Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धातील गौरवशाली पराक्रम सांगणारे हे चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

आज रविवार २६ जुलै. भारत आज २१ वा कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा करत आहे. २६ जुलै भारतासाठी तो दिवस आहे, ज्या दिवशी १९९९ मध्ये तब्बल २ महिने चाललेल्या कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारत मोठा विजय मिळवला. दोन देशात सरळ होणाऱ्या युद्धापेक्षा हे फारच वेगळे होते म्हणून कारगिलच्या या युद्धाला अनेक पैलू आहेत. भारताच्या या विजयात आपल्या प्राणांची तमा न बाळगता लढणाऱ्या अनेक वीरांच्या कथा आपल्याला माहित आहेत आणि यातील बहुतेक कथा चित्रपटाच्या रूपाने मोठ्या पडद्यावर आल्या आहेत. आज Kargil Vijay Diwas निम्मित आम्ही सांगत आहे कारगिलच्या विजयावर कोणते कोणते चित्रपट बनले आहेत.
लक्ष्य
कारगिलच्या पार्शवभूमीवर चित्रपटांमध्ये सगळ्यात पहिले नाव येते ते ‘लक्ष”. २००४ मध्ये फरहान अख़्तर ने रितिक रोशन आणि अमिताभ बच्चन यांच्या सोबत लक्ष नावाचा चित्रपट बनवला होता. लक्ष चित्रपट कारगिलच्या फिक्शनल बैकग्राउंडवर बनवला होता. या चित्रपटात अभिनेता रितिक रोशन ने कॅप्टन करण शेरगिल यांची भूमिका साकारली होती. यात तुम्हाला कारगिल दरम्यानचे वातावरण आणि प्रत्यक्ष सीमारेषेवरील घटना समझतील.
एलओसी कारगिल
१९९९ मध्ये पाकिस्तानने धोक्याने कारगिल सेक्टरवर ताबा मिळवला. गोष्टी उघड झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे पुढे उभे ठाकले. यानंतर तब्बल २ महिने चालेल्या युद्धात भारताने पाकला धूळ चारली. २००३ मध्ये जेपी दत्ता यांनी यावर एलओसी कारगिल हा चित्रपट बनवला होता यामध्ये एका पेक्षा एक स्टार आहेत.
Tango Charlie (2005)
कारगिल युद्धा सोबतच भारतीय सैन्याना कोणत्या त्रासातून जावं लागलं होत यावर हा चित्रपट भाष्य करतो. Ajay Devgn आणि Bobby Deol यांचा दमदार अभिनय तुम्हाला पाहायला मिळेल. मणी अय्यर यांच्या या चित्रपट फक्त युद्धच नव्हे तर जवानांना यांच्या व्यक्तींपासून कास दूर राहून या छुप्या युद्धाला सामोरे जावं लागलं हे दाखवण्यात आले आहे.
Stumped (2003)
२००३ मध्ये प्रसारित झालेला Stumped (2003) चित्रपट सुद्धा कारगिलच्या युद्धावर आधारित आहे. यामध्ये कारगिलवर गेलेल्या सैन्य जवानांच्या पत्नीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. जवानांच्या पत्नीची भूमिका रविना टंडन ने साकारली आहे तसेच या चित्रपटाची निर्मिती सुद्धा रविनाने केली आहे.
मौसम (2011)
२०११ मध्ये प्रदर्शित झालेला मौसम चित्रपट सुद्धा कारगिल युद्धावर आधारित आहे. यामध्ये एका पंजाबी माणसाची गोष्ट सांगण्यात आली आहे. या पंजाबी माणसाचे एका काश्मिरी मुलीवर प्रेम असते पण युद्धामुळे त्यांना वेगळे व्हावे लागते. यात सर्वसामन्य माणसांवर काय परिणाम झाले हे तुम्हाला पाहायला मिळेल. या चित्रपटात शाहिद कपूर आणि सोनम कपूर या दोघांची झलक पाहायला मिळाली होती.
धूप
कारगिल युद्धावरच्या सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या ह्या चित्रपट फॅमिली ड्रामा दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट कारगिलच्या युद्धात शाहिद झालेले कॅप्टन अनुज नय्यर यांच्या कुटुंबावर आधारित आहे. कारगिल मध्ये शाहिद झालेल्यांच्या कुटुंबाना पेट्रोल पंप देण्यात आले होते, त्याबाबतचा अँगल या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.