Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांनी एकट्याने पाकिस्तानचे ७ टॅंक उध्वस्त केले होते

भारताच्या इतिहासात सर्वात कमी वयात ‘परमवीर चक्र’ने सन्मानित केल्या जाणारा सैन्य अधिकारी

युद्ध झाल्यावर शत्रू कितीही कमजोर किंवा शक्तिशाली असो, आपण युद्ध जिंकत किंवा हरत असो, परंतु आपला जीव दोन्ही बाजूचे सैनिक गमावतात. भारत पाकिस्तान युद्धाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण १९७१ भारत पाक युद्धतील (1971 India Pak War) हि गोष्ट कदाचित तुम्हाला माहित असेल. २१ वर्षीय सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांनी एकट्याने पाकिस्तानचे ७ टॅंक उध्वस्त केले होते. अरुणचे शौर्य बघून पाकिस्तानी ब्रिगेडरनेही त्यांचे कौतुक केले होते.

१६ डिसेंबर १९७१ या दिवशी, शंकरगढ सेक्टर, पंजाब कडे १७ पुणे अश्व रेजिमेंट टीमला फॉरवर्ड मार्चचे आदेश देण्यात आले. कर्नल हनुत सिंग ऊर्फ ‘हंटी’ ह्यांच्या अधिपत्याखाली, सैनिक आणि टॅन्क पुढे निघाले. २१ वर्षीय लेफ्टनंट अरुण खेत्रपाल (Arun Khetrapal), यांना खरे तर तिकडे जाण्याची परवानगी नव्हती कारण त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेच नव्हते, त्यांचे काही आठवड्यांचे प्रशिक्षण अजून बाकी होते. पण देशासाठी काहीतरी करण्याची दांडगी इच्छा, त्यांच्या कुटूंबातील लष्करी पार्श्वभूमी आणि १७-पुणे अश्व बटालियनचा गौरवशाली इतिहास या सगळ्यामुळे त्यांना परवानगी मिळवली. त्या दिवशी झालेलं ते भयानक युद्ध ‘बसंतर की जंग’ (Battle of Basantar) या नावाने भारतीय लष्करी इतिहासात प्रसिद्ध आहे.

अरुण खेत्रपाल यांच्याबद्दल (Arun Khetrapal in Marathi)

अरुण यांचे वडील, लेफ्टनंट कर्नल एम एल खेत्रपाल हे आर्मी इंजिनिअरिंग मध्ये कार्यरत होते. तर अरुण यांचे आजोबा ब्रिटिश इंडिया सैन्यात होते. कुटुंबात सुरवाती पासून सैन्यातील शिस्तबद्ध वातावरण होते. अरुण यांचे शालेय शिक्षण लॉरेन्स स्कूल, सनवार, हिमाचल प्रदेश येथून झाले. ते जलतरणपटू होते आणि स्नूकर हा खेळ सुध्दा उत्तम खेळत असत. लष्करात रुजू होऊन देशाच्या सेवेत आपले जीवन व्यतीत करायचे हि अरुण यांची दृढ इच्छा होती. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA)ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि प्रशिक्षण झाल्यानंतर कॅडेट नंबर 7498/F/38 असलेल्या अरुण यांना, १७ पुणे अश्व रेजिमेंट (Poona Horse regiment, 17th Battalion) मध्ये स्थान मिळाले.

battle of basantar, param vir chakra, arun khetarpal in marathi, 17 poona horse, 1971 India Pak war, सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल, india pakistan war stories, १७-पुणे अश्व बटालियन, परमवीर चक्र अरुण खेत्रपाल, भारत पाक युद्ध, बसंतरची लढाई
Arun Khetrapal in Marathi

पुणे रेजिमेंटचा (17th Poona Horse, a Tank Regiment) इतिहास दुसऱ्या बाजीराव पेशवे यांच्याशी जोडलेला आहे. या रेजिमेंटने भारतीय सैन्याला एकाहुन एक शूर सैनिक आणि अधिकारी दिले आहेत. याच रेजिमेंट मधील कर्नल तारापूर यांनी १९६५ च्या लढाईत मोठे आश्चर्यकारक धाडस दाखविले आणि देशासाठी बलिदान दिले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र मिळाले होते.

अरुण यांचे प्रशिक्षण सुरु होऊन फक्त सहा महिने झाले होते आणि युद्ध घोषित झाले. सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे संपूर्ण प्रशिक्षण झालेले नसतानाही हट्ट करून अरुण खेत्रपाल युद्धात उतरले.

बसंतरची लढाई (Battle of Basantar in Marathi)

बसंतर नदी, शंकरगढ नावाच्या एका संवेदनशील भागामधून वाहते. पाकिस्तानी सैन्याचा डाव असा होता की, ह्या नदीवरील पूल स्वतः च्या ताब्यात घ्यायचा ज्यामुळे पठाणकोट आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील संबंध तुटेल आणि भारतीय सैन्य जम्मूला पोहोचू शकणार नाही आणि पाकिस्तानला काश्मीर काबीज करता येईल.

