Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जंजिऱ्यात शिरणारा पहिला मराठी वाघ

वडील शहाजीराजेंचे मार्गदर्शन आणि आई जिजाबाईंच्या संस्कारातून बाल शिवरायांच्या मनात स्वराज्याची संकल्पना तयार झाली. स्वराज्य स्थापन करण्याच्या दिशेने शिवरायांची पाऊले पडू लागली, विविध मावळ्यांच्या मनात आपल्या स्वतंत्र राज्याची संकल्पना मांडून त्यांना सामील करून घेणे हा एक महत्वाचा टप्पा. यानंतर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेऊन शिवरायांनी परकीय सत्तेला सुरुंग लावण्यास सुरवात केली. याचा शुभमुहूर्त झाला तो तोरणा पासून, अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी तोरणा जिंकून घेतला.

स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना अखंड साथ लाभ ती मावळ्यांची. स्वराज्याच्या या अग्निकुंडात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची दिल्यानंतर हे स्वप्न साकार झाले. बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, बहिर्जी नाईक, गोदाजी जगताप अश्या असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजू लावून शिवरायांची साथ दिली. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या अनेक मावळ्यांची नाव आजही पडद्यामग आहेत. असच एक नाव म्हणजे कोंडाजी फर्जंद. आता हे नाव तुम्हाला फारच नवीन नसेल कारण पन्हाळगड ताब्यात घेण्याच्या कोंडाजीच्या पराक्रमावर नुकताच चित्रपट येऊन गेला आहे. याच कोंडाजी फर्जंद यांचा पराक्रम या लेखात आम्ही सांगत आहे.

कोंडाजीचे वडील हिरोजी फर्जंद यांचा उल्लेख महाराजांच्या सुरूवातीच्या काही जोखमींच्या मोहीमा यशस्वी करणार्या शिलेदारांमध्ये होतो. आपल्या वडीलांप्रमाणेच कोंडाजी सुध्दा अतिशय चपळ व शूर योद्धा होता. पन्हाळगड मोहिमेवर आधारित असलेल्या फर्जंद चित्रपट याचा प्रत्यय तुम्हाला आलाच असेल. जंजिऱ्यात शिरणारा पहिला मराठी वाघ म्हणजे कोंडाजी फर्जंद च होय.

जंजिरा म्हणजे एक आभेद्य सागरी किल्ला. सागरात उभारलेलं एक शहरचं जणू. इतिहासात हा किल्ला निजामाचा वजिर मलिक अंबर याने बांधला. पण हे अर्धसत्य आहे. तुम्ही जंजिर्याला जर भेट दिली तर तेथील स्थानिक लोकांच्या माहिती प्रमाणे हा किल्ला राम पाटील नावाच्या कोळी गटाच्या प्रमुखाने बांधला होता. आता याला कागदपत्री पुरावा उपलब्ध नाही पण लोकांचा मात्र यावर विश्वास आहे. पाटलानं भक्कम किल्ला न बांधता फक्त एक लाकडाचा मेंढेकोट बांधला होता. नंतर मलिक अंबर ने हा मेंढेकोट जिंकून घेऊन त्याला भक्कम तटबंदी देऊन याचे किल्ल्यामध्ये रूपांतर केले. पुढे हा किल्ला सिध्दी जौहरच्या हाती गेला.

सिध्दी हे मुळचे आफ्रिकेमधील व्यापाराच्या निमित्ताने ते भारतात आले आणि त्यांनी या किल्ल्यावरून आपली सूत्रे हालवण्यास सुरूवात केली. सिध्दी स्वतःला बादशहाचे निष्ठावंत म्हणवून घेत. परंतु जंजिऱ्यामुळे महाराष्ट्राच्या सागरीकिनाऱ्यावर त्यांचा मोठ्ठा वट होता. हा किल्ला आभेद्य, दुहेरी तटबंदी असलेला, बुरूजांची मांडणी अशी कि शत्रुला किल्यामध्ये शिरायची वाट सापडत न्हवती. किल्ल्याच्या भोवतीचा समुद्र ह्या किल्ल्याला अजुनच बळकटी देत होता. असंख्य प्रयन्त झाले पण किल्ला कोणालाही जिंकता येत नसल्यामुळे सिद्दीच्या शिडांत वारे गेले आणि तो स्थानिकांना त्रास देऊ लागला. याची खबर शिवरायांन पर्यंत आली. सिध्दींचा सागरी दरारा मोडण्यासाठी व उत्तर किनारपट्टीवर स्वराज्याची ताकद वाढविण्यासाठी हा किल्ला खुप महत्वाचा आहे हे महाराजांनी जाणले होते. महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यातील एक प्रयत्न जो प्रयत्न यशस्वी झाला असता तर कदाचीत जंजिरा सुध्दा स्वराज्यात असता.

जंजिरा स्वराज्यात आणण्यासाठी महाराजांचे प्रयत्न सुरू होते. यावर जोरदार खलबते चालू होती त्यावेळी बहिर्जी किल्ल्यात असणाऱ्या कोठारी माहिती घेऊन आला आणि जंजिरा फत्ते होण्याची आशा दिसू लागली. जंजिर्याचे जर कोठार उडवले तर सिध्दीची ताकद संपेल व आपण किल्ला सहज फत्ते करू अशी रणनीती महाराजांच्या डोक्यात चालु होती. खलबत झालीत आणि यावर शिक्कमोर्तब झाले. मग प्रश्न होता हि कामगिरी कोण फत्ते करणार ? अनेकांची नाव समोर आली आणि मग यासाठी कोंडाजी फर्जंदच नाव सगळ्यांच्या पसंतीस आले. कोंडाजीला बोलावणं धाडून याची कल्पना देण्यात आली आणि मोहिमेस सुरवात झाली. ठरल्याप्रमाणे कोंडाजीने कोठार उडवताच कान्होजी आंग्रे किल्ल्यावर बाहेरून हल्ला करेल हे निश्चित झालं.

सगळी तयारी झाली, कोंडाजीने व्यापारी बनुन किल्ल्यामध्ये प्रवेश केला. खलबतामध्ये हेर खात्याने सांगितल्याप्रमाणे कोठारांचा शोध सुरु झाला. व्यापारी बनून गेल्याने कोंडाजीवर सैनिकांचे बारीक लक्ष होते. कमालीच्या गस्तीमध्ये सुद्धा कोंडाजीने कोठारी ठिकाणं शोधून काढली. कोंडाजीने कोठारी उध्वस्त करण्यासाठी प्रयत्न चालू केले पण दुर्दैवाने त्यात त्याला यश आले नाही. कोंडाजी सिध्दीच्या हाती लागला. माहिती मराठ्यांच्या पर्यंत पोचायच्या आताच सिध्दीने कोंडाजीला कैद करून त्याचा शिरच्छेद केला. स्वराज्याने एक हिरा गमावला. जंजिरा स्वराज्यात सामील होऊ शकला नाही पण कोंडाजीने जंजिर्यात शिरून सिध्दीच्या डोक्याला घाम फोडला.

स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची तमा न बाळगणाऱ्या अश्या या वीरांना मानाचा मुजरा!


Leave A Reply

Your email address will not be published.