Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

…तर कदाचित आज ‘अझीम प्रेमजी’ आणि ‘विप्रो’ दोन्ही पाकिस्तानात असते

तांदुळ निर्यातीपासून सॉफ्टवेअरपर्यंतचा विप्रोचा थक्क करणारा प्रवास

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ज्यांचे नाव घेतले जाते ते अझीम प्रेमजी यांनी नुकताच विप्रोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एखाद्या उद्योगपतीची निवृत्ती हा काही फार चर्चेचा विषय नसते, पण अझीम प्रेमजीं यांची निवृत्ती याला नक्कीच अपवाद आहे. कारण, ते केवळ पैशाच्या मागे धावणारे उद्योगपती नसून एक दानशूर उद्योगपती आहेत. तब्बल ५३ वर्षे विप्रो कंपनीची धुरा त्यांनी सांभाळली आहे.

नुकतीच त्यांनी ३० जुलै रोजी निवृत्ती घेतली. कंपनीचे अध्यक्ष म्हणून निवृत्त होत असले तरी 74 वर्षीय अझीम प्रेमजी कंपनीचे संचालक आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून 2024 पर्यंत कार्यरत राहतील. अझीम प्रेमजी यांनी सुरुवातीला तेल आणि साबण बनवण्याचं काम करणाऱ्या आपल्या कंपनीला 1985 च्या दरम्यान आयटी क्षेत्रातही पुढे आणलं. इथूनच विप्रोचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं.

तांदूळ ते सॉफ्टवेअर

गुजरातमध्ये एका मुस्लिम परिवारात २४ जुलै १९४५ रोजी अझीम प्रेमजी ह्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा तांदळाचे मोठे निर्यातदार होते व अनेक देशांत तांदुळाची निर्यात करत होते. त्यांच्या ह्या व्यापाराचा विस्तार इतका मोठा होता कि तांदुळाची निर्यात करण्यासाठी वेगवेगळ्या देशात त्यांची कार्यालयं होती. त्यांना ‘राईस किंग’ म्हणूनही ओळखले जात होते.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आपल्या देशप्रेमामुळे अझीम यांचे वडील मोहम्मद हशेम प्रेमजी हे पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत न होता भारतातच राहिले.

मोहम्मद अली जिना ह्यांचे प्रेमजी कुटुंबियांशी जवळचे संबंध होते. जिना यांनी मोहम्मद हशेम प्रेमजी ह्यांना पाकिस्तानमध्ये येण्याचा आग्रह अनेक वेळा केला पण त्यांनी भारत सोडण्यास नकार दिला. त्यांनी भारतातच तेल, तूप, साबण इत्यादी वस्तूंचे उत्पादन करण्याचा कारखाना सुरु केला होता. त्या कंपनीचे नाव होते “वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स”. या कंपनीच्या आद्याक्षरांपासूनच ‘विप्रो’ हा शब्द तयार झाला.

azim premji family, azim premji education, m.h. hasham premji, azim premji facts, azim premji donation, azim premji story, mohammad ali jinnah, pakistan, india pak partition, azim premji journey, wipro journey, wipro story, success story of wipro, अझीम प्रेमजी, मोहम्मद अली जिन्नाह, फाळणी, अझीम प्रेमजी बायोग्राफी, विप्रो माहिती, azim premji in marathi
azim premji education, m.h. hasham premji, azim premji facts (Source – Business Line)

मोहम्मद हाशेम प्रेमजी ह्यांचे निधन झाले आणि वयाच्या केवळ २१ व्या वर्षी संपूर्ण उद्योगाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यावेळी विप्रो कंपनीची व्याप्ती फारशी मोठी नव्हती. अझीम त्यावेळी नामांकित अश्या स्टॅनफोड युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शिकत होते. १९६६मध्ये कंपनीची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली.

वेगवेगळ्या क्षेत्रात कंपनीचा मोठा विस्तार होत गेला. आपल्यासारखे अनेक उद्योग पुढे येत आहेत, नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत आहे हे पाहून अझीम यांनी आपल्या व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. केवळ तांदूळ, तेल, साबण निर्मितीपुरतेच मर्यादित न राहता त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इतर अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश केला होता.

विप्रो टेक्नॉलॉजिस (Wipro Technologies), विप्रो फ्लुइड पॉवर (Wipro Fluid Power), विप्रो लायटिंग (Wipro Lighting), विप्रो इन्फ्रास्ट्रक्चर (Wipro Infrastructure Services), विप्रो इको एनर्जी (Wipro Ecoenergy), विप्रो मॉड्युलर फर्निचर (Wipro Modular Furniture) अश्या अनेक व्यवसायांमध्ये पदार्पण केले. यासाठी लागणारी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी टिकणारी माणसे निवडणे प्रेमजींसाठी आव्हानात्मक काम होते.

मला त्याच ठिकाणी गाडी पार्क करायची असेल, तर मला ऑफिसला इतरांपेक्षा लवकर यायला पाहिजे….”

