Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जपानमधील एक असे बेट जिथे महिलांना जाण्यास बंदी आहे

ह्या बेटावर केवळ पुरुषच जाऊ शकतात असे का?

जगातील काही देश व प्रदेश असे आहेत जिथल्या परंपरा व नियम ऐकून “ऐकावं ते नवलच” असं म्हणावंसं वाटतं. असंच एक बेट आहे जपानमध्ये जिथले नियम असेच अजब आहेत. ह्या बेटावर महिलांना जाण्यास बंदी आहेच पण पुरुषांना या बेटावर आल्यानंतर निर्वस्त्र होऊन आंघोळ करावी लागते. जपानमधील ह्या बेटाचं नाव आहे अकिनोशिमा.

(Image Source- The Japan Times)

७०० वर्ग मीटर इतकं क्षेत्रफळ असलेलं हे बेट युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून जाहीर केलं आहे. असं म्हटलं जातं कि अकिनोशिमा हे बेट चीन व कोरिया प्रायद्वीप ह्यांच्यातील व्यापाराचं एक प्रमुख केंद्र होतं. या बेटाला एक विशेष धार्मिक महत्व आहे. त्यामुळेच इथले नियमही कठोर आहेत.

इथे महिलांना येण्यास पूर्णपणे बंदी आहे तर एका वर्षांमध्ये २०० पेक्षा जास्त पुरुष ह्या बेटावर येऊ शकत नाहीत असाही एक नियम आहे. इथे तुम्ही कोणतीही वस्तू सोबत आणू शकत नाही आणि इथून बाहेर जातांना ह्या बेटावरील गवताची काडीसुद्धा सोबत नेऊ शकत नाही.

या बेटावर असलेल्या मुनाकाता ताइशा ओकीत्सु ह्या मंदिरात समुद्राच्या देवीची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं कि १७ व्या शतकामध्ये समुद्रातील जहाजांच्या सुरक्षिततेसाठी समुद्र देवीला साकडे घालण्यासाठी हि पूजा केली जात होती.

okinoshima island japan, okinoshima temple japan, okinoshima traditional island, men only island japan
(Image Source – Travel nine)

Leave A Reply

Your email address will not be published.