गेल्या ८० वर्षांपासून भारतीयांच्या मनावर राज्य करत असलेल्या पार्लेजीच्या यशाचं रहस्य काय आहे ?

0
33
parle g biscuit factory, growth of parle g, highest selling biscuits in india, marketing strategy of parle g, history of parle g, parle company information in marathi, parle g old ads, parle g history, parle g story in marathi, पार्लेजीच्या यशाचं रहस्य, पार्लेजी कंपनी माहिती

जगातील मोठमोठ्या बिस्कीट कंपन्यांना धोबीपछाड देणारा पारले जी कसा बनला भारतीय बिस्कीट उद्योगातील नंबर १ बिस्कीट ?

कमी किंमत, उच्च प्रत आणि मजबूत ब्रॅण्डिंग यामुळे पार्ले जी (Parle G) आपल्या ग्राहकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. या ब्रँडला 78 वर्षांचा इतिहास आहे. पार्ले-जीचे बिस्किट उद्योगावर निर्विवाद वर्चस्व आहे. भारतासारख्या देशात, जिथे बिस्किटांचे नवीन ब्रँड्स दररोज बाजारात आणले जातात, त्या बाजारपेठेत इतक्या वर्षांपासून आपले साम्राज्य टिकवून ठेवणे सोपे नाही.

पैसे कमवण्यापेक्षा ग्राहकांना दर्जेदार उत्पादनं देणं हे आपलं प्राधान्य आहे असे मानणारा पारले जी हा प्रत्येक दृष्टीने एक उत्कृष्ट ब्रँड असल्याचे सिद्ध झाले आहे. पारले जी नेहमीच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळ काहीतरी करतो. म्हणूनच पारले जीने इतके प्रचंड यश मिळवले. पण सध्या आर्थिक मंदीचा फटका या पारले जीला बसत असून कंपनीतून जवळपास १०,००० कामगार कमी केल्याची बातमी आहे. हि बातमी खरी कि खोटी ह्याबाबत अनेकांचे दुमत आहे. पण आज आपण बोलूया पारले जीच्या यशाचे सूत्र काय आहे ह्या विषयी.

parle g biscuit factory, growth of parle g, highest selling biscuits in india, marketing strategy of parle g, history of parle g, parle company information in marathi, parle g old ads, parle g history, parle g story in marathi, पार्लेजीच्या यशाचं रहस्य, पार्लेजी कंपनी माहिती
parle g biscuit factory, growth of parle g (Source – Milli Chronical)

कशी झाली पार्ले-जीची सुरवात ?

पार्ले-जी हा एक आयकॉनिक ब्रँड आहे जो जगात सर्वाधिक विक्री होणारा बिस्किट ब्रँड म्हणून ओळखला जातो. पार्ले-जीची सुरुवात १९२९ मध्ये मुंबईत झाली. बिस्कीटप्रेमी मंडळींनी पारले जीला फार लवकर स्वीकारले. सुरुवातीलाच मिळालेले यश आणि ग्राहकांचा प्रतिसाद ह्यामुळे पारले जीने व्यवसाय विस्ताराच्या उद्देशाने व भारतीय बिस्किटांना प्रोत्साहन देण्यासाठी जाहिरात करण्यास प्रारंभ केला. जाहिरातींमध्ये भारतीय ग्राहकांच्या देशभक्तीच्या भावनांना उजाळा देण्यात आला व तो एक मास्टर स्ट्रोक ठरला. पारले जीने नवीन उंची गाठली. भारतीयांनी पार्ले-जीला स्वदेशी ब्रँड मानले.

पारले जी ला मिळालेले यश पाहून इतर कंपन्यांनी देखील पारले जीच्या धोरणाची नक्कल करण्यास सुरवात केली. तथापि पारले जीने ही स्पर्धा अतिशय व्यावसायिक पद्धतीने घेतली.

त्यांनी आपले उत्पादन “एनर्जी बिस्किट ब्रँड” म्हणून सादर केले व अश्या प्रकारे पारले जी ग्लुको पारले जी (जी म्हणजे जीनिअस) झाले.