अझीम प्रेमजी यांचं राहणीमान अगदी साधं आहे. त्यांना स्वतःच्या संपत्तीचा कसलाही गर्व नाही. एकदा ऑफिसला आल्यानंतर एका कर्मचाऱ्याने अझीमजींच्या गाडीच्या जागेवर स्वतःची गाडी पार्क केली म्हणून त्या कर्मचाऱ्याला पहारेकऱ्यांनी खडसावले. तेंव्हा त्या सेक्युरिटी गार्डला अझीम प्रेमजी बोलले कि “ज्याला जी जागा मिळेल त्या ठिकाणी कर्मचारी आपली गाडी पार्क करू शकतो. मीच लवकर यायला हवे जर मला दररोज त्याच ठिकाणी गाडी पार्क करायची असेल तर.

जेंव्हा जेंव्हा अझीम प्रेमजी परदेशात जातात तेव्हा कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्येच राहणे ते पसंत करतात. एअरपोर्टला टॅक्सी किंवा रिक्षाने जातात. १९८७ मध्ये कर्नाटकमधील विप्रोच्या तुमकूर कारखान्यामध्ये विजेचे कनेक्शन घेण्यासाठी अझीमजींना एका सरकारी कर्मचाऱ्याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. अझीमजी यांनी लाच देण्यास नकार दिला. ते म्हणाले,

“नियमाने वीज मिळत नसेल, तर आम्ही स्वतःची वीज तयार करू.” मग विप्रोने जनरेटरने काम चालवले. याच्यासाठी किमान १.५ करोड रुपयांचा खर्च आला.

८० च्या दशकात भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी आणखी एक मार्ग दाखवला, तो म्हणजे सॉफ्टवेअर निर्मितीचा. त्यांनी काळाची पावले ओळखली व इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर या क्षेत्रात विप्रो इन्फोटेकने आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली.

१९८८ मध्ये विप्रोने हेव्ही ड्युटी इंडस्ट्रियल सिलेंडर आणि मोबाइल हायड्रॉलिक सिलेंडर यांचं उत्पादन चालू केलं. वैद्यकीय क्षेत्रात उपकरणे तयार करणाऱ्या ‘जनरल इलेक्ट्रिकल’ या अमेरिकन कंपनीशी करार करून १९८९ मध्ये विप्रो वैद्यकीय क्षेत्रातही उतरली.

azim premji family, azim premji education, m.h. hasham premji, azim premji facts, azim premji donation, azim premji story, mohammad ali jinnah, pakistan, india pak partition, azim premji journey, wipro journey, wipro story, success story of wipro, अझीम प्रेमजी, मोहम्मद अली जिन्नाह, फाळणी, अझीम प्रेमजी बायोग्राफी, विप्रो माहिती, azim premji in marathi
झीम प्रेमजी बायोग्राफी, azim premji donation (Source – Timesnownews)

१९९२ मध्ये विप्रो फ्लुइड पॉवर डिव्हिजनने बांधकाम उपकरणे आणि ट्रक टिपिंग सिस्टिमसाठी मानक हायड्रोलिक सिलेंडर ऑफर करण्याची क्षमता विकसित केली. १९९५ मध्ये विप्रोची उत्पादन निर्मिती आणि वाढता विकास पाहून विप्रोला ‘आयएसओ ९००१ (ISO ) नामांकन मिळाले.

१९९९ मध्ये विप्रोने सुपरजीनिअस पर्सनल कॉम्प्यूटर (Wipro Super Genius Computer) निर्माण करून जागतिक स्तरावर आपला वेगळा ठसा उमटवला.

विप्रोचे सध्याचे बाजारमूल्य आहे १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स. १ लाख ७० हजारपेक्षाही जास्त कर्मचारी विप्रोमध्ये काम करतात. जगभरात ५४ देशात विप्रोची कार्यालयं आहेत. मुख्य कार्यालय बंगळूरू येथे आहे.

अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित

अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून अझीम प्रेमजी यांनी कर्नाटकात अझीम प्रेमजी विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरवले आहे. भारत सरकारने त्यांचे औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य, दानशूरता असे सर्व प्रकारचे काम लक्षात घेऊन २००५ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०११ मध्ये ‘पद्मविभूषण’ या उच्च नागरी पुरस्काराने गौरविले आहे. २००९ मध्ये त्यांना अमेरिकेतील वेस्लेयन विद्यापीठाने (Wesleyan University USA) डॉक्टरेट पदवी प्रदान केली. जगातील २० सर्वाधिक सामर्थ्यवान पुरुषांच्या यादीत एशिया वीक ने त्यांचा समावेश केला. सन २००० मध्ये त्यांना हा बहुमान मिळाला. टाइम्स ह्या अत्यंत प्रतिष्ठित मॅगझिनने २००४ साली त्यांना एक प्रभावशाली उद्योजक म्हणून गौरवले.

Leave A Reply

Your email address will not be published.