाविषयी एक सिरीज रिलीज केली होती. ही सिरीज इंदिरा गांधी यांना खूप आवडली होती, त्यामुळे त्यांनी जनरल यांना विनंती केली की ही सीरिज दूरदर्शनवर दाखविण्यात यावी. कारण या सिरीज द्वारे इतर राजकीय नेत्यांना पेचात पाडले जाऊ शकते, असे इंदिरा गांधी यांना वाटले असावे.

डायरेक्टर जनरल मीटिंग मधून बाहेर पडले व लंडनला पोहोचल्यावर तिथे आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली व म्हणाले, दूरदर्शन कमी पैसे देत असेल तरीही दूरदर्शनला भारतात एस मिनिस्टर (Yes Minister) चे राइट्स देण्यात यावी.

त्यानंतर तिसरे डायरेक्टर जनरल इंदिरा गांधी यांना भेटण्यासाठी आले होते पण तोवर भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती व इंदिरा गांधींची 1980 च्या निवडणुकीत वापसी सुद्धा झाली होती. जनरल डायरेक्टरांनी इंदिरा गांधीची 1980 च्या निवडणुकीत वापसी झाल्यानंतर विचारले की, कसे वाटले तुम्हाला मध्यंतरी काळात लोकांचे समर्थन व सत्ता गमावून ? असा प्रश्‍न एकताच इंदिरा गांधींना राग आला त्या आपल्या जोशील्या अंदाजात म्हणाल्या, मी लोकांचे समर्थन कधीही गमावले नव्हते पण सत्ता गमावली होती व त्यात बऱ्याच अफवांना खतपाणी मिळाले होते व अशा अफवा पसरविण्यात बीबीसी सुद्धा सामील आहे. अफवांमध्ये बीबीसीचा हात आहे हे ऐकताच डायरेक्टर जनरल अचंबित झाले व त्यांनी लगेच विषय बदलला.

(2) मोरारजी देसाई यांचा किस्सा

मोरारजी देसाई हे भारताचे चौथे पंतप्रधान होते. 1977 ते 1979 या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून कारभार पाहिला होता. मोरारजी देसाई हे स्वतःचे मूत्र पिण्यासाठी प्रसिद्ध होते, मस्करी म्हणून लोक या गोष्टीला “मोरारजी कोला” असे म्हणायचे.

mark tally bbc reporter, मार्क टली, सर विल्यम मार्क टली, बीबीसी, इंदिरा गांधीं, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह,  राजीव गांधी, जनरल झिया उल हक, BBC पत्रकार मार्क टली, भारतीय नेत्यांचे किस्से, indian politicians Anecdote
Source – The Sunday Guardian

मार्क टली यांना वाटले की मोरारजी देसाई यांच्यावर एक चित्रपट बनवण्यात यावा. सुरुवातीला चित्रपट तयार करताना काही अडचणी येत होत्या पण त्यानंतर मोरारजी यांनी स्वतः दखल घेतली व होणाऱ्या अडचणी दूर केल्या. चित्रपटाची शूटिंग सुरू होण्याआधी मोरारजींनी मार्क टली यांना विचारले की कसा दिसतो मी ? मार्क टलींनी क्षणभर मोरारजी देसाईंवर नजर फिरवली व म्हणाले तुम्ही खूपच युवा दिसत आहात.

त्यावर मोरारजींनी विचारले तुमचे वय किती आहे, मार्क टली म्हणाले जवळपास 40, त्यावर मोरारजी देसाई हसले व म्हणाले माझं वय सध्या 80 आहे आणि मी आता ही तुमच्या पेक्षा जास्त चमकत आहे तुम्हाला सुद्धा मूत्र पिण्यास सुरू केले पाहिजे. यावर मार्क टली हसतच राहिले कारण त्यांच्याकडे या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते.

(3) चौधरी चरण सिंहचा किस्सा

चौधरी चरण सिंह हे मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते व तसेच त्यांनी भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणूनही कारभार पहिला आहे. ते दिल्ली पोलिसांशी खूपच नाराज राहायचे जे गृहमंत्रालय अंतर्गत येते. चरण सिंह यांना वाटायचे की, मी जरी दिल्ली पोलिसांवर नाराज असलो तरी मी काय करू शकतो, जास्तीत जास्त त्यांचे ट्रान्सफर करू शकतो. पण मी जेव्हा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्याकडे जास्त अधिकार होते पोलिसांना दंडित करण्यासाठी. हे होते चौधरी चरण सिंह यांचे दुखणे.

