Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

कुंभकर्णाला वरदान म्हणून मिळालेल्या झोपेचं रहस्य

रामायण प्रत्येकाला माहितीच आहे. रामायणामध्ये अशा एका राक्षसाचा उल्लेख करण्यात आलेला आहे जो सहा महिने झोपत होता आणि सहा महिने जागा राहत होता. त्याचे नाव कुंभकर्ण होते हे तर सर्वांनाच माहित आहे. पण, तो इतक्या दीर्घकाळासाठी निद्रिस्त कसा काय राहू शकत होता ह्याविषयीचे रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत.

कुंभकर्ण रावणाचा लहान भाऊ होता पण, रावणापेक्षा अधिक बुद्धिवान होता. त्याचे हृदय अत्यंत पवित्र होते . जेव्हा रावण कुंभकर्णाकडे रामाविरुद्ध मदत मागण्यासाठी गेला तेव्हा कुंभकर्णाने त्याला समजावून सांगितले की तो जे करत आहे ते चुकीचे आहे. तरीही आपला मोठा भाऊ संकटात आहे हेच जाणून कुंभकर्णाने रावणाची मदत केली.

कुंभकर्णाच्या झोपेविषयी अनेक दंतकथा आहेत. असे म्हणतात की कुंभकर्ण जागेपणी एवढे अन्नग्रहण करत असे जेवढे संपूर्ण सृष्टीमध्ये कोणी करत नसे. त्याच्या भुकेच्या काळामध्ये तो ऋषीमुनीनांही खायला कमी करत नसे. त्यामुळे जर तो नेहमी जागाच राहिला असता तर सृष्टीमधील कुठलाच प्राणी जिवंत दिसला नसता. त्यामुळे सृष्टीची चींता असलेल्या बिभीषणाने कुंभकर्णासाठी झोपेचे वरदान मागितले होते.

याच रहस्ययाबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्र म्हणजे देवांचा राजा. असे म्हणतात की इंद्र कुंभकर्णाची ईर्षा करत असे. कारण कुंभकर्ण त्याच्यापेक्षा पराक्रम आणि बुद्धीने अधिक शक्तिशाली होता. एकदा रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण यांनी ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करण्यासाठी यज्ञयाग सुरू केला. त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा कुंभकर्णाने चुकून इंद्रासनाच्या ऐवजी निद्रासन ब्रह्मदेवाकडे मागितले. कुंभकर्णाला त्याची ही चूक लक्षात आली होती पण तेव्हा खूपच उशीर झाला होता. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून गेले होते आणि काही कळायच्या आत कुंभकर्ण निद्राधीन झाला होता. याच कथेबद्दल असे सांगतात की कुंभकर्णाकडून जी चूक झाली त्या चुकी मागेही इंद्र होता. त्याने स्वतःचे सिंहासन वाचवण्यासाठी सरस्वती देवीला विनंती करून त्याच्या मुखातून निद्रासन वदवुन घेतले होते.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.