Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेच्या US Navy Seal ला टक्कर देणारे भारताचे Marcos Commando

अमेरिकेची US Navy Seal हि जगातील सर्वात खतरनाक फोर्स समजली जाते परंतु भारताचे Marcos Commando तिला पुरून उरतात

भारताच्या सुरक्षेमध्ये भारतीय आर्मी, भारतीय नेव्ही आणि भारतीय वायुसेना महत्वाची भूमिका बजावतात, हे आपणा सर्वांनाच ठाउक आहे. पण काही विशेष दल सुद्धा असतात जी काही अटीतटीच्या प्रसंगी शत्रूला तोंड देण्यासाठी सज्ज केलेली असतात. Paramilitary forces आणि NSG Commando हे त्याचाच एक भाग आहेत. आणखी एक विशेष फोर्स भारतीय नौदलातील जवानांची बनलेली असते, ती म्हणजे “मार्कोस कमांडो” (Marcos Commando).

ह्याची स्थापना १९८५ मध्ये “इंडियन मरीन स्पेशल फोर्सेस” (IMSF) ह्या नावाने करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांनी तिचे नामांतर “मरीन कमांडो फोर्स”(MCF) असे करण्यात आले. त्यांनाच आता “मार्कोस कमांडो” असे म्हटले जाते. ह्या कमांडोंचे ब्रिद वाक्य आहे “The Few The Fearless”. ह्या ब्रिदवाक्याचा अर्थ आपल्याला त्यांची निवड प्रकीया आणि त्यांनी पार पाडलेल्या मोहीमा जाणुन घेतल्यावर कळेल.

मार्कोस कमांडो होण्यासाठी जगातील अत्यंत कठीण प्रकीयेतुन नौदलातील जवाणांना जावे लागते. नौदलातील २० वर्षं वय असलेल्या तरुणांना ह्या प्रक्रीयेसाठी निवडले जाते. अडीच ते तिन वर्षे ही प्रकीया चालते. प्रशिक्षणाआधी तिन दिवस जवाणांची कठोर शारीरिक आणि बौद्धिक परीक्षा घेतली जाते. ह्या दोन चाचण्यांमध्येच निम्मे जवाण बाद होतात. जे टीकतात त्यांना पुढच्या चाचण्यांसाठी निवडले जाते आणि मग सुरु होते पाच आठवड्यांची त्याहुन कठिन परीक्षा.

marcos commando photos, facts about marcos commando, indian marcos commando uniform, marcos vs seals, life of marcos commando, marine commando force, Operation Cactus, marcos commando traning, marcos commando in marathi, marcos images, मार्कोज कमांडो, best commando in india, special forces of india

Marcos Commando चं ट्रेनिंग

ह्या जवानांना न झोपता, मोजकेच खाद्य खाउन कसरत करायला सांगितले जाते. ह्या प्रकियेत जे टिकतात त्यांनाच मुळ प्रशिक्षणासाठी निवडले जाते आणि मग त्यांची खरी परीक्षा सुरु होते. दिवस सुरु होतो तो २० किमी धावण्यापासुन. रात्री ६० किलो वजन खांद्यावर घेउन २० किमी रनिंग करावी लागते. ही प्रक्रिया दिवसाआड पाळली जाते. ह्या कमांडोंना भूदल, नौदल आणि वायुदल ह्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणातुन जावे लागते. आय.एन.एस. अभिमन्यु, मुंबई येथे त्यांना पॅरा जंपिंगचे प्रशिक्षण दिले जाते आणि नंतर कोची येथे भारतीय नौदलाच्या डायव्हिंग स्कुलमध्ये डायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाते.

ह्या प्रशिक्षणानंतर हे कमांडो आपल्या खुबी नुसार क्रमाने ठरवलेल्या दलांमध्ये काही काळासाठी सामील होतात. ज्यामध्ये विद्रोही शक्तींविरोधी दल, ॲंटी-हायजॅकींग आणि ॲंटी-पायरसी स्कॉड आणि गुप्त मोहीमा पार पाडणे, युद्धजन्य परीस्थितीत काम करणे इ. गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

सर्वे मार्कोस कमांडो पॅरा-जंपिंगमध्ये अग्रेसर असतात. त्यातले काही हालो (HALO)/ हाहो (HAHO) पॅरा जंपसाठीही अग्रेसर असतात. हाहो (HAHO), म्हणजे हाय अल्टिट्युड हाय ओपनिंग आणि हालो (HALO) म्हणजे हाय अल्टिट्युड लो ओपनिंग. हे दोन्ही पॅरा-जंपिंगचे प्रकार आहेत. म्हणूनच मार्कोस कमांडो हे जगातील त्या फार कमी फोर्सेस पैकी आहेत जे समुद्रात प्रचंड शस्त्रांच्या वजणांसह पॅरा-ड्रॉप करु शकतात.

