सोशल मीडियावर सुशिक्षित बेरोजगारांना 50 हजार मिळण्याचा मेसेज फिरतोय. खरं काय?

जगभरात लोक कोरोनामुळे त्रस्त आहेत. कोरोनाची हे जीवघेणे संकट अक्षरशः अनेक देशात धुमाकूळ घालत आहे. यामुळे आतापर्यंत किती लोकांना लागण झाली आहे आणि किती लोकांचा मृत्यू झाला आहे हे आम्ही पुन्हा सांगण्याची गरज नाही.
पण भारतात कोरोनसोबतच अजून एक मोठा रोग फिरत आहे, तसा हा रोग काही नवीन नाही तर जुनाच आहे पण अनेकांना उद्धवस्त करतोय. तो म्हणजे ‘खोट्या बातम्या पसरवण्याचा रोग’. गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या वेगवेगळ्या कारणासाठी पसरवण्याचे पीक आले आहे. सध्या अशीच एक माहिती तुमच्या whtasapp वर फिरत आहे.
शेअर होत असलेल्या या फोटो नुसार देशभरात शिक्षित बेरोजगार योजना सुरू होत असल्याचा दावा केला आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले जॉब गमवावे लागले आहेत तर त्याहून अधिक शिक्षित बेरोजगार अधिक आहेत त्यामुळे युवकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सरकारने शिक्षित बेरोजगार योजना आणली असल्याचे म्हंटले आहे. सादर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला रेशकार्डचा वापर करावा लागणार आहे असाही त्यात बोललं आहे. हा मेसेज पाहून देशभरात अनेक उत्साही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
लोक रेशनकार्ड घेऊन स्थानिक पातळीवर प्रशासनाकडे चौकशीसाठी बाहेर पडण्याचा धोका आहे यामुळे वेळीच लक्ष देत सरकारी प्रेस वेबसाईट PIB ने याबाबत खुलासा केला आहे. Pib ने अधिकृतपणे यावर ट्विट करून ही माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे. सरकारने अशी कोणत्याही प्रकारची योजना आणली नाही अस त्यात स्पष्ट सांगितलं आहे. आपल्याला नम्र विनंती आहे असा मेसेज तुम्हाला आला असेल तर त्याला या खोटेपणा बाबत माहिती द्या आणि मेसेज कोणालाही शेअर करू नका.