Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र आणि मराठी शब्दांचा उदय

महाराष्ट्र या शब्दाचा उदय नेमका कधी झाला आणि कशावरून झाला याचा थांगपत्ता नाही. यावर अनेकांनी आपली आपली मते सांगितले आहेत पण यामध्ये मतांतरे अधिक. काही लोकांनी महाराष्ट्र हे आपण राष्ट्रवादी आहोत म्हणून आहे अस बोललं आहे तर काहींच म्हणणं अस आहे की हा प्रदेश सुजलाम सुफलाम आणि प्रगत असल्यामुळे त्याला महान राष्ट्र या उद्देशाने महाराष्ट्र असे बोलले आहे. अश्या अनेक गोष्टी अनेक तज्ज्ञांनी मांडलेल्या आहेत पण काही ठराविकच गोष्टींना ऐतिहासिक कागदाचा पुरावा आहे तो पण ठोस नाही.

सध्याच्या या काळात आपण देश, राष्ट्र आणि तत्सम संज्ञा सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून वापरतो. पण पूर्वीच्या काळी भारताचे प्रामुख्याने दोन विभाग होते, पहिला आर्यवर्त आणि दुसरा दक्षिणपथ. आता या दोन नावावरून तुम्हाला थोडासा अंदाज आला असावा की उत्तरेतील भागाला आर्यवर्त संबोधले आहे कारण या भागात आर्य लोक राहत आणि भारताच्या दक्षिणेस द्रविड लोक राहत म्हणून दक्षिणपथ. ऐतिहासिक कागदोपत्रानुसार यामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, अपरांत, कुंतल आणि देवराष्ट्र यांचा उल्लेख आहे.

महाराष्ट्र आणि मराठी शब्दांचा उदय, मराठी शब्दांचा उदय, मराठीचा उदय, सम्राट अशोक, महारठठ, महाराष्ट्रिक, Marathicha uaday, marathi shabd
Source – महान अश्या राष्ट्राचे

थोडंस मूळ मुद्द्याकडे येत आता आपण महाराष्ट्र आणि मराठी या दोन शब्दांच्या उदयावर तज्ञ लोक काय काय म्हणतात ते पाहू.

इ. स. पू. तिसऱ्या शतकात, सम्राट अशोकाच्या काळात पहिल्यांदा महाराष्ट्राचा लिखित उल्लेख आढळतो. कलिंगाच्या युद्धानंतर व्यतीत झालेल्या अशोकाने ईथुपुढे रक्तपात न करण्याची प्रतिज्ञा केली आणि बुद्ध विचारांचा स्वीकार केला. हा विचार जास्तीत जास्त भागात पोचवण्यासाठी त्याने बौद्ध धर्मचा प्रसार करण्यासाठी अनेक धर्मोपदेशक जगभरात पाठवले होते. याच वेळी बुद्ध विचारांचा प्रसार करण्यासाठी धर्मोपदेशक ‘महारठठ’ प्रदेशात पाठवल्याचा उल्लेख शिलालेख मधून मिळतो. आपल्या सगळ्यांना कौटिल्य म्हणजेच चाणक्य माहीतच आहे. इ. स. पू. दुसऱ्या शतकातील सातवाहनांच्या नाणेघाटातील लेखात सुद्धा महारठ्ठ असा उल्लेख स्पष्टपणे आढळतो. त्यानंतर महाराष्ट्रविषयी कागदी उल्लेख चंद्रगुप्त कालखंडात आढळतो ते कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये. अश्मक आणि अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख त्यामध्ये केला आहे.

इ. स. 365 च्या मध्य प्रदेशातील एरण स्तंभलेखात राजा श्रीधर वर्माचा सेनापती सत्यनाग हा स्वतःला महाराष्ट्री म्हणतो. तर चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या एहोळ प्रशस्तीमध्ये रविकिर्ती याने महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचे दिसते. यावरून आपल्याला लक्षात येईल की महा हा शब्द अनेक ठिकानी उच्चरला गेल्याच्या नोंदी इतिहासात उपलब्ध आहेत पण हा महा नेमका कोणत्या कारणामुळे उच्चरला जात होता याबाबत अधिकची माहिती उपलब्ध नाही.

यावर डॉ भांडारकर यांनी आपले मत मांडले आहे, ते म्हणतात रठ्ठ या शब्दाचे संस्कृत रूप राष्ट्रिक असून भोज स्वतःला महाभोज म्हणत असत त्याचप्रमाणे राष्ट्रीक आपणास महाराष्ट्रिक म्हणत असत. तर पा वा काणे यांच्या मते महाराष्ट्र हे नाव कुठल्याही जातीवरून किंवा वंशावरून पडले नसून ते प्रदेशच्या विस्तारावरून पडले आहे.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.