ह्या कमांडोंना सुमुद्रसपाटी पासुन अतिशय उंच अशा प्रदेशात काम करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. पर्वत घटक स्कुल तवांग- अरुणाचल प्रदेश, वॉरफेअर स्कुल राजस्थान, हाय अल्टिट्युड वॉरफेअस्र स्कुल-सोनमर्ग, काउंटर इंसर्जंसी ॲन्ड जंगल वॉरफेअर स्कुल- मिझोरम येथे त्यांना हे प्रशिक्षण दिले जाते. शिवाय भारत आणि अमेरीका ह्यांच्यात झालेल्या करारानुसार अमेरीकेच्या अत्यंत धाडसी समजल्या जाणाऱ्या यु.एस. नेव्ही सिल (US Neavy SEAL) च्या कमांडोंसोबतही ह्या जवाणांचे प्रशिक्षण होते. हे सर्व प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर मार्कोस कमांडो चार वर्षे देशाची सेवा करतात.

मार्कोस कमांडोना दिली जाणारी शस्त्रे ही अत्याधुनिक असतात. शिवाय शस्त्रांचे प्राशिक्षण देतांना प्रतिकृती न वापरता खऱ्या शस्त्रांसोबतच त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे फ्रेंडली फायर हा प्रकार त्यांच्या बाबतीत नसतो. इस्त्राईल टावोर टार- २१ (TAR-21) ॲसोल्ट राईफल, ज्यात ४० मी. मी. ग्रेनेड लॉंचरही बसवले जाउ शकते अशी ही राईफल, कुठलाही वातावरणात वापरली जाउ शकते. हेकलर आणि कोच एम.पी. फाईव्ह मशिन गन, सिग सॉउर पी-२२६ आणि ग्लॉक १७ ह्या पिस्तोल, डृगेनोव्ह आणि गलिल स्नायपर ह्या राईफल. ही सर्वी शस्त्रे त्यांच्या दिमतीला असतात. जलांतर्गत कारवाया करण्यातही ह्यांचा हातखंडा आहे.

मार्कोस कमांडोंनी आजवर अनेक साहसी कारवाया पार पाडल्या आहेत. सन १९८८ मालदीव मध्ये ऑपरेशन कॅक्टस (Operation Cactus) दरम्यान त्यांनी हायजॅक केलेल्या बोटीतील सर्वांना सुखरुप सोडवले होते. श्रीलंकेत जेव्हा प्रभाकरनच्या लिट्टेने (LTTE) श्रिलंकेला वेठीस धरले होते त्यावेळेस ऑपरेशन पवन (Operation Pavan) अंतर्गत मार्कोस कमांडोंनी १२ किमी आपल्या शस्त्रांच्या वजनासह पोहत जाउन लिट्टेने घेरलेल्या जाफना जेट्टीला कुणालाही काही कळायच्या आत उध्वस्त केले आणि सर्वे कमांडो लिट्टेने उत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात जखमी न होता परतले. कारगिल संग्रामाच्या वेळी पाक ला त्यांच्या हद्दीत ठेवण्यात ह्या कमांडोंचा खुप मोठा वाटा होता. २००८ च्या मुंबई हल्ल्यात ते ताज व ऑबेराय हॉटेलवर चाल करुन गेले व त्यांनीच सर्व अतिरेकी ठार केले.

marcos commando photos, facts about marcos commando, indian marcos commando uniform, marcos vs seals, life of marcos commando, marine commando force, Operation Cactus, marcos commando traning, marcos commando in marathi, marcos images, मार्कोज कमांडो, best commando in india, special forces of india

इतकेच नाही तर हे मार्कोस कमांडो काश्मीर मध्ये तिकडच्या नागरिकांसारखेच राहतात आणि वेळ आल्यावर तिथल्या अतिरेक्यांच्याही मुसक्या आवळतात. कश्मीरी अतिरेकीही ह्या कमांडोंना घाबरतात.

आहे की नाही The Few The Fearless ?

Leave A Reply

Your email address will not be published.