Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

या वस्तु फक्त जपान मध्येच मिळतात

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. विज्ञानाच्या युगात शक्तीपेक्षा युक्तीला महत्त्व साहजिकचं अधिक आहे. “गरज ही शोधाची जननी आहे” असे म्हणतात. मग मानवाच्या अनेक गरजांची पूर्ती करण्यासाठी अनेक शोध लागत गेले. जुन्या लोकांना सुर्या शिवाय प्रकाशाची कल्पना करणे सुध्दा मुश्किल होते पण नंतर विजेचा शोध लागला. आधी माणूस पायीच प्रवास करत होता पण मात्र चाकाचा शोध लागला आणि त्याला दळणवळणासाठी नविन साधनं मिळाली. अशाच अनेक माणसाच्या विविध गरजा पुर्ण करण्यासाठी विविध शोध लागत गेले.

काळानुरुप या शोधामध्ये सुधारणा होऊन यांना तंत्रज्ञानाची जोड लागली. प्रत्येक देश आपापल्या परीने नवनवीन शोध लावत गेले. या सर्व देशांमध्ये व जगात तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वात जास्त अग्रेसर असणारा देश म्हणजे “जपान”. या जपानने खुप कमी कालावधीत सर्वात जास्त प्रगती केली आहे. आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर या छोट्याशा राष्ट्राने बलाढ्य अशा रशियाला धुळ चारली आणि आज जपानने जगात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि आज आपण अशा काही वस्तु बघणार आहोत ज्या फक्त जपान मध्येच मिळतात.

वेन्डिंग मशीनस् (Vending Machine)

japan, japnese products, japnese toilets, ETAF Automatic Doors, Turning Train Seat, Hanshin Expressway, जपान, तंत्रज्ञान, जॅपनीज वस्तू

वेन्डिंग मशिन भारतात आपल्याला एअरपोर्ट वर किंवा मेट्रो स्टेशन वर पाहायला मिळतात. ह्या वेन्डिंग मशीन्स (Vending Machine) लोकल करंन्सीवर चालतात. कॉईन टाकायचा आणि तुम्ही सांगितलेली वस्तू मशीन मधून आपोआप बाहेर येईल. आपल्या देशात ह्या मशीन्स फक्त कोल्ड्रिंक्ससाठी वापरत असले तरी जपान मध्ये या मशीनचा वापर सर्रास होताना दिसतो. दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या वस्तु सुध्दा येथील लोक या मशिन मधूनच घेतात. ह्या मशीन्स जपानमध्ये जागोजागी असल्यामुळे तुम्ही जर जाताजाता जर एखादी वस्तु विसरलात तर काळजी करण्याचे काही गरज नाही कारण ती तुम्ही जवळच्या मशीन मधून घेऊ शकता.

ड्रमच्या आकाराचे किबोर्ड (Japanese Drum Shaped Keyboard)

हे किबोर्ड जपानच्या गूगल मॅनेजमेंट ऑफिसने तयार केले आहे. हे किबोर्ड सध्या फक्त जपान मध्येच उपलब्ध आहेत. त्यामुळे हे किबोर्ड फक्त जपानी व इंग्रजी भाषेत आहे. हे किबोर्ड गोल आकाराचे आहे त्यामुळे वापरायला थोडं किचकट आहे. पण कंपनीचा दावा आहे की हे किबोर्ड वापरण्यास अतिशय सोपे आहे.

टॉयलेट्स (Toilets)

japan, japnese products, japnese toilets, ETAF Automatic Doors, Turning Train Seat, Hanshin Expressway, जपान, तंत्रज्ञान, जॅपनीज वस्तू

जे टॉयलेट्स आज आपण वापरतो या टॉयलेट्सच्या फ्लश टँक मध्ये 5 ते 6 लिटर पाणी असते. एकदा फ्लश केल्यानंतर एवढे सगळे पाणी वाया जाते. ह्या समस्येवर तोडगा म्हणून जपानने एक अशा टॉयलेटचा शोध लावला आहे ज्यामध्ये वॉश बेसिन आणि टॉयलेट जोडण्यात आलं आहे. ज्यामुळे वॉश बेसिन मध्ये वापरलेले पाणी पुन्हा टॉयलेट मध्ये वापरल्या जाते, त्यामुळे आधिकच्या होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळला जातो.