पार्ले-जी ची किंमत: पार्ले-जीची किंमत ५ रुपये आहे. पारले जी हा सर्वात किफायतशीर बिस्किटांपैकी एक मानला जातो. कमी खर्चाच्या धोरणासह, पारले जीने हे सुनिश्चित केले की पारलेची बिस्किटं हि दुर्गम भागातील लोकांसाठी सुद्धा सहज उपलब्ध झाली पाहिजे. भारतात दरवर्षी महागाई वाढत असली तरी, पारले जीने आपल्या उत्पादनांच्या किमतीत जास्त वाढ न करण्याचे धोरण निश्चित केले. ज्यामुळे पारले जीच्या विक्रीमध्ये घट न होता विक्री अजूनच वाढली.

उत्पादन: कमी किमतीमुळे पारले जी लोकांना अधिक पसंत पडले पण पारले जीच्या यशामागील आणखी एक कारण म्हणजे पारले बिस्किटांची चव आणि बिस्किटांची गुणवत्ता. या बिस्किटांची चव सर्व वयोगटातील लोकांना आवडते. एखादी व्यक्ती चहाच्या स्टॉलवर चहा प्यायला जाते तेव्हा तो चहावाल्याला बिस्किटं द्या असे न म्हणता पारले जी द्या असं म्हणतो. पारले जी हा बिस्किटांसाठी पर्यायवाचक शब्दच बनला आहे. ह्यावरून आपल्याला पारलेच्या लोकप्रियतेची कल्पना येते.

parle g biscuit factory, growth of parle g, highest selling biscuits in india, marketing strategy of parle g, history of parle g, parle company information in marathi, parle g old ads, parle g history, parle g story in marathi, पार्लेजीच्या यशाचं रहस्य, पार्लेजी कंपनी माहिती
history of parle g, parle company information in marathi (Source – Pinterest)

पॅकेजिंग: पारले बिस्किटांच्या पॅकेजिंगसाठी लाल आणि पिवळा रंग वापरला जातो ज्यावर एका लहान मुलीचे चित्र असते. ह्या पाकिटांवरील प्रतिमा ब्रँड असोसिएशन तयार करण्यासाठी आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पारलेने आपल्या पॅकेजिंगमध्ये कोणताही बदल केला नाही ज्यामुळे लोकांना पारलेचे पॅकेजिंग आणि ब्रँड चांगलेच लक्षात राहिले आहे.

ब्रँडिंग: पारले जी आपली जाहिरात – “भारताचं आपलं बिस्किट” अशा पद्धतीने करतं. टी.व्ही. आणि पेपरमधील जाहिरातींच्या माध्यमातून हा ब्रँड १९३९ पासून सर्वपरिचित झाला आहे. पारलेची जाहिरात करण्याची पद्धत खूप प्रभावी आहे, त्यांचा उद्देश सर्व वयोगटातील लोकांपर्यंत पोहोचणे हा आहे. मग ती मुले असोत, तरुण असोत की वृद्ध. अशीच एक जाहिरात मोहीम पारले जीने राबवली होती जी खास लहान मुलांसाठी बनवली गेली होती.

ह्या जाहिरातीमुळे पारलेच्या यशाचा आलेख अजून उंचावला. ती जाहिरात होती पारले जी यांची “जी माने जीनियस”. या जाहिरातीमुळे पारले ब्रँडच्या बिस्किटांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आणि बाजारात त्यांचे वर्चस्व अजून मजबूत झाले. असा हा पारले-जी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

parle g biscuit factory, growth of parle g, highest selling biscuits in india, marketing strategy of parle g, history of parle g, parle company information in marathi, parle g old ads, parle g history, parle g story in marathi, पार्लेजीच्या यशाचं रहस्य, पार्लेजी कंपनी माहिती
parle g old ads, parle g history, parle g story in marathi, पार्लेजीच्या यशाचं रहस्य (Source – BetterIndia)
*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here