पुरुषांच्या ‘या’ ३ क्वालिटींकडे जास्त आकर्षित होतात महिला !

0
44
qualities of a good man in a relationship, perfect man qualities list, attractive qualities in a person, most attractive traits in a man, things a woman needs from a man, what does a girl see in a boy, स्त्रिया पुरुषांमध्ये काय बघतात, मुलींना मुलांमध्ये आवडणाऱ्या क्वालिटीज, मुली मुलांमध्ये काय बघतात

हे खरे आहे कि, स्त्रियांना नक्की वाटते, त्यांना नक्की काय हवे असते, त्यांच्या मनात नक्की काय चालले असते हे कोणालाच कळत नाही आणि स्त्रियांना ओळखणे खूप कठीण असते. स्त्रियांना ओळखणे कठीण आहे पण अशक्य नाही…… अनेक लोकांना असं वाटत असते कि स्त्रियांना फक्त उंच, देखणे, सावळे पुरुष जास्त आकर्षित वाटतात ,परंतु हे काहीसे खोटे आहे.

उंच, देखणे, सावळे फक्त या गोष्टी पुरेश्या नसून अशा काही क्वालिटीज आहे ज्या पुरुष्यांमध्ये असणे आवश्यक असते. कारण पुरुष सुदृढ शरीराचे असले तरी त्यांच्यामध्ये भावनिक गोष्टींचा सुद्धा मेळ असणे महिलांसाठी गरजेचे असते. यासोबतच पुरुषांमध्ये आत्मविश्वास, समजून घेण्याची वृत्ती, सेन्स ऑफ ह्युमर अशा अनेक क्वालिटी आहेत ज्या महिलांना पुरुषांमध्ये हव्या असतात.

1) सुपरमॅन क्वालिटीज

महिलांना त्यांची काळजी घेणारे, त्यांची सुरक्षा करणारे पुरुष नेहमीच आकर्षक वाटत. जरी त्या कितीही स्वतःबद्दल सक्षम असल्या तरी त्यांची जबाबदारी घेणारा त्यांची काळजी करणारा व्यक्ती असेल तर त्यांना छान वाटते.

असे नाही कि प्रत्येकवेळी तुम्ही भांडलेच पाहिजे, पण जर अशी वेळ कधी आली तर तुम्ही तिच्यासाठी खंबीरपणे उभे राहाल, तिची सुरक्षा कराल, अडी-अडचणी मध्ये तिच्यासाठी सर्व काही कराल असा विश्वास तिला पटवून द्यावा. कारण स्त्रियांना, तुमच्यासोबत ती सुरक्षित आहे कळवून देणे देखील आवश्यक असते आणि ज्यांच्यासोबत तिला सुरक्षित वाटते, तसे पुरुष स्त्रियांना पसंत असतात.

2) सेन्स ऑफ स्टाइल

स्त्रियांना जरी एखादा फिल्मस्टार आवडत असला तरी तिला तुमच्यामध्ये एखादा फिल्मस्टार बघण्याची खूप हौस असते. याचा असा अर्थ होत नाही कि, तुम्ही एकदम ब्रँडेड किंवा महागातले कपडे घातले पाहिजेत किंवा असाही अर्थ होत नाही कि, तुम्ही त्या फिल्मस्टारसारखं त्याची ड्रेसिंग स्टाईल कॉपी करून त्यांना इम्प्रेस केलं पाहिजे.

कपडे हे रोडसाईडचे असले तरी काही हरकत नाही फक्त ते तुमच्यावर चांगले दिसले पाहिजेत. कारण, स्त्रियांना पुरुषांची ड्रेसिंग स्टाईल चांगली असणे अपेक्षित असते. कपडे कुठलेही असो, तुम्ही तुमची स्वतःची एक स्टाईल तयार करू शकता आणि स्त्रियांना इम्प्रेस करू शकता.

3) सेन्स ऑफ ह्यूमर

सेन्स ऑफ ह्यूमर हि एक अशी क्वालिटी आहे जी, स्त्रियांना पुरुषामध्ये असणे अपेक्षित असते. तुम्हाला तर माहितीच असेल कि, स्त्रियांना दिवसभरात अनेक प्रकारची कामे करावी लागत असतात, त्यांच्या जीवनात अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. या सर्व समस्यांवर त्यांना मात करायची असते, त्यातून बाहेर पडायचे असते. अशावेळी त्यांना हसवणारा पार्टनर हवा असतो, ना कि स्वतः डिप्रेशन मध्ये राहून तिचा मूड अजून खराब करणारा.

काही वेळेस ताणतणाव स्त्रियांसोबत पुरुषांना पण येत असतात. पण प्रत्येकवेळी मूड खराब ठेऊन बसलेला पुरुष त्यांना अजिबात आवडत नाही आणि अशावेळी जर तुमचा सेन्स ऑफ ह्यूमर चांगला असेल, तर तुमची हि क्वालिटी स्त्रियांच्या आवडती आहे हे लक्षात घ्या.

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here