Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

रक्तदान करताना या चुका टाळा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल

भारतासह जगभरात रक्तदान करण्यासाठी अनेक स्थानिक आणि जागतिक स्तरावरच्या मोहिम राबिवल्या जातात, यामागे लोकांच्या मनात रक्तदानाबाबद्दल साक्षरता निर्माण करण्याचा मुख्यतो उद्देश असतो हे आपल्यला माहितच आहे. दररोज भारतात लाखो लोकांना नवीन रक्त चढवण्याची आवश्यकता असते. यामध्ये अपघात, रक्तस्त्राव, ऑपरेशन करताना असो पण प्रत्येकाला त्याचा प्राण वाचवण्यासाठी रक्त पुरवठा गरजेचा असतो आणि नेमक्या ह्याच उद्देशामुळे रक्तदान श्रेष्ठदान असे संबोधले जाते.

आपल्याला कदाचित याची कल्पना नसेल पण रक्तदानाचा फायदा जसा समोरच्या व्यक्तीला होतो त्याचप्रकारे तो रक्तदान कारणाऱ्या व्यक्तीला पण होतो, तो त्यापैकीच एक म्हणजे यामध्ये शरीरात मोठ्या प्रमाणात नवीन रक्त तयार व्हायला मदत होते. अनेकदा इतरांपेक्षा रक्तदान करणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी जास्त घेतात. पण यामध्ये सुद्धा काही महत्वाच्या बाबी आहेत ज्या नेमक्या आणि स्पष्ट्पणे सांगितल्या जात नाहीत आणि मग केलेल्या रक्तदानाचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते. हे नुकसान एवढ्या तीव्रतेचं असू शकते कि तुम्ही आयुष्यभर फक्त पश्चातापच करू शकता.

रक्तदानाबद्दल अनेकांच्या मनात आजही खूप शंका असतात. तसेच काहींच्या मनात अति उतावळेपणा किंवा अति-उत्साहीपणा असतो ज्यामुळे ते छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. आज या लेखात आम्ही तुमच्या विविध शंकेचं निरसन तर करणार आहोतच सोबत कोणती काळजी घ्यायची याबद्दल पण सांगणार आहोत. यामध्ये रक्तदान करण्याच्या आधी आणि त्याच्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि काळजी घ्यावी याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

रक्तदान, रक्तदान करतानाच्या चुका, कोण रक्तदान करू शकते , dos and donts during blood donation, Blood and donation facts, blood donation benefits, blood donation information, importance of blood donation, blood donation rules
(Source – Healthline)

रक्तदान करताना खालील गोष्टींची काळजी घ्या

एक पूर्ण आरोग्यदायी पुरुष तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतो. तर पूर्ण आरोग्यदायी महिला चार महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतात. बऱ्याच लोकांना महिला आणि पुरुषांच्या रक्तदान करण्यामधील फरक माहित नाही आणि रक्तदान करण्यामध्ये फरक असण्याचं मुख्य कारण म्हणजे दोघांच्या शरीराची जडण घडण वेगळी आहे. त्यामध्येच मासिकपाळीमुळे महिलांच्या अंगातून महिन्यातून एकदा दुषित रक्त बाहेर पडत असतं. त्यामुळे आरोग्यदायी रक्तदानासाठी महिलांनी शक्यतो चार महिन्यांतून एकदा असे रक्तदान करावे.

अजूनही लोकांच्या मनात सगळ्यात मोठी भीती हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होण्याची आहे. लोकांच्या मनातील सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे रक्तदान केल्यामुळेच शरीरातील “हीमोग्लोबिन” चे प्रमाण कमी होते. पण मुळात असे काहीही नाही आणि हा फक्त गैरसमज आहे आणि रक्तदान केल्यानंतर 21 दिवसांनंतर शरीरात नवीन रक्त तयार होतं.

माहितीनुसार, एकावेळी व्यक्तीच्या शरीरातून 471 ml पेक्षा जास्त रक्त घेतले जात नाही. तसेच महत्वाचे म्हणजे रक्तदान करण्याच्या साधारण एकदिवस आधी धुम्रपान करु नये आणि 48 तासांपूर्वी मद्यपान करु नये. जर तुम्ही मद्यपान केले असेल तर कृपया रक्तदान करण्याचा प्रयत्न करू नये. रक्तदान केल्यानंतर ठराविक वेळाने भरपेट खाणं गरजेचं आहे. अनेक डॉक्टरांच्या माहितीनुसार दर तीन तासांनी पौष्टिक आहार करावा.

रक्तदान केल्यानंतर ठराविक आहार आरोग्यासाठी चांगला असतो जसं कि ज्यूस, चिप्स, फळं यांसारखा आहार करावा. तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे रक्तदान केल्यानंतर पुढच्या 12 तासांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यायाम करु नये किंवा शारीरिक ताण येईल असे कोणतेही कार्य करू नये.

कोण रक्तदान करू शकते ?

१. ज्या व्यक्तीचे वय १८ ते ६५ दरम्यान आहे.
२. जो आरोग्यदायी आहे म्हणजे ज्यांचे वजन ४८ किलोंपेक्षा जास्त आहे.
३. ज्यांनी मागील ०३ महिन्यात रक्तदान केलेलं नाही, महिलांसाठी हे प्रमाण ०४ महिने आहे.
४. कोणत्याही रोगाने पीडित नसणाऱ्या व्यक्तीनेच रक्तदान करावे.
५. प्रसूतीनंतर महिलांनी ६ महिन्यांपर्यंत रक्तदान करू नये त्यानंतर महिला रक्तदान करू शकतात.

रक्तदान करताना खरंच त्रास होतो का ?

१. नाही. रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही, जर तुम्ही योग्य पद्धतीने रक्तदान केले तर.
२. रक्तदान करण्यासाठी साधारण १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो.
३. रक्तदान केल्यांनतर आपल्या सामान्य जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.
४. रक्तदान केल्यांनतर दररोजची विविध कामे अगदी सुरळीतपणे करू शकता.

चला मग रक्तदान करूया, अनेकांना जीवदान देऊया.

Leave A Reply

Your email address will not be published.