Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

धोनी झाला शेतकरी… बघा कशाची लागवड केली शेतात ?

२०११ सालची वर्ल्ड कपची मॅच आठवत आहे का ? धोनीने मारलेला विनिंग सिक्सर. क्रिकेटच्या मैदानावर चौके छक्के मारणारा धोनी सध्या शेती करतोय.

धोनीचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर बघितला असेलच. हा ट्रॅक्टर एम एस धोनीने शेती साठीच घेतला आहे. धोनीने टमाटर, गोबी, पपई अश्या अनेक फळ भज्यांची लागवड केली आहे. धोनीची हि शेती ४३ एक्कर मध्ये पसरली असून शेतीसाठी त्याच्या बरोबर तज्ज्ञांची एक टीम सुद्धा काम करत आहे.

एम एस धोनी शेती, धोनीच्या शेतीचे फोटो, dhoni turns farmer, ms dhoni organic farming, cricket
Source – Jagran

कुठल्याही क्रिकेट मॅचमध्ये धोनी जसा पूर्णपणे प्लॅनिंग करून उत्तरतो तसाच तो शेती करायसाठी सुद्धा फुल प्लॅनिंग करून उतरला आहे. ४३ एक्कर शेतीत धोनीने काकडी, फुलकोबी, पत्ताकोबी, पपई, टमाटर, टरबूज आणि पेरू अश्या फळ भाज्यांची लागवड केली आहे.

एक नजर धोनीच्या शेतीवर टाकूया

काकडी – २ एक्कर
पपई – ४ एक्कर
फुलकोबी व पत्ताकोबी – १० एक्कर
टरबूज – १४ एक्कर
धान्य – ६ एक्कर
स्वीट कॉर्न – ६ एक्कर

आपला धोनी फक्त शेतीच करतोय असं समजू नका तर त्याने डेअरी आणि मत्स्य पालन सुद्धा करायचं ठरवलं आहे. त्याच्याकडे सध्या ७० गायी असून हि संख्या लवकरच १५० पर्यंत जाणार आहे. धोनीच्या ह्या शेतात २ तलाव असून इथे मासे सुद्धा पाळलेले आहेत. हि ऑरगॅनिक शेती करण्यासाठी धोनीला मैत्री फाउंडेशनची एक टीम साथ देत आहे. ह्या टीम मधील काही सदस्य म्हणले कि धोनी खरंच खूप उत्साही माणूस आहे, तो स्वतः थकत नाही आणि आम्हालाही थकू देत नाही. सेंद्रिय शेती करून हि उत्पादने सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे धोनीचे उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

धोनीच्या सेंद्रिय शेतातील उत्पादने सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने रांची शहरात काही सेंटर्स उभे केले आहेत. हे सेंटर्स हळू हळू इतर राज्यांमध्ये सुद्धा उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धोनी येत्या काळात स्वतःचे सेंद्रिय खत सुद्धा बाजारात आणणार आहे.

सोर्स : जागरण

Leave A Reply

Your email address will not be published.