Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मुंबईतल्या मरिन ड्राइव्हवर मोठे मोठे दगड का टाकलेत ?

कधी प्रेयसीसोबत तर कधी मित्रमैत्रिणींसोबत किंवा मग कधी एकट्यानेच, आपण सर्वांनी कसा ना कसा मरीन ड्राईव्हला वेळ घालवला आहे. ‘क्वीन्स ऑफ नेकलेस’ने सजलेल्या या मरीन ड्राईव्हवर बसून अथांग समुद्र पाहत, गार वार अनुभवण्याची मजा काही औरच आहे. पण बरेचदा तिथे वेळ घालवत असताना ते 3 पायाचे सिमेंटचे दगड संपूर्ण Marine Drive वर का पसरून ठेवले असतील हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

आपल्यापैकी फारच कमी लोकांना ठाऊक असेल की Marine Drive चा काही भाग हा रिक्लेम केलेला म्हणजेच समुद्रात भराव टाकून उभारण्यात आलेला आहे. समुद्राला कृत्रीमरित्या आत सरकवून तयार केलेल्या मोकळ्या जागी मरीन ड्राईव्हवरील कित्येक इमारती आणि रस्ते उभे आहेत. त्यामुळे रोजच्या रोज अरबी समुद्रातून येणाऱ्या तडाखेबाज लाटांपासून या त्याचे संरक्षण करणे गरजेचे बनते.

वाहते पाणी एकप्रकारची ऊर्जा निर्माण करते. त्यातच समुद्रातील लाटांमध्ये ही ऊर्जा कित्येक पटींनी अधिक असते. जेव्हा या लाटा किनाऱ्यावर येऊन आदळतात तेव्हा किनाऱ्याची धूप होण्यास सुरवात होते, लाटांच्या माऱ्याने खडकही झिजू लागतात. त्यामुळे किनाऱ्यालगतचा भाग आपोआपच कमकुवत होऊन त्यावर उभ्या असलेल्या बांधकामाला धोका निर्माण होतो.

याच वेगवान आणि शक्तिशाली लाटांपासून किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर सैदव पहुडलेले ते तीनपायी सिमेंटचे दगड कामी येतात. या दगडांना ‘टेट्रापॉड’ (Tetrapod) म्हंटले जाते. त्यांची सर्वप्रथम उत्पत्ती फ्रांसमध्ये झाली. जवळपास ५० च्या दशकात हे दगड मुंबईत आणण्यात आले.

या टेट्रापॉडची खासियत म्हणेज, ते किनाऱ्यालगत अशाप्रकारे रचले जातात की त्यांच्यामध्ये पोकळी निर्माण होईल. जेव्हा समुद्रातील महाकाय लाटा टेट्रापॉडवर येऊन आदळतात तेव्हा या लाटांचा तडाखा हे दगड झेलतात. त्यांच्या पोकळीमधून लाटांचे पाणी पुढे जात संथ होते. परिणामी वेगवान लाटांच्या तडाखा किनाऱ्याला झेलावा लागत नाही आणि तो सुरक्षित राहतो.

थोडक्यात काय, तर वेगवान लाटांचे संथ प्रवाहात रुपांतर करून किनाऱ्याचे संरक्षण करण्याचे काम आपले हे ‘तीनपायी दगड’ म्हणजेच Tetrapod करतात. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा कधी मरीन ड्राईव्हला जाल तेव्हा त्यांना Thanks बोलायला विसरू नका !


हे हि वाचा –

1 Comment
  1. Ashish Rathod says

    ????????????

Leave A Reply

Your email address will not be published.