हा डाव ओळखून भारतीय सैन्याने ताबडतोब कारवाईस सुरुवात केली आणि 47 ब्रिगेडला ब्रिजहेड बांधण्याचे काम दिले, ब्रिजहेड म्हणजे पुलाजवळील एक अशी जागा, जिथे सैन्य आपले वर्चस्व स्थापीत करून शत्रूला ब्रिज जवळ येऊ देत नाही. ब्रिजहेडचे काम १५ डिसेंबरला रात्री ९ वाजेपर्यंत पूर्ण झाले.

१६ डिसेंबर १९७१ चा दिवस

पाकिस्तानने शंकरगढ मध्ये लँडमाईन पेरून ठेवले होते जेणे करून भारतीय सैन्य आणि त्यांचे टॅंक पुढे येऊ नये. हे लँड माइन्स निकामी करण्याचे काम इंजिनिर कॉर्पचे होते, ज्यामुळे रेजिमेंट १७ पुणे अश्वदल यांच्यासाठी रस्ता मोकळा होईल. भारतीय लष्कराच्या इंजिनियर कॉर्पचे मुख्य कर्नल हंटी टँक फॉर्मेशनमध्ये पुढे जात होते तर अरुण आणि इतर अधिकारी मागून येत होते.

वेळ खूपच कमी होता आणि मार्ग पूर्णपणे क्लिअर झाला नव्हता. म्हणून कर्नल हंटी यांनी अरुण आणि काही सैनिकांना त्यांच्या टॅंक सहित नदी ओलांडून झारपाल येथील शत्रूच्या प्रदेशात जाण्याचे आदेश दिले. शूर सैनिक निडर होऊन पुढे निघाले, त्यांनी आपल्या टँकची गती वाढवली, पण इकडे पाकिस्तानी सैनिक आणि पाकिस्तानी टँक रेकॉईल बंदूका घेऊन त्यांची वाट पाहत होतेच. जोरदार लढाई छेडली गेली, भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैनिकांना मागे सरकायला भाग पाडले आणि त्यांचे टॅंक उध्वस्त केले. पण भारतीय सैन्याचे सुद्धा यात मोठे नुकसान झाले, अरुण यांचे बरेच सहकारी अधिकारी शहीद झाले.

आता सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल (Second Lieutenant Arun Khetarpal) हे शत्रूच्या प्रदेशात एकटेच उरले होते. तेवढ्यात समोरून काही पाकिस्तानी टँकची तुकडी तयार झाली आणि शत्रुच्या एका टॅंकने अरुण यांच्या टॅंकवर जोरदार हल्ला केला आणि त्यांच्या टॅंकला आग लागली.

अरुण यांनी लगेचंच कर्नल हंटी यांना वायरलेस वरून आपले लोकेशन सांगितले, तेव्हा त्यांनी अरुणला परत येण्याचे आदेश दिले. परंतु अरुण खेत्रपाल कर्नल हंटीना म्हणाले,

‘सर, माझी बंदूक अजूनही काम करत आहे, मी शत्रूला संपवूनच परत येईन.’

असे सांगून त्यांनी चालक नथू सिंह यांना रेडिओ बंद करून टाकायला सांगितले जेणे करून अजून दुसरे कोणी त्यांना आदेश देऊ शकणार नाही. भारतीय आणि पाकच्या टँकमध्ये घनघोर युद्ध झाले. एकट्या २१ वर्षीय अरुणने पाकिस्तानचे ७ टॅंक उध्वस्त केले. आता समोर एकच टँक उरला होता. दोघांनीही एकमेकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, परंतु शत्रू टॅंकचा एक गोळा अरुणच्या टॅंकवर लागला आणि अरुण खेत्रपाल यांना आपले प्राण गमवावे लागले. शत्रूलाही लाजवेल असं शौर्य २१ वर्षीय Arun Khetarpal यांनी दाखवलं होतं.

battle of basantar, param vir chakra, arun khetarpal in marathi, 17 poona horse, 1971 India Pak war, सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल, india pakistan war stories, १७-पुणे अश्व बटालियन, परमवीर चक्र अरुण खेत्रपाल, भारत पाक युद्ध, बसंतरची लढाई
Second Lieutenant Arun Khetarpal destroyed 7 Pakistani tanks

अरुण यांच्या ह्या शौर्यामुळे पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर मनोधैर्य खचले आणि ह्या युद्धात भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. एवढ्या कोवळ्या वयात आभाळा एवढं शौर्य दाखवणारे तरुण रोज रोज जन्म घेत नाहीत.