Hot Carpet

कारपेट ही अशी वस्तु आहे जी आपल्या घराची शोभा आणि सुंदरता वाढवत असते. पण जपानने एक अशी कारपेट तयार केली आहे जी थंडीच्या दिवसात आपल्याला गरम होऊन उब देईल. ही कारपेट स्वछ करणे सुध्दा अतिशय सोपे आहे. हे कारपेट Water Resistent आहे. त्यामुळे ह्याचा जादा त्रास स्वछ करताना होत नाही.

Sci-Fi Doors

japan, japnese products, japnese toilets, ETAF Automatic Doors, Turning Train Seat, Hanshin Expressway, जपान, तंत्रज्ञान, जॅपनीज वस्तू

आपण सिनेमात आनेकदा आपोआप उघडणारे दरवाजे बघत असतो. पण सिनेमातले ते दरवाजे इफेक्ट देऊन तयार केलेले असतात. पण जपानमध्ये मात्र अशा दरवाजांचा वापर सर्रास होतो. जपान मधील संशोधकांनी E- TAF Automatic Doors नावाचा स्वयंचलित दरवाजा तयार केला आहे. त्यामध्ये इन्फ्रारेड किरणांचा उपयोग केला आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य हे की हा दरवाजा जाणाऱ्या व्यक्तीच्या आकारानुसार उघडतो. त्यामुळे धुळ आणि कचरा दरवाज्यातून आत येत नाही.

पाण्याचा वापर न करणारी वॉशिंग मशीन (Waterless Washing Machine)

आपण वॉशिंग मशिन वापरतो, त्यामध्ये कपडे धुण्यासाठी भरपूर पाणी वापरले जाते. पण जपानमध्ये असे वॉशिंग मशिन तयार करण्यात आले आहे ज्यामध्ये कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर होत नाही. या मशिनमध्ये पाण्याच्या ऐवजी केमिकलचा वापर केला जातो, हे केमिकल कपडे स्वच्छ करण्यात मदत करते. अश्या वॉशिंग मशीनमुळे पाण्याचा अपव्यय होत नाही.

टर्निंग ट्रेन सीट (Turning Train Seat)

japan, japnese products, japnese toilets, ETAF Automatic Doors, Turning Train Seat, Hanshin Expressway, जपान, तंत्रज्ञान, जॅपनीज वस्तू

जपानमध्ये जरी बुलेट ट्रेन सारख्या रेल्वे धावत असल्या तरी त्या लोकांना सामावून घेण्यास अपयशी ठरतात. जास्त गर्दीच्या वेळी लोकांना उभे राहावे लागते. आपल्या इथे लोकल ट्रेन मध्ये हि समस्या तर रोजची आहे. पण जपानच्या रेल्वे विभागाने यावर उपाय काढला. तो म्हणजे त्यांनी गाडीत स्वयंचलित आसने बसवली. ही आसने कोणत्याही दिशेला वळू शकतात व दूमडली ही जाऊ शकतात. त्यामुळे लोकांच्या जागेचा प्रश्न मिटतो.

हंशीन एक्सप्रेस वे (Hanshin Expressway)

जपान मध्ये एक रस्ता असा पण आहे जो एका इमारतीच्या मधुन जातो. या रस्त्याला “हंशीन एक्सप्रेस वे” असे म्हटले जाते. याचं झालं असं कि या इमारतीचे मालक व जपान सरकार यांच्यतील वादामुळे या रस्त्याला इमारती मधुन न्यावं लागलं. या मार्गाला तयार करण्यासाठी इथल्या अर्चिटेक्टला खुप मेहनत घ्यावी लागली. हा एक्सप्रेस वे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे आणि या मार्गावरून वाहतुक आज कोणत्याही वादाविना चालु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.