मार्क टली यांनी आपल्या पुस्तकात असेही लिहिले आहे की त्यांना दोन किसान नेता फार आवडायचे एक चौधरी चरण सिंह व दुसरे देवीलाल.

(4) देवीलाल यांचा किस्सा

डिसेंबर 1979 ला दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली या बैठकीत जनता दलाच्या मंत्र्यांनी पंतप्रधान म्हणून देवीलाल यांचे नाव सुचवले होते, तर चंद्रशेखर आपली दावेदारी स्वतःच्या मनात ठेवून बसले होते. मग देवीलाल उभे राहिले आणि म्हणाले मी ताऊच ठीक आहे आणि मी व्हि.पी. सिंह यांचे नाव प्रस्तावित करीत आहे. या निर्णयाने चंद्रशेखर खूप नाराज झाले.

mark tally bbc reporter, मार्क टली, सर विल्यम मार्क टली, बीबीसी, इंदिरा गांधीं, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह,  राजीव गांधी, जनरल झिया उल हक, BBC पत्रकार मार्क टली, भारतीय नेत्यांचे किस्से, indian politicians Anecdote
Source – The Hindu

त्या दिवशी संध्याकाळी देवीलाल यांनी मार्क टलीला फोन केला आणि म्हणाले, तुम्हाला माझा निर्णय कसा वाटला मी काही चुकी तर केली नाही ना ? मार्क टली म्हणाले, आता तुम्हाला लोक सत्तेचा लालची असणारा माणूस म्हणणार नाहीत, तुमची राजनीतिक प्रतिमा उंचावेल. त्यानंतर देवीलाल म्हणाले, तुम्ही तुमचे सहयोगी सतीश जेकबला फोन द्या, सतीश जेकबला देवीलाल म्हणाले, मार्क टली मला महान म्हणत आहेत पण मला माहित आहे की मी सर्वात मोठी चूक केली आहे.

(5) राजीव गांधीचा किस्सा

त्याकाळी राजीव गांधी काँग्रेसचे महासचिव होते व त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, तेव्हा राजीव गांधी प्रत्येक वेळी विदेशी पत्रकारांना भेटत असत. ते मार्क टलीला म्हणत असत, माझ्या आईला कोणीतरी भ्रमित केले त्यामुळे त्यांच्यापर्यंत सामान्य जनतेचा आवाज जात नाही आणि हा भ्रम योग्य नाही.

mark tally bbc reporter, मार्क टली, सर विल्यम मार्क टली, बीबीसी, इंदिरा गांधीं, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह,  राजीव गांधी, जनरल झिया उल हक, BBC पत्रकार मार्क टली, भारतीय नेत्यांचे किस्से, indian politicians Anecdote
Source – ThePrint

पण नंतरच्या काळात जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान बनले त्यांनाही अशा विचित्र भ्रमांनी चिंतित केले. त्यांच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी जेव्हा राजीव गांधींशी मार्क टली यांनी चर्चा केली तेव्हा राजीव गांधी यांना स्वतःची चूक कळाली व ते म्हणाले आपण आता फक्त देशाचा विचार करू.

(6) जनरल झिया उल हक यांचा किस्सा

जनरल झिया उल हक हे 1977 ते 1988 च्या काळात लष्कर प्रमुख तसेच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. एकदा मार्क टली पाकिस्तानचे पीआरओ कर्नल सादिक यांना भेटण्यासाठी गेले होते, बैठक पार पडल्यानंतर मार्क टली घाई घाई निघाले पण कर्नल सादिक यांनी मार्क टलीला अडवले व सांगितले की तुम्ही आता जाऊ शकत नाही व काही वेळ थांबवून ठेवल्यावर त्यांनी मार्क यांना सांगितले की आता तुम्ही जाऊ शकता. त्यावर मार्क टली म्हणाले की तुम्ही मला इतक्या वेळ का अडवून धरले होते त्याचे कारण मला समजेल का ? तेव्हा कर्नल म्हणाले की खालच्या मजल्यावर झिया-उल्-हक नमाज पडत होते जर तुम्ही त्यांना नमाज पढताना बघितले असते तर तुम्ही त्यांच्या नमाजात भंग आणला असता कारण मार्क टली व झिया-उल-हक यांच्यात काही कारणास्तव मतभेद होते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More