Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

‘धोनी’ बद्दल या गोष्टी माहित नसतील तर स्वतःला धोनीचे फॅन म्हणवून घेऊ नका

कॅप्टन कुल म्हणून ओळखल्या जाणारा धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एम एस धोनी केवळ एक उत्तम कर्णधार नसून तो एक उत्कृष्ट किपर आणि बॅट्समन सुद्धा आहेच. धोनीने त्याच्या शांत स्वभावामुळे भारतीयांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. धोनी सध्या भारतीय संघाकडून खेळात जरी नसला तरी त्याची प्रसिद्धी काही कमी झालेली नाही. भारतासाठी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झालेली बघायला मिळाली. त्याच्या फॅन्सला त्याच्या आयुष्यातील एकूण एक गोष्ट माहित आहे. जर तुम्ही सुद्धा धोनीचे फॅन असाल तर यातील किती गोष्टी तुम्हाला माहित आहेत बघा.

एम एस धोनीने आपल्या इंटरनॅशनल करिअरचं पहिलं शतक पाकित्तान विरुद्धच्या सामन्यात बनवलं होतं. ह्या सामन्यात त्याने तब्बल १४८ धाव कुटल्या होत्या. हा देखील एक रेकॉर्ड आहे कारण तोपर्यंत कुठल्याच भारतीय क्रिकेटपटूने पहिल्या शतक करताना १४८ धावा काढल्या नाहीत.

ज्या सामन्यात धोनीने १४८ धाव काढल्या त्या सामन्यात धोनीला ३ नंबरला खेळवायचा निर्णय कॅप्टन सौरव गांगुलीचा होता. गांगुली धोनीची बॅटिंग क्षमता जाणून होता आणि म्हणूनच त्याने धोनीला संधी देण्याचे ठरवले.

शिशा महल टूर्नामेंटमध्ये खेळताना कोच देवल साहाय धोनीला मॅच मध्ये मारलेल्या प्रत्येक सिक्स साठी ५० रुपये देत असत.

कपिल देव नंतर धोनी हाच एक केवळ भारतीय खेळाडू आहे ज्याला भारतीय सैन्यातील Lieutenant Colonel सारखा रँक दिल्या गेला आहे.

२०११ सालचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळ्याच खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलेले. टीव्हीवर आपण युवराज आणि भज्जीला अगदी लहान मुलाप्रमाणे रडताना बघितले. कॅप्टन धोनी सुद्धा त्यावेळी रडलेला पण तो रडत असताना कुठल्याही कॅमेराने त्याला टिपले नाही.

१०० पेक्षा जास्त ODI मॅच जिंकणारा धोनी जगातला तिसरा कॅप्टन आहे. धोनी ऐवजी केवळ रिकी पॉन्टिंग आणि अॅलन बॉर्डर हेच हा रेकॉर्ड करू शकले आहेत.

महेंद्रसिंग धोनीला क्रिकेट वगळता फ़ुटबॉल आणि बॅडमिंटन खेळायला सुद्धा फार आवडते. हे दोन्ही खेळ तो जिल्हास्तरीय पातळी पर्यंत खेळाला आहे.

ms dhoni in marathi, ms dhoni wife, sakshi dhoni, ms dhoni photos, about ms dhoni, ms dhoni stories, mahendra singh dhoni, ms dhoni unknown facts, dhoni rare images, धोनी, एम एस धोनी, महेंद्र सिंग धोनी, साक्षी धोनी, ms dhoni rare facts in marathi
MS Dhoni unknown facts in Marathi

जेव्हा धोनीच्या बायकोने एका मुलीला जन्म दिला तेव्हा धोनी सराव करत होता आणि सराव करताना धोनी मोबाईल जवळ बाळगत नाही. त्यावेळी साक्षीने मुलगी झाल्याची बातमी सुरेश रैना जवळ दिली आणि रैनाने तो निरोप धोनीला दिला.

धोनी आणि पत्नी साक्षीने एका गोंडस मुलीला जन्म दिला परंतु वर्ल्ड कपची तयारी चालू असल्याने धोनी त्याच्याजवळ जास्त वेळ थांबला नाही. कारण धोनीच्या मते तो एका नॅशनल ड्युटीवर आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही.

धोनी बॉलिवूड म्युझिक आणि विशेष करून जुने गाणे फार आवडतात. तो किशोर कुमार यांच्या गाण्यांचा मोठा चाहता आहे.

तुम्ही जर धोनीच्या आयुष्यवर तयार करण्यात आलेला MS Dhoni – The Untold Story हा सिनेमा बघितला सेल तर त्यात एका मित्राने धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवला होता. खऱ्या आयुष्यात धोनीचा हा मित्र जेव्हा आजारी पडलेला तेव्हा धोनीने त्याच्या उपचारासाठी सगळी शक्ती पणाला लावलेली. मित्रासाठी त्याने हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था केलेली. आपल्या मित्रांसाठी धोनी नेहमीच उपलब्ध असतो असे त्याच्या अनेक मित्रांनी सांगितले आहे.

२०११ च्या वर्ल्ड कप फायनल मध्ये विराट आउट झाल्यावर युवराज ऐवजी अनपेक्षितपणे धोनी मैदावर उतरला. मॅच झाल्यावर ह्याबद्दल विचारलं असता तो म्हणाला विराट कोहली मुथय्या मुरलीधरनच्या बॉलिंगवर आउट झाला. धोनी आणि मुथय्या धोनी दोघेही IPL मध्ये सोबत खेळलेले आहे आणि तो मुरलीधरनची बॉलिंग चांगल्याप्रकारे ओळखून होता म्हणून युवराज ऐवजी धोनी बॅटिंगला आला.

एकदा एका मुलाखतीत म्हणालेला कि त्याला क्रिकेटमधून ३० लाख रुपये कमवायचे आहेत आणि रांची मध्ये सेटल व्हायचं आहे. टीम इंडियासाठी तो कप्तानी करेल असा त्याने कधी विचारही केला नव्हता.

एकेकाळी इंडिया A कडून खेळात असताना आकाश चोपडा धोनीला म्हणाला, ‘तुला जर टीम इंडियाकडून खेळायचं असेल तर तुला तुझे लांब केस कापावे लागतील.’ यावर धोनी म्हणाला, ‘ कदाचित मी मोठे केस ठेऊनच टीम इंडियाकडून खेळेल आणि तरुण मुलांना माझी हेअरस्टाईल आवडेल सुद्धा.’ त्यानंतर काय झालं हे संपूर्ण जगाला माहित आहे.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.