Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

शक्तीशाली मराठी सुविचार जे तुमचे जीवन बदलून टाकतील । Marathi Suvichar

शक्तीशाली मराठी सुविचार जे तुमचे जीवन बदलून टाकतील । Marathi Suvichar

आयुष्याच्या वाटेवरती कधी हायवे लागेल तर कधी अगदी कच्चा रस्ता, पण ध्येय पूर्ती करण्यासाठी आपल्याला गरज असते ते मोटिव्हेशन’ची. आता Motivation बाबत पण काहींना सतत त्याची गरज असते अगदी टॉनिक प्रमाणे तर काहींना एकदाच. आम्ही आज घेऊन आलो आहोत (Marathi Motivation) शक्तीशाली मराठी सुविचार जे तुमचे जीवन बदलून टाकतील. खालील Marathi Suvichar आपल्याला कमी आले तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमच्या ध्येयपूर्ती साठी Marathi Motivational Quotes मदत करतील अशी अशा करतो.


Marathi Suvichar 01
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात,
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.


Marathi Suvichar 02
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.


Marathi Suvichar 03
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.


Marathi Suvichar 04
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.


Marathi Suvichar 05
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.


Marathi Suvichar, Marathi Motivation, marathi quotes, marathi quotes on success, Marathi Motivational Quotes, inspirational quotes in marathi, शक्तीशाली मराठी सुविचार, प्रेरणादायक सुविचार, मराठी मोटिव्हेशन, मराठी सुविचार, इन्फोबझ्झ, Infobuzz Marathi, Infobuzz Motivational
Source – Google Marathi Suvichar, Marathi Motivation, marathi quotes, marathi quotes on success, Marathi Motivational Quotes, inspirational quotes in marathi, शक्तीशाली मराठी सुविचार

Marathi Suvichar 06
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक तुम्हाला प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी.


Marathi Suvichar 07
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.


Marathi Suvichar 08
मानवाचा दानव होणे ही त्याची हार,
मानवाचा महामानव होणे,
हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे
हे त्याचे यश आहे.


Marathi Suvichar 09
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण,
ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.


Marathi Suvichar 10
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.


अधिक Marathi Suvichar पुढील पेज वर…

शक्तीशाली मराठी सुविचार जे तुमचे जीवन बदलून टाकतील । Marathi Suvichar


Marathi Suvichar 11
खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही…..
पण मनाने श्रीमंत नक्की बना…..
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी…….
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात…


Marathi Suvichar 12
ज्याला संधी मिळते
तो नशिबवान.
जो संधी निर्माण करतो
तो बुध्दिवान.
पण जो संधीचे सोने करतो
तोच विजेता.


Marathi Suvichar 13
आनंद शोधू नका
निर्माण करा


Marathi Suvichar 14
राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतील…


Marathi Suvichar 15
क्षेत्र कोणतेही असो…
“आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही”.


Marathi Suvichar, Marathi Motivation, marathi quotes, marathi quotes on success, Marathi Motivational Quotes, inspirational quotes in marathi, शक्तीशाली मराठी सुविचार, प्रेरणादायक सुविचार, मराठी मोटिव्हेशन, मराठी सुविचार, इन्फोबझ्झ, Infobuzz Marathi, Infobuzz Motivational
Source – Google Marathi Suvichar, सुविचार, मराठी मोटिव्हेशन, मराठी सुविचार, इन्फोबझ्झ, Infobuzz Marathi, Infobuzz Motivational

Marathi Suvichar 16
हिंमतीने हारा…पण हिंम्मत हारु नका…
परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,
पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो.”


Marathi Suvichar 17
पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,
त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..


Marathi Suvichar 18
जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,
तेव्हा रस्ता बदला, “सिद्धांत” नाही,,,
कारण झाड नेहमी ‘पान‘ बदलतात ‘मूळ्या‘ नाही…
भगवत गीता मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ ‘कमजोर‘ तुझी वेळ आहे “तु” नाहीस…


Marathi Suvichar 19
यशाचा आनंद घ्या,
पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरु नका.


Marathi Suvichar 20
एवढासा जीव या जगात येण्यासाठी इतकी ताकत लावत असेल तर
आपल्याला पूर्ण आयुष्य आहे आपली ओळख निर्माण करायला…
आयुष्यात कधी खचून जाऊ नका कुठल्याही संकटाला धेर्याने सामोरे गेलात तर यश तुमच्या खांद्यावर हात
ठेऊन तुमच्या पाठीशी राहील…


Marathi Suvichar 21
जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल
फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित
होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी
करू नये. कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर
आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते.म्हणून माणसाने
आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे.


Leave A Reply

Your email address will not be published.