Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

खळखळून हसवणारे मराठी जोक्स। Marathi Joke

दिवसभराच्या धावपळीत माणूस हसायचं विसरूनच जातो, वैज्ञानिकांच्या माहितीनुसार आरोग्यदायी जीवनासाठी हसणे फार महत्वाचे आहे. अति ताण तणाव माणसाला अति आजारपणाकडे घेऊन जात आहे. म्हणूनच Infobuzz घेऊन आले आहे भन्नाट मराठी जोक जे तुम्हाला हसून हसून पोट दुखायला लावेल. वाचा Marathi Joke आणि राहा तंदुरुस्त. marathi jokes sms आवडल्यास शेअर करायला विसरू नका.


एक सभ्य माणसाला काय पाहिजे:
एक बायको जी प्रेम करणारी,
एक बायको जी चांगली जेवण बनवणारी,
एक अशी बायको जी कुटुंबाला सांभाळणारी
आणि,
या महत्वाचे म्हणजे या तिघीही एकत्र आनंदाने राहणाऱ्या पाहिजे.

नवरा – “तीन दिवस झाले वांग्याची भाजी खातोय… वैताग आलाय… आता महिनाभर तरी खाणार नाही मी,
वांग्याची भाजी…”
बायको – हीच गोष्ट दारुसाठी बोला ना… रोज रोज ढोसून येता…. मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा….
नवरा – बनव उद्या पण वांग्याची भाजी…. मस्त बनवतेस तू…

पेट्रोल पंपावर पाहिले…
प्रत्येकजण आपल्या बायकोला पेट्रोल पंपाच्या बाहेर उतरऊन पेट्रोल भरायला जात होता.
मी खूप विचार केला… असे का???
नंतर तिथला बोर्ड पाहिला ….
आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्यात….

नवरे मंडळींच्या कानावर बायकोचा पडणारा शब्द !!!
खाली उत्तर वाचल्यास हसू येईल कारण गावंढळ असो वा उच्च शिक्षित सर्व बायकांचे डोके देव एकाच फॅक्टरीत बनवतो.
उत्तर – मी आहे म्हणूनच टिकले दुसरी कोण असती तर केव्हाच सोडून गेली असती.

बायको – ते शेजारच्या शीलाचे पती बघा, शीलाला महिन्यातून दहा दिवस कुठे ना कुठे, फिरायला नेत असतो.
तुम्ही कधी घेऊन जाता का?
नवरा – मी ४-५ वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही!!!!

Marathi Joke, marathi jokes sms, मराठी विनोद, Jokes in marathi, marathi jokes download, marathi jokes in marathi, फॅमिली मराठी जोक्स, Family Jokes in Marathi, Marathi Vinod, funny Marathi, Husband Wife joke
Source – BBC
Marathi Joke, marathi jokes sms, मराठी विनोद, Jokes in marathi, marathi jokes download, marathi jokes in marathi, फॅमिली मराठी जोक्स, Family Jokes in Marathi, Marathi Vinod, funny Marathi, Husband Wife joke

पत्नी – ऐकलं का? पेपरमध्ये बातमी आली आहे की एका नवऱ्याने आपल्या पत्नीला विकलं?
पती – अरे वा, कितीला?
पत्नी – एका सायकलसाठी त्याने असं केलं. तुम्ही तर अस नाही ना करणार?
पती – मी इतका मूर्ख थोडी आहे. तुझ्या बदल्यात तर मी कार घेईन.

बायको- देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे
नवरा- अरे वा, इतका आवडतो मी तुला?
बायको- नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला कोण परत शिकवत बसणार.

बायको :- अहो, ऐका ना, हे असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ बरं……
नवरा :- का ?
बायको :- परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की, तुझा वरण-भात आला बघ.”

बायको : माझ्यासाठी वाघाची शिकार करा, मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे….
नवरा : अगं हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग
बायको : ठीक आहे, तुमच्या मोबाईल मधले व्हाटसप चे मेसेजेस दाखवा….
नवरा : वाघ साधा हवा की पांढरा ??

एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तीच पुसून टाकली आणि माणसाला विचारले,”काही आठवते का?”
माणूस : हो, फक्त बायकोचे नाव
देव हसला अन म्हणाला, सगळा फॉरमॅट केला पण वायरस गेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.