Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

टांगावाला ते मसाला किंगः ‘निम्म्यात शाळा सोडून करोडपती बनण्याचा’ प्रेरणादायी प्रवास.

कधीकाळी टांगा चालवणाऱ्या ह्या महाशयांच्या MDH ने मागील वर्षात जवळपास २१३ करोड रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

“असली मसाले सच सच एम डी एच एम डी एच” हे शब्द कानावर पडले कि आपल्याला लगेच एक चेहरा आठवतो. कुणाचा चेहरा आठवतो ? बरोबर ! टीव्हीवर लागणाऱ्या एम डी एच (MDH) मसाल्याच्या जाहिरातीमधील म्हाताऱ्या आजोबांचा चेहरा लगेच आपल्याला आठवतो. इतर जाहिरातींमध्ये वेगवेगळे बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटू दाखवले जातात पण MDHच्या जाहिरातीतमध्ये मात्र एक वयोवृद्ध व्यक्ती नेहमी दिसते. असे का ? कोण आहे ती वृद्ध व्यक्ती ?

Mahashay Dharampal Gulati, mahashay chunni lal gulati, mdh owner, mdh turnover, mdh masala history, mdh masala history in marathi, एम डी एच मसाले, महाशय धर्मपाल गुलाटी, महाशियां दि हट्टी
Mahashay Dharampal Gulati, mdh owner (Source – TribuneIndia)

एम डी एच मसालेच्या जाहिरातीमध्ये दिसणारे ते वृद्ध व्यक्ती दुसरे तिसरे कुणी नसून ते आहेत MDH मसालेचे सर्वेसर्वा, संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी. शेकडो कोटी रुपयांच्या एम डी एच मसालेचे मालक असलेले महाशय धर्मपाल गुलाटी हे केवळ पाचवी पास आहेत असे जर तुम्हाला सांगितले तर कदाचित ते खरे वाटणार नाही. पण खरोखर ते केवळ इयत्ता पाचवी पर्यंतच शिकलेले आहेत.

महाशय धर्मपाल ह्यांचा जन्म १९२३ सालचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला. सियालकोट या पाकिस्तानातील प्रांतामध्ये महाशय धर्मपाल ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे म्हणजेच चुन्नीलाल गुलाटी ह्यांचे सियालकोटमध्ये मसाल्याचे दुकान होते. ह्या दुकानाचं नाव होतं “महाशियां दि हट्टी” आणि ह्याच नावाचं संक्षिप्त रूप म्हणजे एम डी एच.

असा सुरु झाला महाशय धर्मपाल गुलाटी ह्यांचा यशस्वी उद्योगपती बनण्याचा प्रवास

खरंतर प्रवासाची सुरुवात तेंव्हाच झाली जेव्हा त्यांनी चुन्नीलाल गुलाटी ह्यांच्या पोटी जन्म घेतला होता, कारण ह्या व्यवसायाचे बाळकडू त्यांना लहानपणीच आपल्या वडिलांकडून मिळाले होते. फाळणीनंतर महाशय धर्मपाल गुलाटी पाकिस्तानातून भारतात आले. पण भारतात येतांना त्यांच्याजवळ भांडवल होते फक्त १५०० रुपये. ह्या दीड हजार रुपयातील ६५० रुपये खर्चून त्यांनी एक टांगा विकत घेतला व ते टांगा चालवण्याचा व्यवसाय करू लागले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते आपला संसारचालवू लागले.

१९५९ साली त्यांनी दिल्लीत मसाल्याचे दुकान सुरु केले. दुकानाचे नाव ठेवले “महाशियां दि हट्टी सियालकोटवाले”. मसाल्याची गुणवत्ता व धर्मपाल ह्यांचे प्रामाणिक कष्ट ह्यामुळे महाशियां दि हट्टी सियालकोटवाले हे नाव हळूहळू प्रसिद्धीस येऊ लागले. कोणताही उद्योग उभा करणे काही सोपे काम नसते. महाशय धर्मपाल ह्यांनी आलेल्या प्रत्येक अडचणी व संकटांना तोंड दिले पण मसाल्याची गुणवत्ता कायम राखली. १९९६ साली त्यांनी दिल्लीमध्ये मसाला उत्पादनाचा कारखाना सुरु केला. आज एम डी एच हे नाव भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. १५०० हजार रुपयांपासून सुरु झालेला हा प्रवास आज अब्जो रुपयांपर्यंत येऊन पोचला आहे.

Mahashay Dharampal Gulati, mahashay chunni lal gulati, mdh owner, mdh turnover, mdh masala history, mdh masala history in marathi, एम डी एच मसाले, महाशय धर्मपाल गुलाटी, महाशियां दि हट्टी
Mahashay Dharampal Gulati with Raj Kapoor, Om Prakash, and J. R Ahuja (Source – Wikibiodata)
Leave A Reply

Your email address will not be published.