Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जेंव्हा नितीन गडकरी अमिताभ बच्चन ह्यांना म्हणतात ‘नाटक मत कर, चल फोन रख’

गडकरींनी शेअर केले सलमान खान व जॅकी श्रॉफ ह्यांच्याबद्दल हे मजेदार किस्से

नागपूरमधील दक्षिणामूर्ती मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी काही मजेदार किस्से व आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ह्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन ह्यांच्यासोबत घडलेला एक गमतीशीर प्रसंग सांगितला. यावेळी गडकरी म्हणाले. “मी एकदा अमिताभ बच्चन यांचा फोन कट केला होता”.

nitin gadkari news, nitin gadkari disconnected amitabh bachchan phone call , unofficial interview with nitin gadkari in nagpur, salman khan favourite marathi dishes
(Image Source – youtube)

ह्या प्रसंगाबाबत बोलतांना गडकरी म्हणाले. सुरुवातीला माझी अमिताभ बच्चन ह्यांच्याशी फारशी ओळख नव्हती. एक दिवस मला एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने “हॅलो मै अमिताभ बोल रहा हूं” असं म्हटलं. त्यावेळी मला असं वाटलं कि कुणीतरी माझी मस्करी करत आहे, म्हणून मी त्या फोनवरील व्यक्तीच्या “हॅलो मै अमिताभ बोल रहा हूं” या वाक्याला “नाटक मत कर, चल फोन रख” असं उत्तर दिलं. पण थोड्यावेळाने मला परत फोन आला आणि तोच आवाज होता. समोरच्या व्यक्तीने खरंच मी अमिताभ बच्चन बोलत आहे असे अत्यंत गांभीर्याने सांगितल्यावर माझी खात्री पटली आणि मला माझी चूक लक्षात आली”. असे गडकरींनी सांगितले.

नागपूरमधील दक्षिणामूर्ती मंडळातर्फे आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी अतिशय दिलखुलासपणे उपस्थितांशी गप्पा मारल्या. ह्यावेळी त्यांनी विविध खाद्यसंस्कृतींबद्दल गप्पा मारल्या. बॉलिवूड कलाकार व इतर अनेक दिग्गजांना मराठमोळे पदार्थ अत्यंत प्रिय असल्याचे सांगतांना त्यांनी सलमान, जॅकी श्रॉफ, ह्यांचा आवडता मराठमोळा खाद्यपदार्थ कोणता हे सुद्धा सांगितलं. “सलमान पोहे अगदी आवडीने खातो”, “जॅकी श्रॉफ जेंव्हा माझ्या घरी आला होता तेव्हा तो फक्त वरण प्याला होता” असे अनेक किस्से व आठवणींना गडकरींनी ह्यावेळी उजाळा दिला.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.