Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांच्या ‘त्या’ सल्ल्याने आर.आर. पाटलांची आमदारकी जाता जाता वाचली !

एके दिवशी R R Patil आबांनी मनोहर जोशींना घाम फुटेल असं जोरदार भाषण विधानसभेत केलं. त्यांच्यावर बेधडक १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करुन टाकला.

विधिमंडळ म्हणजे एक प्रकारचे रणांगणच. इथे सत्ताधारी असो वा विरोधक, दोघेही एकमेकांवर नेहमीच शाब्दिक वार करत असतात. कधी ते एखाद्या प्रस्तावावरुन एकमेकांवर तुटून पडतात तर कधी शासनाच्या निर्णयावरुन.

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते हे आपापल्या सैन्याचे सेनापती जरी असेल, तरी काही सरदार हे असे असतात जे आपल्या भाषण कौशल्याच्या जोरावर नेहमीच बाजी मारुन जातात. महाराष्ट्राच्या अशाच प्रभावी वक्त्यांपैकी एक असणारे नेतृत्व म्हणजे स्वर्गीय रावसाहेब रामराव पाटील (RR Patil)

Raosaheb Ramrao Patil, r r patil photo, sharad pawar, manohar joshi, r r patil in marathi, राष्ट्रवादी काँग्रेस, रावसाहेब रामराव पाटील, sharad pawar kisse, r r patil kisse, political kisse, राजकीय किस्से

हळव्या मनाचा संवेदनशील माणूस ‘R R Patil आबा’

आबा म्हणजे साधी राहणी उच्च विचासरणी, R R Patil आबा म्हणेज शांत – संयमी – कुशल नेतृत्व, आबा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तळागळातून घडलेले व्यक्तिमत्त्व. आबा कसे होते, आबा काय होते याबद्दल जास्त सांगायची गरज कधीच भासत नाही. कारण उभ्या महाराष्ट्राने आबांना फार जवळून अनुभवले आहे.

आबा (RR Patil) म्हणजे हळव्या मनाचा संवेदनशील माणूस. तत्व, निष्ठा प्रामाणिकता यांना नेहमीच प्रथम स्थान देणारा. त्यामुळे ते जे काही करायचे ते अगदी मनापासून आणि पोटतिडकीने करायचे. मग ते काम असो वा भाषण.

कधीकधी एखादी गोष्ट पोटतिडकीने मांडत असताना त्या गोष्टीची सतत्या न पडतळताच आपण ती मांडतो किंवा पुरावे नसतानाही त्या विरुद्ध आवाज उठवतो. परिणामी जेव्हा सत्य समोर येते, तेव्हा ती गोष्ट आपल्याच अंगलट येते. असेच किस्से स्वर्गीय आर.आर.पाटलांच्या बाबतीतही घडले.

सहारा प्रकरण आणि मनोहर जोशींवर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आबांचा आरोप

एके दिवशी आबांनी मनोहर जोशींना घाम फुटेल असं जोरदार भाषण विधानसभेत केलं. त्यांच्यावर बेधडक १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करुन टाकला. आबांचे हे भाषण शरद पवार स्पिकरवर ऐकत होते. त्यांनी लगेचच चिठ्ठी पाठवून आबांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि विचारलं “सहारा प्रकरणात मनोहर जोशींनी १०० कोटींचा गैरव्यवहार केला, हे मी ऐकलं. तुमच्याकडे याचे पुरावे काय?”.

यावर आबा म्हणाले “कसेल आलेत पुरावे साहेब. विधानसभेत कोणावर बोललं तर डिफमेशनची केस होत नाही, कोणाला दावा करता येत नाही. विधानसभेत बोलायचं स्वातंत्र्य आहे”.

Raosaheb Ramrao Patil, r r patil photo, sharad pawar, manohar joshi, r r patil in marathi, राष्ट्रवादी काँग्रेस, रावसाहेब रामराव पाटील, sharad pawar kisse, r r patil kisse, political kisse, राजकीय किस्से

पुरावे नसल्याने आबांची आमदारकी धोक्यात

आबांचे हे उत्तर ऐकताच पवार म्हणाले, “पण प्रिविलेज होऊ शकतो. तुमची आमदारकी जाऊ शकते”. पवारांचे हे शब्द ऐकून आबा लगेचच म्हणाले “साहेब माझं चुकलं”

आबांनी प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करताच विधिमंडळ कामकाजाचा तगडा अनुभव असलेल्या शरद पवारांनी त्यांना सांगितलं की

“तुमचं भाषण कन्फर्म करण्यासाठी प्रत येईल. त्या सर्व भाषणाच्या शेवटी एवढंच म्हणा की, १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याच्या बाहेर चर्चा आहेत”

पवारांचा सल्ला आणि R R Patil आबांची आमदारकी वाचली

पवारांनी जी शंका वर्तवली होती, ती खरी ठरली. मनोहर जोशींनी प्रिवीलेज मोशन आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा सचिवांनी जेव्हा प्रोसेडिंग तपासलं. तेव्हा ते शेवटचे वाक्य पाहून सचिव म्हणाले, यावर प्रिविलेज होऊ शकत नाही आणि आबांची आमदारकी थोडक्यात वाचली.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.