बसंतरच्या लढाईनंतर (After Battle of Basantar)

अरुणच्या शौर्याने आणि कर्नल हंटी यांच्या हुशारीने भारतीय सैन्याने युद्धात विजय मिळवला होता. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याला खूप वेळा मागे लोटण्याचा प्रयत्न केला, जो प्रत्येकवेळी अयशस्वी ठरला. भारतीय सैन्य पुढे सरकू लागले आणि त्यांनी पाकिस्तानचा मोठा भाग आपल्या ताब्यात घेतला. काही दिवसांनी पाकिस्तानने आत्मसमर्पण केले आणि युद्ध समाप्त झाले. भारत पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकला होता !

Arun Khetrapal यांचा विलक्षण धैर्य आणि नेतृत्व क्षमता यासाठी मरणोत्तर Param Vir Chakra देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान मिळावलेले ते सर्वात लहान वयातील भारतीय ठरले, तर कर्नल हंटी यांना महावीर चक्र मिळाले. ते बढती मिळवून लेफ्टनंट जनरल म्हणून नंतर सेवानिवृत्त झाले. १७ पुणे अश्व दलातील इतर अनेक सैनिकांना सुध्दा बरेच सन्मान आणि पदक मिळाले. सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या सन्मानार्थ भारतीय सैन्य अकादमीच्या स्टेडियमचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

जेव्हा अरुणचे पिता एकदा पाकिस्तानला गेले….

या लढाईच्या जवळपास ३० वर्षांनी अरुणचे वडील ब्रिगेडियर एमएस खेत्रपाल यांना त्यांची जन्मभूमी पाहण्याची इच्छा झाली होती. त्यांचे मूळ गाव फाळणीनंतर पाकिस्तानमधील सरगोधा नावाच्या ठिकाणी होते. बीसीसी चॅनेलने घेतलेल्या एका मुलाखतीत अरुण यांचे धाकटे बंधू मुकेश खेत्रपाल म्हणाले होते की, “आमचे ८१ वर्षांचे वडील लाहोरला पोहोचले तेव्हा एका पाकिस्तानी ब्रिगेडियरने त्यांचे स्वागत केले. त्या ऑफिसरने त्यांना आपल्या बरोबर घरी येण्याची आणि राहाण्याची विनंती केली. पाकिस्तानचे ब्रिगेडियर ख्वाजा मोहम्मद नासिर हे तेव्हा निवृत्त झाले होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने अरुण यांच्या वडिलांचे कौतुकाने स्वागत केले. एम एस खेत्रपाल यांना या मागे काहीतरी खास कारण आहे असे सारखे वाटत होते.

भारतात परत येण्याच्या एक रात्र अगोदर दोघेही गप्पा मारत होते, तेव्हा ब्रिगेडियर नासिर एम एस खेत्रपाल यांना म्हणाले, ‘तुमचा मुलगा अरुण खूपच बहादुरीने लढला. स्वतः च्या जीवाकडे दुर्लक्ष करून त्याने मोठ्या कुशलतेने शत्रू टॅंक उध्वस्त केले. या पराक्रमाबद्दल मला त्याचा खूप अभिमान वाटतो.’

खेत्रपाल यांनी नासीर यांना विचारले कि तुम्हाला हे सर्व कसे माहीत ? तेव्हा नसीर म्हणाले, “अरुणच्या समोर फक्त एक टॅंक राहिल्यावर दोघांनीही गोळीबार सुरू केला होता. थोड्यावेळ मौन ठेवून नासीर म्हणाले, “हे माझे नशीब की त्यात मी वाचलो, मला नंतर समजले की माझ्या समोर २१ वर्षांचा तरुण मुलगा होता.” पुढे ते म्हणाले, “मी तुमच्या मुलाला आणि तुम्हाला नमन करतो कारण तुमच्या संस्कार आणि शिकवणी शिवाय तो इतका धाडसी माणूस बनू शकलाच नसता.”

आता खेत्रपाल यांना या बद्दल काय बोलावे हेच सुचेना. त्यांच्या समोर मुलाला ठार करणारा माणूस होता. पण एक जेंटलमन ऑफिसर जसे वागतो अगदी तसेच ते वागले, त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि ते दोघेही झोपायला निघून गेले. “हे युद्ध हिंदुस्तान-पाकिस्तान या दोन देशांमध्ये होते आणि लष्करी सैन्य आप-आपल्या देशासाठी लढले होते, माझा मुलगा आणि ब्रिगेडियर नासीर यांच्यामध्ये वैयक्तिक काही शत्रुत्व नव्हते”, असे खेत्रपाल यांचे मत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी एकमेकांबरोबर काही फोटो काढले आणि एम.एल. खेत्रपाल भारतात परतले.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.