Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जी CBI पी. चिदंबरम यांना रिपोर्ट करायची, तिनेच त्यांना अटक का केली आहे?

संपूर्ण जग पैशाच्या जोरावर चालत अशी जुनी म्हण आहे, पण पैशालाही काबूत ठेवण्याचं कसब हे काही मोजक्या लोकांत असत, या लोकांमध्ये पी. चिदंबरम यांचा उल्लेख अग्रस्थानी होतो. (P Chidambaram) पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004 या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. आज आपण त्यांच्या आता पर्यंतच्या प्रवासासंदर्भात पाहुयात.

CBI, पी. चिदंबरम, चिदंबरम, आयएनएक्स घोटाळा प्रकरण, काँग्रेस, Palaniappan Chidambaram, P Chidambaram, INX Media, INX Media and P Chidambaram, P Chidambaram story in marathi,
Source – Google

जन्म आणि शिक्षण

पी. चिदंबरम यांचा जन्म तामिळनाडूच्या एका छोट्या गावात झाला. प्रतिष्ठित कुटुंब असणाऱ्या चिदंबरम घराण्यात पी. चिदंबरम यांचा जन्म १ सप्टेंबर १९४५ रोजी तामिळनाडूच्या कानडुकथन या गावी झाला. त्याचे पूर्ण नाव पलानियाप्पन चिदंबरम आहे. त्यांचे आजोबा सर सत्तापा आण्णामालिया चिठीया हे एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील मद्रास राज्यातील नामवंत उद्योगपती मधील ते एक होते. मद्रासची अण्णामलाई विद्यापीठ यांनीच स्थापन केलेले. चिदंबरम यांनी आपले प्राथमिक शिक्षण मद्रास ख्रिश्चन माध्यमिक विद्यालय,चेन्नईमधून पूर्ण केले. त्यांनी चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून सांख्यिकी विषयासह विज्ञान शाखेत पदवी संपादन केली. त्यांनी बोस्टनमधील हार्वर्ड विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनात (MBA) पदव्युत्तर पदवी संपादन केली.

वकिली पासून कामाला सुरवात

पी. चिदंबरम हे सुरुवातीच्या काळात चेन्नई उच्च न्यायालयात वकिलीचा सराव करायचे. 1984 साली त्यांना एक वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले होते. चिदंबरम यांनी अनेक राज्यांच्या उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम केले आहे. पी. चिदंबरम यांच्या पश्चात पत्नी नलिनी चिदंबरम आणि एक मुलगा कार्ती म्हणून आहे.

राजकीय प्रवासात चढउतार

पी. चिदंबरम हे 1972 साली अखिल भारतीय काँग्रेस समितीत सामील झाले. चिदंबरम यांनी 1973 मध्ये युवक काँग्रेसचे प्रमुख आणि तामिळनाडू राज्य समितीच्या काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पहिले. 1984 साली तामिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून पहिल्यांदा खासदार झाले.त्यांनतर चिदंबरम यांनी या मतदार संघातून 6 वेळा विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले. पी. चिदंबरम यांनी राजीव गांधी सरकारच्या अंतर्गत कर्मचारी आणि वाणिज्य मंत्रालयात उपमंत्री म्हणून काम केले.

1986 मध्ये पी. चिदंबरम यांना लोक तक्रारी व पेन्शन मंत्रालय व कार्मिक मंत्रालयाबरोबर मंत्रीपद मिळाले. ऑक्टोबर १९८६ मध्ये पी. चिदंबरम यांना केंद्रीय गृह मंत्रालयात अंतर्गत सुरक्षामंत्रीपद देण्यात आले. १९९१ मध्ये पी. चिदंबरम यांना राज्यमंत्री पदावर वाणिज्य मंत्रालयाचा प्रभारी म्हणून स्वतंत्र करण्यात आले. १९९५ मध्ये त्यांनी पुन्हा हीच पदे भूषविले. १९९६ साली काँग्रेस मधून बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. २००४ साली त्यांच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलगीकरण करून काँग्रेस मध्ये परतले.

२००८ साली गृहमंत्री झाले

२००४ मध्ये मनमोहन सरकारच्या काळात पी. चिदंबरम यांना पुन्हा वित्त मंत्रालय देण्यात आले. हे पद 2008 पर्यंत त्यांनी भूषवले. २००८ साली दिल्लीत झालेल्या दहशतवादी स्फोटानंतर तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पी. चिदंबरम यांना गृहमंत्री करण्यात आले होते.

CBI, पी. चिदंबरम, चिदंबरम, आयएनएक्स घोटाळा प्रकरण, काँग्रेस, Palaniappan Chidambaram, P Chidambaram, INX Media, INX Media and P Chidambaram, P Chidambaram story in marathi,
Source – Google

चिदंबरम हे एक अनुभवी राजकारणी

चिदंबरम एक अनुभवी ज्येष्ठ राजकारणी आहेत. चिदंबरम यांच्या निर्णयावर अनेक कडक टीका झाली ही वेगळी एक बाब आहे. अण्णा हजारे यांचं जनलोकपाल आंदोलन जोरात होतं त्यावेळी ते देशाच्या गृह मंत्री पदी होते. दिल्ली पोलिसांनी अण्णा हजारे यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत त्यांना अटक करून तिहार जेल मध्ये टाकण्यात आले. यावेळी चिदंबरम हे गृहमंत्री होते व तेच या गोष्टीला जबाबदार आहेत अशी टीका झाली होती. रामलीला मैदानावर योगगुरु रामदेव यांनी आंदोलन केले होते त्यावेळी त्याच्यासह त्यांच्या समर्थकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्याप्रकरणी पी. चिदंबरम यांना चौकशीलाही सामोरे जावे लागले होते.

चिदंबरम आणि आयएनएक्स घोटाळा प्रकरण

शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जींची आयएनक्स मीडिया (INX Media) ही कंपनी आहे. चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. ३,५०० कोटी रुपयांचा एअरसेल-मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया प्रकरणात ३०५ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीत अनियमितता असल्याच्या प्रकरणात चिदंबरम यांचं नाव आल्याने ते चौकशी एजन्सीजच्या रडारावर आले होते. आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) स्वीकारला होता.

त्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती. आयएनएक्स मीडियाने आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ टक्के गुंतवणूक करताना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. हे नियमबाह्य होते. त्यामुळे केवळ ४. ६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली. सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणात १५ मे २०१७ रोजी एफआयआर दाखल केली होती. या तक्रारीत चिदंबरम यांच्यावर एफआयपीबीच्या गुंतवणूकीत अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर ईडीने २०१८ मध्ये या संबंधी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

दिल्ली उच्च न्यायालयात मंगळवारी (दि.२०) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन नाकारला. यावेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सीबीआय आणि ईडीने सादर केलेल्या पुराव्यावरून महत्त्वाच्या भ्रष्टाचार प्रकरणात चिदंबरम हे मुख्य सूत्रधार आहेत. या दोन दिवसात या प्रकरणावरून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अगदी सीबीआय च्या अधिकाऱ्यांना चिदंबरम यांना अटक कारण्यासाठी घराच्या कुंपणावरून उड्या मारून घरात प्रवेश करावा लागला. अखेर चिदंबरम यांना ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालय काय निर्णय येतंय ते आपण पाहूच.


आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.


Leave A Reply

Your email address will not be published.