Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

PV Sindhu चा फिटनेस फंडा पाहून अवाक व्हाल

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप (World Badminton Championship) मध्ये भारताला सूवर्ण पदक मिळवून देऊन इतिहास रचणाऱ्या बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने या एका दिवसासाठी कित्येक महिने मेहनत केली होती. एका खेळाडूसाठी  स्वतः ची फिटनेस सर्वात महत्वाची असते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी स्वतःला शिस्त लावावी लागते. पी व्ही सिंधूने आपला फिटनेस कसा राखला, त्यासाठी तिने कशी मेहनत घेतली हे आज आपण जाणून घेऊया.

आपल्या फिटनेस बद्दल बोलतांना सिंधूने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती अगदी काटेकोरपणे आपला फिटनेस प्लॅन फॉलो करते. सिंधू सकाळी 4 वाजता उठून दुपारी 12 वाजेपर्यंत सराव करते. यानंतर दुपारी 1 वाजता दुपारचं जेवण करते.

pv sindhu, pv sindhu fitness tips, pv sindhu workout, pv sindhu diet, pv sindhu in marathi, पी व्ही सिंधू फिटनेस, पी व्ही सिंधू डाएट
pv sindhu fitness tips, pv sindhu workout (Source – India TV News)

सिंधुचं डाएट-  खाण्यात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट योग्य प्रमाणात असेल याकडे तिचं विशेष लक्ष असतं. यासाठी ती नाश्त्यामध्ये दूध, अंडी आणि फळं खाते. दिवसभर प्रॅक्टिस दरम्यान भरपूर पाणी पिते व आरोग्याला उपयुक्त असा आहार घेते.

दोन वेळच्या जेवणात ती भात, भाज्या आणि मटन खाते. वर्क आउटच्या वेळीही ती खाण्या- पिण्याकडे विशेष लक्ष देते. ती स्वतःसोबत सतत फळं आणि ड्राय फ्रूट्स ठेवते.  याशिवाय ती नियमितपणे मेडिटेशन आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम देखील करते.

सिंधुच्या वर्क आउटची खासियत- ती रनिंगशिवाय वर्कआउटची सुरुवात करत नाही. विशेष गोष्ट म्हणजे दररोज तिचं वर्क आउट सेशन बदलत असतं. वर्क आउट कसं असणार याचं प्लॅनिंग महिन्याच्या सुरुवातीलाच ठरतं. यात पाठीपासून गुडघे ते खांद्यापर्यंतचे सर्व व्यायाम असतात.


Leave A Reply

Your email address will not be published.