Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवत तो बनला जगातला सर्वश्रेष्ठ सेनापती

जगात काही अशी माणसं होऊन गेलीत जी आपल्या महत्त्वकांक्षेसाठी जगभरात खुप लोकप्रिय होती आणि काहीही म्हणा जर आपल्याला काही प्राप्त करायचे असेल तर ती गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची जिद्द असावीच लागते. आपण कित्येक वेळा ऐकतो की कठीण परिश्रमाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य नाही पण फक्त परिश्रम करूण यश मिळत का..? याचं उत्तर नक्कीच नाही आहे. कारण फक्त परिश्रम नाही तर त्या परिश्रमांना आपल्या बुध्दी चातुर्याची जोड असावी लागते आणि जो योग्य वेळी आपल्या बुध्दी चातुर्याची चुनूक दाखवतो तोच पुढे इतिहास निर्माण करतो हा सुध्दा एक इतिहास आहे.

आपण अशाच इतिहासातील एका महानायकाची माहीती घेणार आहोत. जो होता फक्त एक सैनिक पण आपल्या कतृत्वाने त्याच सैन्याचा सम्राट झाला. आपण कित्येक वेळा आपल्या भारतातल्या विरांच्या कहाण्या ऐकत असतो पण आज आपण अशा महानायकाच्या यशाचं रहस्य जाणून घेणार आहोत ज्याची तुलना शिवरायांशी केली जाते. त्याचं नाव म्हणजे फ्रांसचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट.

(Source – npr.org)

नेपोलियन आणि महाराजांची तुलना करण्यामागचं एक कारण म्हणजे दोघांच्या जीवनप्रवासात असलेले साधर्म्य. महाराजांचे वडील आदिलशाहीत सरदार होते तर नेपोलियन सुध्दा फ्रांसच्या सेनेत एक साधा सैनिक होता. दोघांना ही त्यांच्या मातांमुळेच प्रेरणा मिळाली. दोघेही युध्द कौशल्यामध्ये अगदी पारंगत व दोघेही मुत्सदी राजकारणी. नेपोलियनने आपल्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्या देखील. ह्याच लढाया जिंकण्यामागचे रहस्य आपण या लेखात पाहणार आहोत.

नेपोलियन बोनापार्टला जगातील सर्वात यशस्वी सेनापती म्हणुन सुध्दा ओळखले जाते. नेपोलियनने युरोप मधिल जवळ जवळ सर्वच राष्ट्रांविरोधात युध्द पुकारले होते. तो म्हणत होता की “जगात फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, ‘तलवार आणि आत्मा.’ शेवटी विजय मात्र आत्म्याचाच होतो. त्याने आपल्या राज्यकारभारासाठी एक संहिता सुध्दा लिहीली, ती “नेपोलियन संहिता” म्हणुन जगभरात प्रसिध्द झाली.

सैन्यामध्ये सैनिक ते सम्राट

नेपोलियनचे वडील फ्रांसच्या राजवाड्यामध्ये नोकरीस होते. नेपोलियनचे युध्दकौशल्य पाहून त्याला फ्रांसच्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. नंतर तो फ्रांसच्या सैन्यात रूजू झाला. फ्रांसच्या क्रांतीला प्रारंभ होईपर्यंत तो फ्रांसच्या सेनापती पदापर्यंत पोहचला. त्याने फ्रांसवर आक्रमण करणाऱ्या अनेक सत्तांना उलथवून लावले. आपल्या युध्द कौशल्यावर त्याने इजिप्तच्या कैरो शहरापर्यंत धडक मारली. त्याच्या या लढाईस “बॅटल ऑफ पिरॅमिड” असे म्हटले जाते. नेपोलियनचा विजयी प्रवास चालुच होता जो पर्यंत त्याने रशियाची मोहीम हाती घेतली नाही तोपर्यंत. तिथल्या थंड हवामानामुळे त्याची फौज कमकुवत झाली व तिथे त्याला हार पत्करावी लागली.

पण नेपोलियनच्या यशाचे रहस्य होते तरी काय..?

युध्द जेवढे बळाने जिंकले जाते त्यापेक्षा जास्त ते बुद्धीने जिंकले जाते. आणखीन एक घटक युध्दात खुप महत्वाचा ठरतो तो म्हणजे “वेळ “. युध्दामध्ये क्षण आणि क्षण महत्वाचा असतो. अचुक वेळ साधली नाही तर युध्दात जीव जातो तर वेळेवर कृती केली तर आपलीच फत्ते होते. नेपोलियनने याच वेळेचा पुरेपुर फायदा उठवत आपल्या रणनितीमध्ये त्याला स्थान दिले. नेपोलियनची युध्द पध्दती आपण बघीतली तर आक्रमण करताना एकतर तो वेळेआधी शत्रू बेसावध असताना आक्रमण करून युध्द जिंकून घेई नाहीतर वेळेनंतर शत्रु वाट बघून बेंडाळून जाईल तेव्हा आक्रमण करी.

या पध्दतीवर आधारीत त्याने अनेक युध्दे जिंकली. परंतु रशियामध्ये अतिथंड हवामान आणि इतर परिस्थितीमुळे त्यांच्या सैन्याची कार्यक्षमता कमी झाली व तिथे त्याला हार पत्करावी लागली. त्या युद्धानंतर इंग्रजांनी त्याला स्थानबध्द करून कोठडी मध्ये डांबून ठेवले व तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत सुध्दा एक रहस्य आहे, काहींच्या मते इंग्रजांनी नेपोलियनला आर्सेनिक नावाचं विश देऊन त्याची हत्या केली.

नेपोलियन ने वेळ पाहून वेळेचं महत्व जाणलं पण नंतर त्याच्यावर बिकट वेळ आली तरी तो डगमगला नाही व त्याने वेळेला आपली दखल घ्यायला भाग पाडलं..!

Leave A Reply

Your email address will not be published.